२१ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील तसेच जगातील अनेक देशांमधील विविध समूहांच्या मातृभाषांचे जतन, संवर्धन करणाऱ्या विविध संस्था, जागतिक मातृभाषा दिवस साजरा करतात ! सर्व दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्था हा दिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करतात. हा जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्याची प्रथा कशी पडली त्याचा इतिहासही रंजक आहे. पूर्व […]
जर्मनीतील बव्हेरिआ प्रांतात फ्रँकोनिअन जुरा नावाचा प्रदेश आहे. हा प्रदेश टेरोसॉर आणि तत्सम अतिप्राचीन सरीसृपांच्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे. टेरोसॉर हे सरीसृप, डायनोसॉर या सरीसृपांचे भाऊबंद होते. ते उडणारे सरीसृप म्हणून ज्ञात आहेत. त्यांना पंख होते. मात्र हे पंख पिसांपासून बनलेले नव्हते, तर ते उतींपासून बनलेले होते. जगभरच्या इतर ठिकाणांप्रमाणेच फ्रँकोनिअन जुरामध्येही टेरोसॉरच्या अनेक प्रजाती सापडल्या आहेत. […]
अतिथंड तापमानाला धातूंचे आणि मिश्रधातूंचे गुणधर्म बदलतात. सर्वसाधारण तापमानाला अतिशय उपयुक्त ठरणारा एखादा धातू वा मिश्रधातू हा अतिथंड तापमानात ठिसूळ बनतो व निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अतिथंड तापमानाला वापरायच्या धातू व मिश्रधातूंवर मर्यादा येते. परंतु हा प्रश्न कदाचित नजीकच्या भविष्यात सुटण्याची शक्यता आहे. […]
ग्रीनलँड हा पृथ्वीवरचा अतिउत्तरेकडचा प्रदेश आहे – उत्तर ध्रुवाजवळचा! या प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग म्हणजे एक शीत मरुभूमी आहे. अत्यंत कोरडी आणि थंड हवा असणारा हा प्रदेश अगदी वैराण आहे. इथल्या जमिनीतलं पाणी हे सतत गोठलेल्या अवस्थेत असतं. इथल्या अतिप्राचीन काळातील वनस्पतींची आणि प्राण्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही. […]
दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या दिशेनं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ठसे केव्हा उमटले असावेत याची माहिती मिळू शकली, तर गुन्ह्याचा […]
मंगळावर अनेक ज्वालामुखी आढळतात. एके काळी जागृत असलेले हे ज्वालामुखी आज मृतावस्थेत आहेत. त्यामुळे मंगळ ग्रह हा भूगर्भीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला आहे. मात्र नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून, मंगळ वाटतो तसा निष्क्रिय नसल्याचं दिसून आलं आहे. किंबहुना मंगळावर सतत भूकंप होत आहेत, इतकंच नव्हे तर मंगळाच्या पृष्ठभागाखाली शिलारस अस्तित्वात असल्याचंही दिसून आलं आहे. […]
श्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. गंगा नदी मोक्षदायिनी मानली जाते. पहिल्या आठ श्लोकात गंगेच्या धरतीकडे प्रवासाचे मनोहारी वर्णन, तसेच गंगाजलाची महती वर्णिली आहे. नवव्या श्लोकात आचार्यांनी भक्तीचे परमोच्च शिखर गाठून शैव-वैष्णव वादावरही पडदा टाकला आहे. […]
‘फॉरच्युन’ आणि ‘लाईफ’ या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, ‘लाईफ’ मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते ! प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले. […]
आपल्याकडे गावोगावी, शहराशहरात असतात तशी वाण्यांची दुकाने अमेरिकेत दिसत नाहीत. इथे ‘राल्फस्’, ‘वॉलमार्ट’, ‘कोलह’, ‘टारगेट’, ‘मायकल’, ‘स्पेक्ट्रम’.. अशा मोठमोठ्या मॉल्सची साखळी असते. त्यामध्ये जगाच्या भिन्न भिन्न कोपऱ्यात तयार होणाऱ्या असंख्य वस्तू वेळोवेळी येत असतात. […]