अॅमेझॉनच्या जंगलात लपलेली अशी दोन पुरातन शहरं, दक्षिण अमेरिकेतील बोलिविआ या देशात सापडली आहेत. बोलिविआतील मोजोस पठारांच्या परिसरात सापडलेली ही शहरं सहाशे वर्षं जुनी आहेत. या प्राचीन वसाहतींचा शोध लावण्यासाठी लायडर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. बॉन येथील ‘जर्मन आर्किऑलॉजिकल इंस्टिट्यूट’ या संस्थेतील हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. […]
हेलंगपासून १४ कि.मी. अंतरावर ‘जोशीमठ’ हे प्रसिद्ध स्थळ आहे. ह्या स्थानाचे मूळ नाव ‘ज्योर्तिमठ’! जोशीमठ हा अपभ्रंश आहे. जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. या रस्त्यावर जोशीमठापासून २४ कि.मी. अंतरावर पांडुकेश्वर हे गाव आहे. पांडू राजाने आपला अखेरचा काळ या ठिकाणी व्यतीत केला होता. पांडवांची ही जन्मभूमी समजली जाते. असेही सांगतात की स्वर्गारोहणासाठी […]
१९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली. […]
हम को जो करना था हमने किया…. किती शक्तीशाली वाक्य आहे हे, हे नुसतेच शब्द नव्हे तर ही कृती आहे. जी कुठल्याही परिस्थितीशी समझोता न करता केली गेली, वारंवार केली गेली. इतक्या पक्क्या विचारांच्या होत्या आपल्या भारतमातेच्या वीरांगना राजकुमारी गुप्ता. […]
लांब पल्ल्याची गाडी अखेरच्या स्टेशनात म्हणजे मुख्य स्टेशनात आल्यानंतर तपासणीसाठी व इतर छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी नेतात ते ठिकाण म्हणजे ‘यार्ड’. यार्डात प्रत्येक डब्याची कसोशीनं तपासणी होते, स्वच्छता होते व ती गाडी परत परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते. या सर्व कामासाठी अनेक कर्मचारी फार कठीण परिस्थितीत यार्डात काम करीत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील माझगाव रेल्वेयार्डाच्या प्रसिद्ध झालेल्या समस्यांकडे […]
श्वासने काय साध्य केले…तर खूप काही, असंच म्हणाव लागेल.. पन्नासएक लाखाच्या बजेटमधे बनून अडीच कोटीचा व्यवसाय २००४ मधे करणारा… शामची आई नंतर पुन्हा मराठीला सर्वोत्तम चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक व सुवर्णकमळ मिळवून देणारा.. अश्विनलाही उत्कृष्ठ बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देणारा.. आणि मराठी चित्रपट क्लासेस व मासेस दोन्हीला आवडू शकतो हे दाखवून देत मराठी चित्रपटांसाठी व्यवसायीक यशाची मुहुर्तमेढ रोवणारा.. कारण हा होता..मराठी चित्रपटसृष्टीने परशाबरोबर एक मस्त शिळ घालत घेतलेला ‘एक मोकळा श्वास’.. […]
बिहार मधील भूकंप ग्रस्त क्षेत्र असो किव्हा चले जाव आंदोलनाचे क्रांतिकारी, उमाबाईचे घर सगळ्यांसाठी हक्काचा निवारा होता, त्याचे हात हक्काची मदत करणारे होते. १९४६ साली गांधीजींनी त्यांना कस्तुरबा ट्रस्ट च्या कर्नाटक शाखेचे प्रमुख म्हणून नेमले. ग्राम सेविकांचे प्रशिक्षण, गावातील वस्त्यांचे उत्थान अशी सगळी कामे त्यांनी पार पाडली. सरकार कडून कुठल्याच प्रकारची मदत नसतांना त्यांनी अगदी दारोदार हिंडून निधी गोळा केला आणि काम मोठे केले. […]
सुमारे 8 अब्ज वर्षांपूर्वी, संशोधकांनी मांडले की, दोन बटू आकाशगंगा एकमेकांवर आदळल्या. त्या वैश्विक अपघातामुळे त्या दोन आकाशगंगांमधील वायूचे विभाजन होऊन अनेक नवीन बटू आकाशगंगा तयार झाल्या, ज्यात दोन गडद पदार्थ-मुक्त आकाशगंगा आहेत. […]
कर्णप्रयागपासून ६५ कि.मी. अंतरावर बद्रीनाथाच्या वाटेवर हेलंग ही वस्ती आहे. हेलंगपासून पाच-सहा कि.मी. अंतरावर खनोल्टीचट्टी म्हणून वस्ती आहे. या ठिकाणी वृद्धबद्रीचे मंदिर आहे. गौतम ऋषींनी येथे तपोसाधना केली होती. त्यांच्या वृद्धापकाळात बद्रिनाथाने त्यांना या ठिकाणी दर्शन दिले होते. म्हणून स्थळ वृद्धबद्री म्हणून ओळखले जाते. या स्थानाला ‘अनीमठ’ असेही म्हणतात. वृद्धबद्रीचे मंदिर अतिशय लहान आहे. मंदिरावर शिल्पकाम […]
“ह्या इंग्रजी सरकारचे डोके तर ठिकाणावर आहे ना?” “ने मजसी ने परत मातृभूमीला….” “राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे! धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे! ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते! हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!” लेखणीची धार ही नेहमीच आपले काम चोख बजावत आली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात या लेखणीने खूपच मोलाची कामगिरी बजावली आहे, मग ती टिळकांची लेखणी असो ज्यांनी […]