नरभक्षकांची शिकार साधताना त्याला विलक्षण खडतर तपश्चर्या करावी लागली. हिमालयाच्या थंडीवाऱ्यात, पावसात, उघड्यावर रात्रंदिवस जागत, निश्चित अन्नपाण्याशिवाय दिवसामागून दिवस काढणे ही सोपी गोष्ट नाही. एका वेळी तर गळू झाल्याने त्याचा डावा डोळा पूर्ण बंद झाला होता. कानाच्या पडद्याला भोक पडल्याने ऐकू येत नव्हते. अशा अवस्थेत काहीवेळा दिवसरात्र झोपेशिवाय केवळ चहा बिस्किटांवर राहून काढल्यावरच त्याची नरभक्षकाशी गाठ […]
मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णा: । त्रिभुवनमुपकार श्रेणिभिः प्रीणयन्तः ।। परगुणपरमाणून्पर्वती कृत्य नित्यम । निज हृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः ॥ -भर्तृहरि ज्याचे मन, वचन व शरीर पुण्याच्या अमृताने परिपूर्ण आहे, आपल्या परोपकारी वृत्तीने जे सर्वांना आनंदित करतात, दुसऱ्याच्या गुणांचे आचरण करतात, रंजल्या गांजल्या लोकांना आसरा देतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात, निरपेक्ष वृत्तीने राहतात अशी सज्जन माणसे […]
मला जर कोणी विचारले की “स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय?” एका क्षणाचाही विलंब न लावता मी हिमालयाचे नाव घेईन. या नगाधिराजाचे रूप दिवसाच्या प्रत्येक प्रहरात, प्रत्येक ऋतूत आगळे वेगळे असते. विशेषत: ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात त्याचे दिसणारे रूप अतिशय मोहक असते. निळ्याभोर आकाशात रेंगाळणाऱ्या मेघमाला, काही मेघ पर्वत शिखरांभोवती रुंजी घालत असतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर आकाशाचा वेध घेणारी हिमशिखरे, […]
बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांची ‘बाभूळ झाड’ कविता खूप गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्णन ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु:ख आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेत वर्णन केला आहे. […]
नरसिंह मंदिरातील नरसिंहाच्या मूर्तीचा डावा हात कृश आहे व असे सांगतात की जेव्हा हा हात गळून पडेल तेव्हा नैसर्गिक उत्पात घडतील. नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळून पडतील व बद्रीविशालचे मंदिर कायमचे बंद होईल आणि मग ‘भविष्यबद्री’ बद्रीनाथ म्हणून पुजला जाईल. नरसिंह मंदिराजवळ दुर्गामंदिर आहे. या मंदिरात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघटा, कुशमांडा, स्कंदमाता, कल्याणी, काली, गौरी व सिद्धी अशा […]
अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी राजविद्याराजगुह्ययोग नावाचा नववा अध्याय श्रीभगवानुवाच । इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १ श्री भगवान म्हणाले, निष्कपटी तू म्हणुन तुला हे गुह्यज्ञान देतो जे जाणुन घेता अशुभातुन मुक्तिलाभ होतो १ राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । […]
श्रीहरीने आपले नेत्रकमल उघडले आणि विश्वकल्याणासाठी त्याने सुरू केलेल्या तपोसाधनेची सांगता झाली. चराचरात ॐकार भरून राहिला होता. एक छोटेसे बोरीचे झाड श्रीहरीवर सावली धरून उभे होते. तेच तपोसाधनेच्या काळात ऊन, वारा, पाऊस, बर्फापासून श्रीहरीचे रक्षण करत होते. श्रीहरीने ओळखले, ‘आदिमाया महालक्ष्मीच बोरीच्या झाडाचे रूप घेऊन आपले रक्षण करत होती.’ तो विश्वाचा पालनकर्ता मनोमन सुखावला. प्रसन्न होऊन […]
आपल्या दुर्दैवाने आजवर आपल्याला सावरकरांबद्दल पाठ्य पुस्तकातून फक्त दीड पान माहिती दिली गेली. त्यांच, लंडन मधील कार्य,जगप्रसिद्ध बोटीतील उडी,आणि अंदमानातील दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा. पुस्तकातील सावरकर एव्हढ्यावरच जाणूनबुजून संपवले गेले. गेली ७० वर्षे सावरकरांवर जाणूनबुजून अन्याय केला गेला. केवळ अन्यायच नाही तर बदनामी व उपेक्षा केली आहे.सावरकर हे केवळ क्रांतिकारक,द्रष्टे, समाजसुधारक किंवा भाषासुधारक नव्हते.तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.त्यातील काही पैलू माझ्या लिखाणातून क्रमिक लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पुढील पिढीला व ज्यांना सावरकर आणखी समजून घ्यावसे वाटतात त्यांच्यासाठी मी हा अल्पसा प्रयत्न करत आहे,तरी तुम्हाला लिखाण आवडेल अशी मी आशा करतो. […]
नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती. […]
सहा कोटी वर्षांपूर्वीच्या काळातले पेंग्विन हे आजच्या पेंग्विनपेक्षा खूपच वेगळे दिसत होते. त्या काळाल्या पेंग्विनचे पाय आणि चोची आताच्या पेंग्विनच्या तुलनेत खूपच लांब होत्या. तसंच त्यांचे पंखही सर्वसाधारण पक्ष्याच्या पंखासारखेच दिसत होते. उत्क्रांतीदरम्यान पेंग्विनच्या पिसांचा रंग लाल झाला. त्यानंतरच्या काळात हे पेंग्विन दोन पायांवर उभे राहू लागले. या पेंग्विनची उंची आजच्या सर्वांत मोठ्या पेंग्विनपेक्षाही अधिक होती. […]