समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र, मुलायम वाळू त्याचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करीत असते. क्षितिजापाशी दूरवर अस्ताचली जाणारे सूर्यबिंब सौंदर्यात अधिकच भर घालीत असते आणि विविध जहाजे. शिडाच्या होड्या चित्रात रंग भरीत असतात. समुद्रदर्शन हा एक विलक्षण आनंददायक अनुभव असतो. मग तो आपल्याकडील असो वा अमेरिकीतील-काही फरक पडत नाही. […]
अमेरिकेसारख्या राष्ट्राचा इतिहास तर गेल्या तीनचारशे वर्षांचा. शिवाय ते प्रगत राष्ट्र. इथल्या नगररचना, रस्ते, वाहतुकी यांचा पूर्णपणे विचार आधीच केला गेलेला. याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे सॅन फ्रान्सिस्को देता येईल. हे शहर तसे डोंगराचा एक भाग समुद्राला मिळतो अशा ठिकाणी वसवलेले. […]
मॅडम सी.जे. वॉकर ही आपल्या कंपनीची एकमेव मालक आणि अध्यक्षही होती. तिच्या उद्योगजगताचे साम्राज्यच तिने वाढवून ठेवलेले होते. या साम्राज्यात कारखाना, वॉकर कॉलेज ऑफ हेअर कल्चर आणि ‘मेल ऑर्डर बिझिनेस’ वा पोस्टातर्फे व्यवसाय यांचा समावेश होता. संपूर्ण अमेरिकेत तिचे एजंटस् सौंदर्यप्रसाधनांचे प्रात्यक्षिक दाखवीत विक्री करीत फिरत होते. […]
देवमासे वर्षभराच्या काळात आपल्या वास्तव्याची जागा बदलत असतात. त्यांच्या वास्तव्याच्या जागेत होणारा हा बदल वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काही जातींचे देवमासे हे उन्हाळ्याच्या काळात, जिथे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं अशा किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी जातात; तर थंडीच्या दिवसात ते प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं अनुकूल असणाऱ्या किनारी भागात राहतात. […]
अभ्यासामध्ये आपल्या परीक्षेच्या वेळी कधी अभ्यास केला नसेल परंतु डॉक्टर कडे जाताना आपल्या आजाराचा इंटरनेट वरती सखोल अभ्यास करून आलेले महा विद्वान पेशंट…. […]
इजिप्तचं वैशिष्ट्य असणाऱ्या पिरॅमिड या वास्तू, संशोधकांच्या दृष्टीनं अत्यंत कुतूहलजनक रचना ठरल्या आहेत. काही पिरॅमिडच्या आतल्या भागात थोडंफार शिरता येत असलं तरी, त्या पिरॅमिडची संपूर्ण रचना कशी आहे, त्यांतील विविध रचनांचा उद्देश काय आहे, ते अजूनही आपल्याला ठाऊक नाही. […]
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग म्हणजेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात मोठा तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महामार्ग आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देणारा, विविध विभागांत कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. […]
नेली ब्लाय ही जगप्रसिद्ध अमेरिकन पत्रकार ! बातमी मिळवून तिची ‘स्टोरी’ करण्यासाठी ती कोणतीही भूमिका करीत असे. ही भूमिका करताना ती कोणतेही धाडस करीत असे. तिच्या धाडसाला सीमा नव्हती. समाज काय म्हणले याची भीती तिने कधीच बाळगली नाही. वाचकांना सत्य जाणण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तिच्या मनाची तयारी असे. […]
इथे साधारण तीनेक प्रकारची घर दिसतात. पहिला प्रकार अपार्टमेंट स्वरूपाचा. ती एक किंवा दोन मजली असतात. आपल्याकडे इमारती असतात तशी. त्यामध्येदेखील ऐसपैस जागा असते: […]
अमेरिकेत पाऊल टाकले की तिथला विलक्षण निसर्ग मनाला भावतो. आपला भरतखंडही यादृष्टीने संपन्न आहेच. त्याला स्वतंत्र परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. […]