जगातल्या कोणत्याही देशात जा. देवाने ‘अनंत हस्ते’ दिलेले स्त्रीसौंदर्य तिच्या विवाहप्रसंगी ओसंडून येतं. लग्नविधीतले दोन मुख्य भाग म्हणजे, साखरपुडा आणि लग्नविधी. सून पसंत करायची जबाबदारी आई-वडिलांची. तेच विवाहाची तारीख नक्की करतात. नातलग मंडळी आहेर-खरेदीत गर्क होतात तर दोन्ही पक्षाचे आई-बाबा विवाह-पूर्वतयारीला लागतात. खर्च वाटून घ्यायचा. पण वधूच्या आई-वडिलांनी लेकीच्या संसाराची भांडीकुंडी द्यायची हा संकेत असतो. […]
अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार. […]
बहुत नजदीक मुझे आना है-तेरे बाहोमे मुझे मर जाना है ‘- एखाद्या तरूणीने प्रियकराच्या प्रेमात बेभान होऊन झोकून द्यायचे व त्याला खुशाल वाहून टाकायचे यात काय चुकलं? जगात सगळीकडे हेच घडत आलंय, मग आफ्रिकन मुलीचं यात काहीही चुकत नाही. पण एकदा लग्नाची वचनं देणारा प्रियकर एखाद्या दिवशी अचानक चालता झाला तर? मग ती चूक झाल्याचं जाणवतं […]
अंजन (वनस्पतिशास्त्रीय नाव: हार्डविकिया बायनाटा Hardwickia binata Roxb, कुळ: Caesalpinaceae हार्डविकिया ही शेंगांच्या उपकुटुंब Detarioideae मधील फुलांच्या वनस्पतीची मोनोटाइपिक जीनस आहे. एकमेव प्रजाती. भारत आणि बांगलादेशातील मूळ झाड आहे. विल्यम रॉक्सबर्ग यांनी थॉमस हार्डविक यांच्या नावावरून या वनस्पती वंशाचे नाव दिले. अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोसी कुलामधील […]
रक्त चंदन म्हटले की बहुतेक जणांना चंदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते. सफेद चंदनाचे फेसपॅक, अगरबत्ती, किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊ यात. […]
आपल्या दातांना आपले आरोग्य व सौंदर्याचा आरसा मानला जातो. मात्र बहुतेक जणांना कमी वयातच दातांच्या दुखण्याला सामोरे जावे लागत असते. दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ न करणे हेच दातांच्या दुखणामागील प्रमुख कारण असते. दातांच्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजाराला पायोरिया असे म्हटले जाते. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दात ठिसूळ होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. […]
शीतल गारवा, तृप्तता देणारा, आयुष्याला उभारी देणारा ‘वसंतराजा गुलमोहर’. कधी कधी निसर्गात घडणा-या काही मोहक गोष्टी खूप काही सुखाचे क्षण आपल्या ओंजळीत सहजपणे टाकतात. […]
चहा म्हणजे ना, आपला वीक पॉईंट. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहा लागतो असं नाही म्हणता येणार, कारण परदेशातील लोकांप्रमाणे रात्री जेवणानंतर चहा पिण्याची फॅशन अजून तरी आपण स्वीकारलेली नाही. पण चहाचं नाव जरी काढलं ना तरी चहाचा एक तरी घोट पोटात जावा म्हणून आपण धडपडू लागतो आणि तो ग्रहण केल्यावर अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं. चहा मिळाली नाही तर आपण किती अस्वस्थ होतो, नाही का? सकाळी उठल्यावर अंघोळ नाही करता आली तर चालेल, पण चहा पाहिजे. […]
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले. सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या. […]