श्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. गंगा नदी मोक्षदायिनी मानली जाते. पहिल्या आठ श्लोकात गंगेच्या धरतीकडे प्रवासाचे मनोहारी वर्णन, तसेच गंगाजलाची महती वर्णिली आहे. नवव्या श्लोकात आचार्यांनी भक्तीचे परमोच्च शिखर गाठून शैव-वैष्णव वादावरही पडदा टाकला आहे. […]
‘फॉरच्युन’ आणि ‘लाईफ’ या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, ‘लाईफ’ मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते ! प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले. […]
आपल्याकडे गावोगावी, शहराशहरात असतात तशी वाण्यांची दुकाने अमेरिकेत दिसत नाहीत. इथे ‘राल्फस्’, ‘वॉलमार्ट’, ‘कोलह’, ‘टारगेट’, ‘मायकल’, ‘स्पेक्ट्रम’.. अशा मोठमोठ्या मॉल्सची साखळी असते. त्यामध्ये जगाच्या भिन्न भिन्न कोपऱ्यात तयार होणाऱ्या असंख्य वस्तू वेळोवेळी येत असतात. […]
त्या बारा वर्षांच्या गीताचे वडील म्हणजेच ज्येष्ठ चित्रकार व कलागुरू सावळाराम लक्ष्मण हळदणकर! १९२९ साली काढलेले ते ‘ग्लो आॅफ होप’ हे चित्र आज म्हैसूर येथील जगमोहन पॅलेस मधील जयचमा राजेंद्र आर्ट गॅलरीत पहायला मिळते. हळदणकरांना हे चित्र काढण्यासाठी, गीताला रोज तीन तास असे तीन दिवस समई हातात धरुन त्या पोजमध्ये उभे करावे लागले होते. या चित्राचे एक दुर्दैव असे आहे की, कित्येकजण या चित्राचे श्रेय राजा रविवर्माला देतात, जे चुकीचं आहे. […]
सुधीर मोघेंच्या गीताच्या ओळी – ” एकाच या जन्मी जणू , फिरुनी नवी जन्मेन मी ! ” खऱ्या अर्थाने लागू पडतात शाळा-महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यांना ! […]
आजकाल आपल्यापैकी अनेकजण अमेरिकेत येत जात असतात. अमेरिकेविषयी त्यांना माहितीही असते. त्या माहितीत मी ही थोडी भर घालीत आहे. मुळात अमेरिका ही अन्य देशांतील लोकांना सर्वस्वी अपरिचित होती.. भारताच्या शोधात कोलंबस निघाला आणि तो अमेरिकेच्या किनाऱ्याला लागला. […]
एक काळ होता… जेव्हा दुरदर्शनवर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्हीवर सायंकाळी साडेसात वाजता दिल्या जाणाऱ्या बातम्याही मोठ्या औत्स्युक्याने आणि विश्वासाने घराघरातून पाहिल्या जायच्या.. त्यावरच्या बातमीदारांना नावानिशी पक्के ओळखले जायचे.. त्यांची प्रत्येकाची ढब, शैलीचे कौतुक आणि अनुकरण केले जायचे.. मग त्या भक्ती बर्वे-इनामदार असोत वा रंजना पेठे… प्रदीप भिडे, अनंत भावे असोत वा विनायक देशपांडे… या सर्वांच्या बातम्या लक्षपुर्वक ऐकल्या जायच्या… […]
कानांत बोळे घालून मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त असलेल्या महाराष्ट्रपुत्रांनो हे ऐका. तुमच्या गौरवशाली इतिहासाचा तुमच्या परंपरेचा तुम्हाला विसर पडला आहे पण आजही हजारो किलोमीटर दूर मराठयांच्या पिढ्या आज अडीचशे वर्षांनंतरही आपली मराठी संस्कृती अभिमानाने मिरवत सन्मानाने जगत आहेत. जर कधी तीर्थक्षेत्र भेटीचा योग आलाच तर कुरुक्षेत्र आणि पानिपताला नक्की भेट दयावी कारण पानिपतची ही भूमी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. […]
एमेलियाने दोन हजार सव्वीस मैलांचा अॅटलांटिकचा विमानोड्डाणाचा प्रवास फक्त चौदा तासांत केला होता. या चौदा तासांत झोप वा डुलकी लागू नये म्हणून तिने ‘स्मेलिंग सॉल्टचा वापर केला होता. तसेच खाद्यपदार्थांच्या तिने टोमॅटो सूप म्हणून सेवनामुळे सुस्ती येऊ नये म्हणून वा झोप येऊ नये थर्मासमधून व डब्यामधून सोबत नेले होते. […]
आदिमानवाच्या काळात माणूस जंगली प्राण्यांप्रमाणे मुक्त रहात होता. भटकंती करताना कंदमुळं खात होता. कालांतराने प्रगती झाली. तो व्यवस्थित जेवण करु लागला. ऋषिमुनीं आपल्या कुटीमध्ये मांडी घालून पत्रावळीवर भोजन करु लागले. रामायण, महाभारतातसुद्धा मांडी घालूनच सर्वजण भोजन करीत होते. […]