भारतीय नोटांना रिझर्व्ह बँकेकडून क्रमांक दिले जातात. नोटेवर मालिका आणि क्रमांक छापले जातात. त्यामुळे बँकेला प्रत्येक नोटेचा हिशेब ठेवता येतो. नोटेवर नोट धारकाला तेवढे पैसे देण्याचे अभिवचन छापलेले असते. एक रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिवांची तर इतर सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. […]
वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर स्वतःला विसरणे, हे पुष्कळ कठीण असते, पण तेव्हढेच जरुरीचे असते. आईच्या गर्भात एका नव्या जीवाचा पहिलं हुंकार आणि वृद्धकाळी जीवनाच्या अंताला घेतलेला शेवटचा श्वास, हे परिघावरील दोन बिंदू समजले, तर एक वर्तुळ पूर्ण होते. याला आपण जीवनचक्र म्हणून संबोधितो. आयुष्यातील 15 ते 65 वर्षाचा मधला काळ सोडून दिल्यास लक्षात येते की सुरुवातीची आपल्या आयुष्यातील स्थित्यंतरे, ही उलट्या क्रमाने परावर्तीत होत आहेत. […]
केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. […]
आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आपण व आपला समाज आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की, त्याच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला आग्रह आणि अट्टाहास असतो. अशा साचेबद्ध रचनेत सर्वात जास्त अन्याय झालेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. […]
16 जून 1943 ला सिसिलिने लॉर व्हेलित प्रवेश केला.तिने कुरियर म्हणून शस्त्रे स्फोटके पोचवण्याचे काम केले. ज्यामुळे फ्रांस गुप्तहेरानी रुळ उखडणे,पॉवर स्टेशन, कारखाने,उधवस्थ केले. ज्यामुळे जर्मन सैनिक सावध झाले.त्यामुळे एसओई गुप्तहेर संघटनेच्या हेराना सावध रहाण्याचे आदेश दिले गेले. […]
अंटार्क्टिका खंडावरच्या जमिनीचा मोठा भाग बर्फानं व्यापला आहे. या बर्फाच्या थराखाली पाण्याचे अनेक ‘तलाव’ अस्तित्वात असल्याचं, यापूर्वीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. हे तलाव बर्फाच्या तळाशी, पृष्ठभागापासून दोन ते चार किलोमीटर खोलीवर वसले आहेत. यातले काही तलाव एकमेकांना जोडले आहेत. […]
– सागरतळावरचं व्ही-१३०२ जहाज…(Image credit: Frontiers in Marine Science) इंग्लंडच्या पूर्वेला असणारा ‘नॉर्थ सी’ हा समुद्र पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत होता. इंग्लड, फ्रान्स, बेल्जिअम, नेदरलँड्स, जर्मनी आणि डेन्मार्क या देशांना चिकटून वसलेल्या या समुद्रातून, महायुद्धांच्या काळात मोठ्या प्रमाणात युद्धनौकांचा संचार होत असे. युद्धाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील झालेल्या या प्रदेशात, दोन्ही महायुद्धांदरम्यान शेकडो […]
मी सर्वप्रथम ‘नाण्यांचा इतिहास’ अभ्यासला आणि मला नाण्याविषयी मौलिक माहिती मिळत गेली. प्राचीन भारतीय साहित्यात बृह्दारण्यक, उपनिषद, अग्निपुराण, मस्यपुराण, मनुस्मृती इत्यादी प्राचीन ग्रंथात सुवर्ण, द्रम, कार्षापण, निष्क, कृष्णल, रूप्य ही नाणीवाचक नावे आढळतात. […]
ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व… हा विषय मोठा आहे. श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठांच्या रांगेत समाविष्ट होणे अत्यावश्यक असते असं नाही. तरूण वयातही श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकतं. जसं की ज्ञानेश्वर माऊलींनी तरुण वयात ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानदेवी’ ही गीताटीका लिहिली. सर्वसामान्यांपर्यंत तत्त्वज्ञान पोचवले. […]
त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते. […]