“यावचंद्रदिवाकरौग्निहोत्रंजुहुयात” – श्री साईनाथांच्या एकशेंचौथ्या स्मृति दिनानिमित्ताने…. लेखक : कॅ. विवेकानंद र. नूलकर आजीवन अग्निहोत्र चालविणाऱ्या श्री साईनाथांच्या शिरडीखेरिज अन्य अग्निहोत्र ऐकिवात वा वाचनांत नाहीत. श्री साईनाथ देहधारी असतांना व आतां सूर्य-चंद्र असेपर्यत चालणारे असे हे अग्निहोत्र आहे. ( पारसी अग्यारी अपवाद धरावा, तर ज्वालाजी हि. प्र. भूगर्भ अग्नि आहे.) मशीदीत तर अग्नी नाहीच. अग्निहोत्र चालविणारे […]
दसऱ्याला सांस्कृतिक पैलूही आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जेव्हा शेतकरी आपल्या शेतात सोनेरी पीक उगवल्यानंतर अन्नधान्याची संपत्ती घरी आणतो तेव्हा त्याचा आनंद आणि आनंद टिकत नाही. या आनंदाच्या प्रसंगी, तो देवाच्या कृपेचा स्वीकार करतो आणि तो प्रकट करण्यासाठी त्याची पूजा करतो. […]
युद्धाच्या काळात जिम बराच काळ बाहेर होता. त्याची बहीण मॅगी कालाढूंगीला एकटीच रहात होती. तेव्हा दळणवळणाची साधने पण नव्हती. जवळचे मोठे शहरसुद्धा २० किलोमीटर दूर! पण मॅगीच्या सुरक्षिततेची चिंता जिमला क्षणभरसुद्धा वाटली नाही. कारण ती त्याच्या मित्रांच्या सहवासात पूर्ण सुरक्षित आहे याची त्याला खात्री होती आणि हे मित्र म्हणजे भारतीय लोकच होते. त्यांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास […]
भुदरगड येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखक -शिवाजी सावंत म्हणाले होते- “अश्रुंचे वय किती ?” डोळ्यात उगवल्यापासून ते ओघळून जाईपर्यंत (किंवा डोळे कोरडे होईपर्यंत)कां खूप आधीपासून (आत खोलवर साठल्यापासून ते कधीच बाहेर न येईपर्यंत?) लताच्या स्वरांचे वय काय? कानावर पडल्यापासून ते विरून जाईपर्यंत की मी जन्मल्यापासून आजतागायत जे मी आत साठवून ठेवलंय (आणि जे माझ्याबरोबरच संपेल) तेथपर्यंत? […]
चित्तपावन ब्राह्मण वर्गात हे व्रत विवाहानंतर सलग पाच वर्षे करतात. त्याचा विधी थोडा भिन्न आहे. सकाळी देवीची पूजा करतात. त्यापूर्वी तुळशीची पूजा करून तेथील विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढे खडे आणून देवीजवळ ठेवतात. १६ पेरांची दुर्वा किंवा सोहळा धाग्यांचा रेशमी दोरा घेऊन विवाहास जेवढी वर्षे झाली असतील तेवढ्या गाठी मारतात. […]
जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, ‘माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.’ जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा […]
जगातील ६० टक्के लोक किनाऱ्यापासून ६० कि. मी.च्या प्रदेशात राहतात. साहजिकच किनारी भागातील लोकांना पुरातन काळापासून हवा, वनस्पती व त्यांचे महत्त्व माहीत होते. खारफुटी- संदर्भात दंतकथा, इतिहास ज्ञात आहे. भारतापुरते बोलायचे तर चेन्नईजवळ चिदम्बरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’ म्हणून एक मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात. सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता […]
वातावरण, व्यक्ती.. ह्यांचा प्रभावापासून मुक्त असलेली आत्मा दुसऱ्याला positive energy देऊ शकते. विचारांचे परिवर्तन सर्व गोष्टीना परिवर्तन करते. लक्ष्मीदेवीचे हात वरदानी, धन देताना दाखवतात म्हणजेच जी आत्मा भरपूर व शक्तिशाली आहे तीच निस्वार्थ राहून देऊ शकते. […]