केदारनाथहून येणारी, निळ्या रंगामुळे खुलणारी, शांत वाहणारी मंदाकिनी तर बद्रीनाथहून आदळत, आपटत खळाळत धावणारी अलकनंदा यांचे संगमस्थान म्हणजे ‘रूद्रप्रयाग’. या स्थानाचे उल्लेख स्कंदपुराण तसेच महाभारतात आले आहेत. श्रीशंकर पार्वतीमातेला सांगतात, “हे देवी, माझे तिसरे निवासस्थान रूद्रालय या नावाने प्रसिद्ध आहे. ते सर्व तीर्थांत उत्तम तीर्थ आहे. या स्थानाच्या स्मरणानेसुद्धा व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते. […]
७ नोव्हेम्बर १९२५ साली त्या भारतात आल्या, त्यांना घ्यायला सरदार वल्लभाई पटेल, महादेव देसाई आणि स्वामी आनंद गेले होते. इथे आल्यावर त्या हिंदी भाषा शिकल्या, भगवद्गीता शिकल्या, आणि गांधीजींच्या आश्रमाची पूर्ण कार्यपद्धती स्वीकारली, मैडलीन च्या मीरा बहन झाल्या, स्वाभाविकच आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचासुद्धा त्या हिस्सा बनल्या. तत्पूर्वी १९३१ साली लंडन ला झालेल्या गोलमेज परिषदेच्या त्या हिस्सा बनल्या. १९३१ साली असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला परिणामी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी भारताची बाजू इतर देशांसमोर मांडायला सुरवात केली. […]
सुरुवातीच्या काळात प्रवाशांकडे प्रवासासाठी कंपासही नव्हतं , त्यावेळी यांना अनेक अडथळे प्रवास करताना घ्यायचे. तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे साधनांचा योग्य तो उपयोग करून प्रवास करायचे . सुरुवातीला दर्यावर्दी हे तेथील ठिकाणाच्या निसर्गा कसा आहे . त्याचा उपयोग करून तेथील ठिकाण ओळखत असे. दर्यावर्दी प्रवाशांसाठी पहिलं महत्त्वाचा साधन म्हणजे आकाशातील ग्रह , तारे असायचे . ग्रहताऱ्यांच्या खानाखुना वरून ते प्रवास करायचे . आकाशातील गोष्टींचा उपयोग करून पुढील डोंगरदऱ्यातून प्रवास करायचे. त्या ग्रहताऱ्यांच्यावरून तिथे कोणता परिसर आहे . याचा ते योग्यरीत्या अंदाज लावायचे . व त्यांचा प्रवास सुखकर करायचे. […]
रेल्वेची चाकं व्यवस्थितपणे, विनासायास फिरत जातील अशा ‘दोन समांतर रेषेत असलेल्या; कठीण, तरीही गुळगुळीत अशा; सलग व लांबच लांब लोखंडी पट्टया’ म्हणजे रेल्वेचा ‘ट्रॅक.’ तो व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक धोकादायक अडचणींवर मात करावी लागते आणि तो बनविण्यासाठी कल्पनेबाहेर खर्च येतो. आजच्या जमान्यात रेल्वेची बांधणी ही बाब अतिशय सहजपणे गृहीत धरली जाते, त्यामुळे त्याकडे आवर्जून फारसं […]
सजीवाच्या शरीराचं स्वरूप, हा प्राणी आजच्या जेलिफिशसारख्या, छत्रीसारखा आकार असणाऱ्या आणि शुंडक धारण करणाऱ्या सागरी प्राण्यांच्या, मेडूसोझोआ या प्रकारचा प्राणी असण्याची शक्यता दिसून आली आहे. याचा शोध लावणाऱ्या संशोधकांनी या सजीवाला ‘ऑरालुमिना अॅटेनबरोई’ हे जीवशास्त्रीय नाव दिलं आहे. या नावातील पहिला भाग असणारा ‘ऑरालुमिना’ हा लॅटिन शब्द म्हणजे पहाटेची मशाल. जीवसृष्टीच्या उत्क्रांतीच्या पहाटेच्या काळात अस्तित्वात आलेल्या, मशालीसारखा आकार असणाऱ्या या सजीवाला पूरक असं हे नाव आहे. या नावातला ‘अॅटेनबरोई’ हा दुसरा शब्द प्रख्यात निसर्गअभ्यासक डेव्हिड अॅटेनबरो यांच्या गौरवार्थ वापरला आहे. […]
पूर्णागिरी टणकपूरपासून २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. दिल्लीहून टणकपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. साधारण ३३० कि.मी. चे हे अंतर असून या प्रवासाला ९-१० तास लागतात. मोरादाबाद, रूद्रपूर-खतीमा असा हा मार्ग आहे. लखनौ, नैनीतालहूनही टणकपूरला जाता येते. टणकपूर हे बऱ्यापैकी मोठे गाव असून सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पायथ्याशी असलेल्या या गावाचे मूळ नाव ‘ब्रह्मदेव.’ […]
भारतीय रेल्वेचं जाळं हे शहरं, गावं, खेडी यांना छेदत जातं. रेल्वेमार्गांच्या दुतर्फा वसाहती असतात. या वसाहतींतील रहिवाशांना दोन्ही बाजूंनी जाता-येताना रेल्वेमार्ग ओलांडावाच लागतो. भारतात अशा लेव्हल क्रॉसिंगच्या ३२,६९४ जागा असून, त्यांतील १७,८४१ ठिकाणी रेल्वेचा कर्मचारी २४ तास हजर राहून राखण करतो; परंतु १४,८५३ क्रॉसिंगच्या जागांवर कोणीही कर्मचारी नेमलेला नसल्यामुळे मार्ग असे नेहमीच सर्वांसाठी खुले असतात. जिथे […]
‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’ […]
हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे एकतेची भावना निर्माण होईलच. याशिवाय आपण आपल्याकडून आपल्या आसपास असलेल्या अशा एखाद्या कुटुंबालाही आपल्यात सामावून घेऊन एकतेची भावना जागृत ठेवूया. […]
माहितीचे प्रपात दूरदर्शन, वृत्तपत्रे,यू-ट्यूब, आंतरजाल आणि अशा अनेक समाजमाध्यमांकडून आपल्यावर बदाबदा कोसळत आहेत. हे उपयुक्त आहे की घातक -एकदा शांतपणे आणि आत्ताच ठरवायची वेळ आलेली आहे. […]