नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

गंगेच्या उगमपाशी – गोमुख – भाग ३

मग येते गंगोत्री! येथील मुख्य आकर्षण म्हणजे ‘गंगेचे मंदिर.’ गंगेच्या मूळ मंदिराचा जिर्णोद्धार अमरसिंह थापा या नेपाळच्या गुरखा जनरलने केला. मात्र सध्याचे गंगेचे मंदिर जयपूर राजघराण्याने बांधले. त्यावर सोन्याचा कळस चढवला. गंगामातेला सुवर्णछत्र अर्पण केले. पांढऱ्या ग्रेनाईटने बांधलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून गाभारा व सभामंडप अशी त्याची रचना आहे. गाभाऱ्यात गंगा, यमुना व सरस्वतीच्या मूर्ती असून […]

रेल्वेच्या डब्यांतील स्वच्छतागृहं

प्रवासी रेल्वेमधील प्रत्येक डब्याला दोन्ही बाजूंना दोन अशी समोरासमोर एकूण चार स्वच्छतागृहे असतात. ती वेळोवेळी स्वच्छ ठेवणं, त्यांत व्यवस्थित पाणी पुरवठा करणं व दिवाबत्तीची सोय करणं, कडी कोयंडे तपासून दुरुस्त करून घेणं, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं; पण या महत्त्वाच्या कामात बऱ्याच वेळा निष्काळजीपणा आढळून येतो. त्यामुळे डब्यात शिरताना दाराजवळच येणारी तसंच प्लॅटफॉर्मवर येणारी दुर्गंधी […]

दत्तात्रय काप्रेकर – एक असामान्य गणिती

बऱ्याच जणांना गणित आवडत नाही पण गणितात खूप गमती जमती असतात. आज अशाच काही गमती आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या गमती काही विशिष्ट आकड्यांशी आणि एका व्यक्तीशी संबंधित आहेत. त्या व्यक्तीचं नाव दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर. […]

गंगेच्या उगमपाशी गोमुख – भाग २

गंगा ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. सर्व पुराणात गंगेचे महात्म्य वर्णन आहे. स्कंदपुराणात——— तद्तत् परमं ब्रह्म द्रव रूप महेश्वरि । गंगारूपं यत् पुण्यतमं पृथिव्यामागतं शिवे ।। म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे. […]

मालगाडीचे डबे (वाघिणी)

‘मालगाडी वाहतूक’ हे रेल्वेचं सर्वांत जास्त उत्पन्न असलेलं खातं आहे. सामानाच्या गरजेनुसार मालगाडीचे डबे तयार करणं हे महाजिकरीचं काम असतं. डबे बनवल्यानंतर प्रत्येक विभागाचे डबे एकाच मालगाडीला जोडले जातात व काही महिन्यानंतर त्यांची तांत्रिक क्षमता उत्तम साधण्यासाठी ते डबे पुन्हा आपापल्या विभागाकडे पाठविले जातात. मालगाडीचे डबे खालील गोष्टी वाहून नेत असतात: धान्याची पोती मिठागरातील मीठ लाकूड, […]

गंगेच्या उगमापाशी- गोमुख -भाग १

प्राचीनकाळी इक्ष्वाकु वंशातील महापराक्रमी, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा पुण्यशील चक्रवर्ती सगर राजा राज्य करत होता. या सगर राजाला साठ हजार पुत्र होते व ते सर्वजण आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. एके दिवशी सगर राजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्याने ऋषीमुनींचा सल्ला घेतला. सर्वांनाच ही कल्पना आवडली. यज्ञाची सिद्धता झाली. अश्वमेध यज्ञाचा घोडा सिद्ध झाला. […]

भारतमातेच्या वीरांगना – ५९ – भगिनी निवेदिता

त्यांनी आपल्या शाळेतून ‘वंदे मातरम्’ चे गायन सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. लॉर्ड कर्झन ह्यांच्या विचारांची पोल सगळ्यांसमोर उघडी केली, ते नेहमी पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करत आणि पूर्वेकडील संस्कृती ला कमीपणा देत. भगिनी निवेदित्यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड कर्झन ला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. भारतीय लोकांमध्ये स्वदेशीचा प्रचार, प्रसार केला. […]

रेल्वेचे प्रवासी डबे

ज्या रेल्वेनं आपण प्रवास करणार, त्या गाडीचा प्रवासी डबा हा प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आज सुखसोयींनी युक्त डबे सर्वत्र उपलब्ध आहेत, पण सुरुवातीच्या काळातले रेल्वेचे डबे फारसे आरामदायी नव्हते. अगदी इंग्लंडमध्येदेखील सुरुवातीला रेल्वेचा प्रवास अतिशय खडतर असाच होता. थंड हवामान, लवकर पडणारा अंधार, त्यांतच डब्यातील सोयी अगदीच जुजबी होत्या. थंडीने प्रवासी गारठून जात. काही […]

मंगळावरचे आवाज

बॅप्टिस्ट चाइड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून मंगळावर आवाजाला ‘दुहेरी’ वेग असल्याचं तर दिसून आलं आहेच; परंतु त्याचबरोबर आणखी एक गोष्ट निदर्शनास आली आहे. ती म्हणजे, सर्वच प्रकारच्या आवाजाच्या वेगात दिवसातील वेळेनुसार होणारा लक्षणीय बदल. मंगळावरच्या सकाळनंतर सर्वच ध्वनिलहरींचा वेग हळूहळू वाढत जाऊन मध्यान्हीच्या सुमारास तो कमाल पातळी गाठतो. त्यानंतर कमी होत-होत संध्याकाळपर्यंत तो बराच कमी झालेला असतो. […]

भारतमातेच्या वीरांगना – ५८ – सरला बहन

१९३२ साली भारतात आल्या. भारतात आल्यावर दोन वर्षे उदयपूर येथे एका शाळेत काम केले. त्यानंतर त्या गांधीजीसमवेत सेवाग्राम येथे आल्या. तिथे त्यांनी ८ वर्ष काम केलं. पण वर्ध्याचे वातावरण त्यांना फार पोषक ठरले नाही, इथल्या उन्हाने त्यांची वारंवार तब्येत बिघडू लागली, मग त्या कसोली, अलमोडा येथे आल्या. कुमाऔ घाटीतल्या महिलांसाठी त्यांनी फार मोठे काम उभे केले. त्याच बरोबर जंगल तोडी विरोधात सुद्धा मोठी मोहीम राबविली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात कुमाऔ जिल्ह्या त्यांनी एकत्रित आणला, तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटविली. त्यांचे नेतृत्व केले, परिणामी त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. त्याचा अवधी एकूण दोन वर्षांचा होता. […]

1 51 52 53 54 55 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..