१९२३ साली काँग्रेस चे अधिवेशन त्यांच्या गावी झाले. त्यावेळी दुर्गाबाई तिथे कांग्रेस कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कडे खादी प्रदर्शनात कोणीही विना तिकीट प्रवेश करणार नाही ही जवाबदारी दिली होती. त्यांनी अगदी नेहरूंना सुद्धा तिकीट दाखवे पर्यंत सोडले नाही. त्या महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. असहकार आंदोलन,मिठाची चळवळ अश्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला, परिणामी १९३० ते १९३३ च्या दरम्यान त्यांना ३ वेळेस कारावास भोगावा लागला. कारावासात सुद्धा त्या इतर महिलांशी संवाद साधणे, त्यांच्या शैक्षणिक भूक जगविणे, त्यांना सामाजिक जाणिव करून देणे अशी सगळी कामे करत राहिल्या. […]
पंचबद्रीमधील शेवटचे स्थान म्हणजे भविष्यबद्री. जोशीमठापासून १७ कि.मी. अंतरावर मलारी रस्त्यावर ‘सुबैन’ या गावी भविष्यबद्रीचे मंदिर पर्वतराजीत दडले आहे. लोककथेनुसार जोशीमठाच्या नृसिंह मंदिरातील नृसिंह मूर्तीचा कृश होत जाणारा डावा हात गळून पडेल. त्यावेळी नर-नारायण पर्वत एकमेकावर कोसळतील व विशालबद्रीची वाट कायमची बंद होईल. तेव्हापासून भविष्यबद्रीलाच बद्रीनाथचे स्थान समजले जाईल. जोशीमठहून मलारी रस्त्यावर हे स्थान आहे. जोशीमठपासून […]
जानकीदेवी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकून काम करू लागल्या. सुरवात आपल्या सोन्याच्या आभूषणांच्या दानाने केली. मग स्वदेशीचा प्रचार सुरू झाला आणि विदेशी वस्तूंचा त्याग. विदेशी वस्तूंच्या होळीसाठी जानकी देवींनी आपले व घरातले सगळे विदेशी कपडे टाकून दिले, आणि स्वतः सूत कातून खादी चा वापर, प्रचार आणि प्रसार सुरू केला. […]
मायक्रोस्कोपचा विषय १७ व्या शतकाच्या पूर्वार्धात उद्भवला असे मानले जाते. त्याच वेळी जेव्हा शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी भौतिकशास्त्रातील लेन्सचा शोध लावला. लेन्सच्या शोधामुळे, त्यांच्या मूळ आकारापेक्षा मोठ्या वस्तू पाहणे शक्य झाले. यामुळे पाण्यात आढळणाऱ्या लहान आणि इतर सूक्ष्म प्राण्यांच्या क्रियाकलापांचे व्हिज्युअलायझेशन सुलभ झाले आणि शास्त्रज्ञांना त्यांच्याबद्दल नवीन तथ्ये कळली. […]
भारत सरकारच्या आधिपत्याखाली असलेल्या सरकारी खात्यांमध्ये सर्वांत जास्त कर्मचारी वर्ग हा रेल्वेखात्यात नोकरी करतो. त्यांची संख्या अंदाजे १४ लाखांपर्यंत आहे. साधारणपणे दर ४५० ते ५०० भारतीयांमध्ये एक व्यक्ती ही रेल्वेशी संलग्न असते. हा आकडा ज्यांना रेल्वेकडून पगार मिळतो त्यांचा आहे, रेल्वेशी जोडल्या गेलेल्या अनेक कंपन्या, बांधकामांवरील कर्मचारी, हे यांहून निराळेच असतात. स्टेशनवरील अनेक जोडधंद्यात असलेली मंडळी […]
१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम पुकारले गेले, अवध मध्ये बेगम हजरत महल आणि त्यांच्या सैन्याने इंग्रजी सैन्यावर जोरदार हल्ला बोल केला, पहिल्या हमल्यात त्यांना माघार घ्यावी लागली, अवध मधील गोंडा, फैजाबाद, सलोन, सुल्तापुर, सितापुर, बहराईच प्रांत इंग्रजमुक्त झालेत. बेगम हजरत महल च्या कुशल नेतृत्वाने प्रभावित होऊन इतर राज्य पण त्यांच्या बरोबरीने लढले. बेगम हजरत महल स्वतः हत्तीवरून या युद्धात आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होत्या. […]
लहानपणी बेहड्याची फळं दगडाने ठेचायची आणि त्यातील पिवळा गर खायचे मुलांचे उद्योग असायचे. बांधाच्या कडेने असणारे बेहडा खरं तर लक्ष्य वेधून घेणारा वृक्ष कधीच नव्हता. हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला की यांच्या पिवळसर फुलांची रास झाडाखाली पडलेली दिसते आणि तेवढाच घमघमाट. बेहडा वर्षभर एवढी रूपे बदलतो की प्रत्येक ऋतू मध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं. लालसर पालवी […]
बद्रीनाथपासून साधारण ३ कि.मी. अंतरावर मूर्तीमातेचे मंदीर आहे. सहस्रकवच राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी नर-नारायणाच्या रूपात मूर्तीमातेच्या उदरात प्रवेश केला व भूतलावर प्रगट झाले. त्यामुळे मूर्तीमाता बद्रीनाथाची आई समजून तिची पूजा केली जाते. मूर्तीमातेच्या मंदिराला माता मंदीर म्हणतात. वामन द्वादशीच्या दिवशी बद्रीनाथाची व मातेची भेट घडवून आणली जाते. शृंगारलेली बद्रीनाथाची चांदीची चतुर्भूज उत्सवमूर्ती वाजत गाजत या ठिकाणी […]
नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम् त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि || हे मातृभूमी, हे पुण्यभूमी, आम्ही तुझ्या मुली ज्यांचे तू पालन-पोषण केले, संवर्धन केले तुला नमस्कार करतो. हे वत्सले, मंगले, हिंदुभूमे तुझ्यासाठी आम्ही आपले जीवन समर्पण करतो. प्रार्थने मध्ये शक्ती असते हे आपण जाणतोच, त्याचे फळ अजूनच उच्च होते जेव्हा प्रार्थना सामूहिक केली […]