चैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो. […]
स्वातंत्र्य संग्रामातील विषय, कामाचा आढावा सामान्य जनतेपर्यंत पोचवायची एकच पद्धत त्याकाळात उपलब्ध होती, ती म्हणजे पत्रक, वृत्तपत्र इत्यादी. गुलाब कौर ह्यांनी पत्रकारकेची भूमिका घेतली आणि त्यायोगे, घरा-घरातुन स्वातंत्र्य संग्रामशी जोडलेले साहित्य पोहचवू लागल्या. लोकांमध्ये स्वातंत्र्य संग्रामाबद्दल जन जागृती करणे हे त्यांचे मुख्य कामच झाले जणू. एक पत्रकार म्हंटल की थोडी सहूलत पण मिळत असेल बहुदा म्हणून मग त्यांनी आपल्या शबनम बॅग मधून क्रांतीकारकांसाठी दारुगोळा, पिस्तुलं अशी ने आण सुरू केली. एकूणच त्याचा समजात वावर बघता इंग्रजांना त्यांच्यावर शंका येऊ लागली. ते पण एखादा सुगावा / पुरावा मिळतो का ह्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवूनच होते. दैवदुर्विलास एकदा अश्याच गुलाब कौर क्रांतिकारी साहित्याच्या वाटप करायच्या उद्देशाने बाहेर पडल्या, ह्यावेळी त्यांना पिस्तुलं आणि काडतुस पोहचवायची होती, पण त्या सगळ्या मुद्देमाला सह पडकल्या गेल्या. इन्कलाब जिंदाबाद चा नारा परत एकदा पूर्ण आसमंतात घुमला. […]
१८९० ते १९१० च्या दरम्यान चोवीस तास वा त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास करण्यासाठीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या. त्यावेळी प्रवासात जेवणाची, खाण्यापिण्याची सोय प्रवासी स्वत:च करत असत. चार ते पाच-कप्पी पितळी वा अॅल्युमिनियम डबे, फिरकीचे तांबे, खुजे अशा जय्यत तयारीनिशी प्रवासी मंडळी दूरच्या प्रवासास निघत. ब्रिटिश उच्च अधिकारी पहिल्या वर्गानं प्रवास करत. त्यांना ताजं जेवण लागत […]
ज्या काळात हिंदी चित्रपटात कलात्मक सिनेमा हे नावही अस्तित्वात नव्हते त्याकाळात व्यावसायिक व कलात्मक चित्रपटाचा उत्तम संगम ज्याने साधला ते होते बिमल रॉय. त्यांनी मी कलात्मक चित्रपट निर्मितो असा धिंडोरा पिटला नाही.ते म्हणत मी अतिशय सामान्य कलाकार आहे.मला वाटते कि मी हे लोकांसमोर मांडावे असे वाटते, ते मी चित्रपटामधून मांडतो. […]
या औषधांमुळे चेतासंस्था काही काळ काम करेनाशी होते व रक्तदाब कमी होतो. हृदयाचे ठोके कमी होतात. डॉक्टरांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. त्याचे व्हिडिओ व ऑडिओ चित्रण केले जाते. शासकीय रुग्णालयातच ही चाचणी करावी लागते. या चाचणीला ट्रुथ सिरम टेस्ट असेही म्हणतात, त्यात आरोपीला अर्धवट बेशुद्ध करून माहिती काढली जाते. […]
ही स्कंदपुराणाच्या मानसखंडातील कथा आहे. त्रेता युगात सूर्यकुलोत्पन्न चक्रवर्ती राजा ऋतुपर्ण अयोध्येवर राज्य करीत होता. एके दिवशी नल राजा आपली पत्नी दमयंती हिच्याबरोबर सारीपाट खेळत असताना खेळात हरला. शरमलेला नल राजा आपला मित्र राजा ऋतुपर्ण याच्याकडे आला व एखाद्या अज्ञात स्थळी आपल्याला लपवून ठेवण्याची ऋतुपर्ण राजाला विनंती करू लागला. ऋतुपर्ण राजा नल राजाला घेऊन हिमालयातील एका […]
१९४२ सालचे चले जावं आंदोलन असो वा सविनय अवज्ञा अभियान अन्नपूर्णा महाराणांची कामगिरी वाखाणण्या सारखीच होती. ह्या सगळ्या काळात त्यांना अनेकदा जेल यात्रा करावी लागली. प्रत्येकवेळी कारावसातून मुक्त झाल्यावर त्यांचा इंग्रजद्वेष आणि देशप्रेम दुपटीने वाढत होते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या कटिबद्ध होत्या. वेग-वेगळ्या कॉन्ग्रेसच्या सभांना त्या आवर्जून उपस्थित राहत. […]
S5 0014+81 हे मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर आहे. हे मानवाला २०२१ ला सापडले . याचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या ४० अब्जपट असून (वर्षाला ४००० सूर्यांच्या वस्तुमानाइतका पदार्थ गिळतं हे कृष्ण विवर) हे कृष्णविवर सातत्याने पदार्थ गिळंकृत करत असल्याने या कृष्णविवराभोवती अत्यंत तेजःपुंज अशी तबकडी तयार झाली आहे ,असे संशोधनाद्वारे दिसून येते . हे तेज आपल्या सूर्याच्या तेजाच्या ३०० पद्मपट (१ पद्म = १००० अब्ज) अधिक आहे किंवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या आकाशगंगेतील सर्व ताऱ्यांचं तेज एकत्रित पकडलं, तर त्या तेजाच्या २५००० पट अधिक तेजःपुंज आहे या कृष्णविवराची तबकडी. […]
आजच्या जमान्यात कमर्शिअल आणि समांतर सिनेमे असे सरळ सरळ दोन भाग सिनेपत्रकार पाडतात पूर्वी असे नव्हते.एक तर चांगला सिनेमा किंवा वाईट असे दोनच प्रकार असत. तरीही कमर्शियल व समांतर सिनेमाचा समन्वय साधला तो बिमल रॉय व त्यांचा चेला ऋषिकेश मुखर्जी यांनी. […]
भारतातील बऱ्याच मुख्य स्टेशनांच्या अगदी एका टोकाला एखादा प्लॅटफॉर्म किंवा यार्डाची एखादी दुर्लक्षित बाजू अशी असते, जिथे रेल्वे डब्यांचा फारसा वावर नसतो; परंतु अशा जागी एखादा जुना मोडकळीस आलेला डबा कायमचा रुळांवर असतो. ५ ते २० वर्षे वयोगटातील अनेक मुलं-मुली या डब्यालाच आपलं घर मानून तिथे मुक्काम ठोकतात. यांतील बऱ्याच मुलांना घरातून हाकलून दिलेलं असतं. काही वेळा घरच्या जाचाला कंटाळून नाइलाजानं काही जण रेल्वे प्लॅटफॉर्मचा आश्रय घेतात. […]