नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

चित्रतपस्वी साबानंद मोनप्पा

१९३२ च्या काळातील गोष्ट आहे. एका सोळा वर्षांच्या मुलाला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील चेन्नईला पाठविण्याचा विचार करीत होते, मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. वडिलांना अशा हताश अवस्थेत पाहून त्या मुलाच्या मावशीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या व त्यांचे आलेले पन्नास रुपये मुलाच्या हातावर ठेवले. तोच मुलगा मोठेपणी चित्रकार एस. एम. पंडित म्हणून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावारूपाला आला. […]

दृष्टावलेलं कोकण

कोकण रेल्वे आली, रस्ते महामार्ग आले. कोकणची आर्थिक भरभराट झाली पण माणसांच्या वाढत्या गर्दीत कोकणी माणसाचे घर शोधूनही सापडत नाही मग प्रश्न उपस्थित होतो- ती प्रगती तो विकास नक्की कुणासाठी होता? […]

“नितळ” – आयुष्याचा तळ ढवळून टाकणारा आरसा !

दोन तास दहा मिनिटे संगणकाच्या पडद्यापासून हलू न देणारा हा नितांतसुंदर चित्रपट बघून मी भारावलो. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी हा २००७ चा चित्रपट तू-नळीवर आला. ठळक कोडाचे अंश (डाग, पट्टे ) चेहेऱ्यावर बिनदिक्कत मिरवणारी आणि ते स्वीकारलेली डॉ देविका येते तिच्या रानडे नामक डॉ मित्राच्या घरी आणि तिला आपली “भावी” मानताना सगळ्यांची ओढाताण एवढा हा एक दिवसाचा चित्रपट (तरुण पिढी अपवाद, त्यांना तिच्या कोडासकट तिला स्वीकारायला काही अडचण नसते, आणि अर्थातच वृद्ध मंडळी, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जगाचे असे अनेक अनुभव असतात)! […]

‘चक्र’ – कादंबरी ते चित्रपट

मराठीतील अनेक नामवंत लेखकांच्या कादंबऱ्यावरुन आजवर चित्रपट निर्मिती झालेली आहे. तसाच जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ या कादंबरीवरुन १९८१ साली ‘चक्र’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याविषयीचा दळवींना आलेला अनुभव त्यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकातील एका प्रकरणात मांडलेला, माझ्या वाचनात आला. […]

हाना झेन —दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

हानाचा जन्म 17 जुलै 1921रोजी बुडापेस्ट हंगेरी येथे एका ज्यू कुटुंबात झाला.  तिचे वडील एक पत्रकार व नाटककार होते. ती सहा वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तिचे नाव प्रोटेस्टंट शाळेत नाव घातले,ती शाळा ज्यूना सुद्धा प्रवेश देत असे. पण त्यांना प्रोटेस्टंट पेक्षा दुप्पट,तिप्पट पैसे भरावे लागत होते.हाना 1939 मध्ये पदवीधर झाली त्यानंतर ती उत्तर इस्राइलच्या नहललयेथे मुलींच्या शेतकी शाळेत शिकण्यासाठी गेली. […]

हेविवा रेक – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

हेविवाचा जन्म 22 जून 1914 रोजी नदाबूला या स्लोवाकिया मधील  खेड्यात झाला. तिचे बालपण बांसका बस्तरिका येथे गेले. तिने होमशोर होतजे ह्या  ज्यू संघटने मध्ये प्रवेश केला. तसेच पालमाच संस्थेमध्ये काम करू लागली 1939 मध्ये जगभर असलेल्या विस्थापित ज्यू लोकांच्या मदतीसाठी निघालेल्या संघटनेसाठी काम करायला सुरुवात केली. […]

सोशलमिडिया : वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस – सबकुछ

वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस, सगळ्यांचीच भूमिका एकाचवेळी निभावू शकणारी सोशल मिडिया सध्या जगामध्ये अवतरली आहे. लिहून वाचून मोठी झालेली आमची शेवटची पिढी जोपर्यंत जगात आहे तोवर या सगळ्यांचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यानंतर मात्र अवघड आहे. […]

आशीर्वाद

लहान लहान म्हणता म्हणता लेकरू कॉलेजकुमार झाला आणि सहाजिकच बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यातलाच एक बदल म्हणजे अभ्यासाची पुस्तकं घेण्याचं दुकान. शालेय पुस्तकं पाठ्यपुस्तक मंडळाची. सगळी अगदी ठरलेली. […]

वेरा लीग —दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

वेरा लीचा जन्म 17 मार्च 1903 रोजी leeds इंग्लंड येथे झाला. तिचे मूळचे  नाव वेरा ग्लास पण तिला लहानपणीच एच इगन लीग ह्या रेसकोर्सच्या घोड्याना ट्रेनिंग देणाऱ्या माणसाने दत्तक घेतले त्यामुळे ती वेरा लीग झाली. तिचे लहानपण मेसन लिफि ह्या घोड्यांच्या तबेलयांच्या आसपास गेले. लहानपणी तिला मोठे झाल्यावर जॉकी बनायचे होते. […]

अतिप्राचीन पाकशास्त्र!

आजच्या माणसाचे भाऊबंद असणारी निअँडरटाल ही जाती सुमारे चार लाख वर्षांपूर्वी निर्माण झाली आणि सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तंगत झाली. आजचा माणूस – होमो सेपिअन्स – हा तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या दोन्ही जाती दीर्घ काळ एकाच वेळी अस्तित्वात होत्या. अतिप्राचीन काळच्या या दोन जातींचा आहार नक्की कोणता होता, याबद्दल संशोधकांत मतांतरं आहेत. […]

1 39 40 41 42 43 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..