मी सर्वप्रथम ‘नाण्यांचा इतिहास’ अभ्यासला आणि मला नाण्याविषयी मौलिक माहिती मिळत गेली. प्राचीन भारतीय साहित्यात बृह्दारण्यक, उपनिषद, अग्निपुराण, मस्यपुराण, मनुस्मृती इत्यादी प्राचीन ग्रंथात सुवर्ण, द्रम, कार्षापण, निष्क, कृष्णल, रूप्य ही नाणीवाचक नावे आढळतात. […]
ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व… हा विषय मोठा आहे. श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठांच्या रांगेत समाविष्ट होणे अत्यावश्यक असते असं नाही. तरूण वयातही श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकतं. जसं की ज्ञानेश्वर माऊलींनी तरुण वयात ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानदेवी’ ही गीताटीका लिहिली. सर्वसामान्यांपर्यंत तत्त्वज्ञान पोचवले. […]
त्याच्याबरोबरच भारतीय चित्रसृष्टीतले प्रणयाचे पर्व अस्ताला गेले. अल्लड, खोडकर, बालीश ,धीरगंभीर , उत्कट,मनस्वी,अस्सल हे सारे प्रणयाचे, रोमँटिझमचे रंग हा जादूगार जाताना बरोबर घेऊन गेला. सतत भव्योदात्त असे काहीतरी पाहणारे निळ्या डोळ्यांचे मायाजाल आवरते घेऊन हा अवलिया आपला खेळ संपवून गेलाय. फार कमी नजरांना असे वरदान असते आणि पडलेली स्वप्ने खरी करण्याचे सामर्थ्य असते. […]
दक्षिण आफ्रिकेतल्या फ्री स्टेट इलाख्यात व्रेडफोर्ट नावाचं एक लहानसं शहर आहे. या शहराचं वैशिष्ट्य हे आहे की, हे शहर एका विवरात वसलं आहे. व्रेडफोर्टचा परिसर हा डोंगराळ भाग आहे. हा डोंगराळ भाग प्रत्यक्षात, प्राचीन काळातल्या एखाद्या ज्वालामुखीचे अवशेष असल्याची शक्यता पूर्वी व्यक्त केली गेली होती. परंतु व्रेडफोर्टचा हा परिसर म्हणजे अशनीच्या आघातामुळे निर्माण झालेलं एक विवर […]
गणपतीला ‘नवीन आरंभाची देवता’ म्हणून ओळखले जाते आणि हे आपल्याला आठवण करून देते की कोणत्याही प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग प्रथम सुरू करणे आहे. म्हणूनच लोक सहसा ‘श्री गणेशा करूया’ असे म्हणतात ज्याचा अर्थ ‘चला सुरू करा’ असा होतो. इथेच आम्ही आमचा पहिला धडा शिकतो की जेव्हा पैसे कमवायचे असतात तेव्हा तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचे पहिले पाऊल उचलले पाहिजे […]
क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल किंवा आभासी चलन आहे जी देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. हे वास्तविक-जागतिक चलनासारखेच आहे, त्याशिवाय त्याचे कोणतेही भौतिक स्वरूप नाही आणि ते कार्य करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरते. […]
अध्यात्म तीन पैलूंनी बनलेले आहे; नातेसंबंध, मूल्ये आणि जीवनाचा उद्देश हे होत. अध्यात्मात भावना, संवेदना किंवा असा विश्वास आहे की, माझ्यापेक्षा काहीतरी मोठे आहे, संवेदनात्मक अनुभवापेक्षा मानव असण्यापेक्षा काहीतरी अधिक आहे आणि ज्याचा आपण भाग आहोत. […]
आजचा माणूस सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दोन पायांवर चालू शकत होता. पण तेव्हा माणूस हाच फक्त काही द्विपाद प्राणी नव्हता. माणूस जन्माला येण्याच्या सुमारे एक लाख वर्षं अगोदर जन्माला आलेल्या निअँडरटालसारखे, माणसाचे इतर भाऊबंदसुद्धा दोन पायांवर चालू शकत होते. इतकंच काय, पण त्या अगोदर चाळीस लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या […]
नोटा छापणे, नाणी तयार करणे याव्यतिरिक्त देशाचे चलन अधिक सुरक्षित करणे आणि त्याद्वारे बनावट चलनाला दूर ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी असते. आपली रिझर्व्ह बँक, नोटांची प्रेस आणि नाण्यांची टांकसाळ इथून आवश्यक चलन निर्माण करून त्याची वितरण व्यवस्था करते जी सक्षम आहे. […]
वानप्रस्थासाठी आता वनात जाण्याची जरूरी नाही. वेळ मिळेल तेव्हा, शक्य होईल तेवढी निसर्गात भटकंती करावी. घरात निदान छोटी बाग तयार करून त्याची निगा राखावी. सूर्य, चंद्र, चांदण्या पहाव्यात. संगीतात मन रमवावे. कमी खावे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. […]