आपल्या सूर्याचं जवळपास निम्मं आयुष्य संपलं आहे. सुमारे पाच अब्ज वर्षांनंतर सूर्य मृत्यू पावणार आहे. त्याचा परिणाम आपल्या ग्रहमालेवर अर्थातच होणार आहे. त्यातही सूर्याच्या जवळ असणाऱ्या ग्रहांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. हे कसं घडून येणार आहे, याची कल्पना देणारी एक घटना संशोधकांनी नुकतीच टिपली आहे. […]
कोकण रेल्वेवर एकूण ९२ बोगदे आहेत. त्यांची एकूण लांबी ८३.६ किलोमीटर आहे. यातील नऊ बोगदे दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आहेत. त्यासाठी खोदकाम करताना सर्व प्रकारचे दगड आणि माती आढळून आली. […]
घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम दुधासाठी आणि मांसासाठी केला गेला असावा. […]
सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते. […]
मालाने भरलेले ट्रक रेल्वेमार्फत पाठविणे ही कल्पना तुलनेने नवीन आहे. भारतात या सेवेची सुरुवात १९९९ मध्ये कोकण रेल्वेने केली. याला रोरो ऊर्फ रोल ऑन-रोल ऑफ असे म्हणतात. […]
तिबेटचं पठार म्हणजे एक आत्यंतिक परिस्थिती असणारं ठिकाण आहे. सुमारे पंचवीस लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या आकाराच्या या पठाराची सरासरी उंची चार हजार मीटरहून अधिक आहे. इथली हवा अत्यंत विरळ आणि थंड असते. इथलं तापमान हिवाळ्यात शून्याखाली वीस अंश सेल्सिअसच्या खाली जातं. […]
सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते. […]
माझा लागोपाठ ३ ऱ्या वर्षी लिम्का रेकॉर्ड झाला परंतु त्याची तयारी १९९० साली सुरु केली होती. त्या आधी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या जोडीने हॅरिस शिल्ड मध्ये रेकॉर्ड केला तो २४ फेब्रुवारी १९८८ रोजी केला . त्यानंतर दोघांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. कधी मैदानावर तर कधी एखाद्या कार्यक्रमात जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकर असे तेव्हा दोन चार स्वाक्षऱ्या घेत असे. पण रेकॉर्ड वगैरे हा प्रकार मनातही नव्हता. […]
शुक्रावर ज्वालामुखी असल्याचे अनेक पुरावे पूर्वीच मिळाले आहेत. परंतु या ज्वालामुखींच्या अलीकडच्या काळातील सक्रियतेचे पुरावे मात्र सापडले नव्हते. त्यामुळे शुक्र हा सध्याच्या काळात भूशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला होता. आता मात्र शुक्र निष्क्रिय नव्हे, तर अगदी सक्रिय असल्याचा पुरावा सापडला आहे. हा पुरावा, अलीकडेच शुक्रावर ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेल्याचं दर्शवतो. […]
‘पान खायो सैंया हमार’ किंवा ‘खाईके पान बनारसवाला’ अशा गाण्यांची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करायचा असेल तर जुन्या काळात थोडेसे डोकावले पाहीजे. सतरंजी तक्क्याने सजलेली बैठक, मध्यभागी पितळेचा पानपुडा, अडकित्ता, चुना, कात, सुपारी, लवंग, विलायची, हे घराघरात हमखास दिसणारे चित्र. […]