आम्ही क्रिकेटशौकीन मित्रमंडळी पूर्वी एक आवडीचा खेळ अधूनमधून खेळत असू, तो म्हणजे आपल्या पसंतीचा एक सर्वोत्तम संघ निवडणे. उदाहरणार्थ – सगळ्यात उत्तम जागतिक संघ किंवा सर्वकालिन उत्तम भारतीय संघ किंवा एखाद्या दशकातील सर्वोत्कृष्ट संघ वा फक्त डावखुऱ्या खेळाडूंचा श्रेष्ठ संघ वगैरे वगैरे. सध्या डिजिटल च्या जमान्यात युवक मंडळी मोबाइल वर “ Dreams11”, “MPL”, “My11Circle” अश्या मोबाईल […]
भारतात टीव्ही सुरु झाला तेव्हापासून आजपर्यंत कमर्शियल जाहिरातींमधील दोन जाहिराती अविस्मरणीय ठरल्या. एक होती निरमा वाॅशिंग पावडरची व दुसरी एमडीएच मसालेची! या मसाल्याच्या जाहिरातीत जो फेटेवाला हसणारा वृद्ध दिसायचा, तो पहिल्यांदा माॅडेलिंग करणारा असेल असं वाटायचं. मात्र पाच दशकं झाली तरी उतारवयातही जाहिरातीत तोच दिसल्यावर खात्री झाली की, हाच ‘एमडीएच’ मसाल्याच्या कंपनीचा मालक आहे! […]
सन १९८२ मधली घटना… तुर्कस्तानच्या दक्षिण भागात, उलुबुरून म्हणून ओळखला जाणारा, भूमध्य सागरात शिरलेला एक लांबट भूभाग आहे. सागरी स्पंजाचा शोध घेताना एका पाणबुड्याला, या उलुबुरूनच्या किनाऱ्यापासून सुमारे साठ मीटर अंतरावर, समुद्राच्या तळाशी पडलेलं एक जुनं जहाज दिसलं. […]
विवोन कोमेचा जन्म .१८ नोव्हेंबर १९०९ मध्ये शांघाय चीन येथे झाला. तिचे कोडनेम होते अनेट. तिचे वडील बेल्जियमी व आई स्कॉटिश होती. तिचे शिक्षण बेल्जियम व स्कॉटलंड येथे झाले. १९३७ मध्ये तिचे चार्ली कोमेशी लग्न झाले तो रायफल ब्रिगेड मध्ये काम करत होता. […]
विवोन फोनटेनचा जन्म 8 ऑगस्त 1913 ला फ्रांस मध्ये झाला. तिने हळूहळू 1943 मध्ये जर्मन काबिज फ्रांस मधील क्रांतिकारकारकाना मदत करायला सुरुवात केली.जेव्हा एसओई गुप्तहेर संघटनेचे दोन हेर डेनीस आणि बेनजामीन एसओई संघटनेसाठी घातपाती कारवायांसाठी ट्रॉय शहरात आले. बेनजामीन फोनटेन ला भेटला व त्याने तिला कुरियर म्हणून 2 हजार फ्रँक पगारावर ठेवले. आणि नेनेट सांकेतिक नाव […]
इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला. […]
दुसऱ्या महायुद्धात ज्या काही वीरांगना होऊन गेल्या त्यामध्ये एक महत्वाची होती ती म्हणजे वर्जिनिया हॉल.तिचा जन्म बाल्टिमोर येथे ६ एप्रिल १९०६ रोजी झाला.कोलंबिया विद्यापीठात तिचे शिक्षण झाले. तीचे फ्रेंच,इटालीयन,जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.फेब्रुवारी १९४०च्या सुरवातीला तिने फ्रांस सैन्यामध्ये रुग्णवाहिका ड्रायव्हर म्हणून काम केले.फ्रान्सचा पाडाव झाल्यावर ती स्पेनला गेली.तिथे तिची ओळख ब्रिटीश गुप्तहेर,जॉर्ज बेलोस याच्याशी झाली. तो तिच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाला. वर्जिनिया हॉल-(SOE) मध्ये एप्रिल १९४१मध्ये दाखल झाली. […]
लिस बेसाक चा जन्म मॉरिशस मध्ये ११ मे १९०५ साली झाला. तिचे कुटुंब लॅंडलॉर्ड होते. ते १९१९ मध्ये पॅरिसला स्थलांतरित झाले.तिचे गुस्ताव वेलीमर याच्याशी प्रेम जुळले. यावर तिची आई नाराज होऊन तिने तिला इटलीला पाठवले. पुढे लिस पॅरिसला परतली.ती व तिचा भाऊ क्लाउड लपतछपत १९४१ मध्ये स्कॉटलंडला पोहोचले.तिला डेली स्केच दैनिकात नोकरी मिळाली व भाऊ एसओई(गुप्तहेर संस्था) मध्ये भारती झाला. […]
बिकमनचा जन्म पॅरिस येथे ७ जानेवारी १९११ रोजी झाला.लहानपणी त्यांचे कुटुंब लंडन येथे स्थायिक झाले. शाळेत शिकत असताना तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन वर प्रभुत्व होते. इंग्लंड मध्ये शिक्षण झाल्यावर तिला स्विस स्कूल मध्ये धाडण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तिला वुमन एअर फोर्स मध्ये पाठवण्यात आले.तिला तेथे रेडियो ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्यात आले.कारण तिचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व होते. बिकमन १५ फेब्रुवारी १९४३ रोजी एसओई मध्ये भारती झाली.तिने सार्जंट जाप बिकमनशी १९४३ मध्ये लग्न केले. त्याच्याशी तिची प्रशिक्षणाच्या वेळी ओळख झाली. […]