नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

भारतमातेच्या वीरांगना – ३१ – ननीबाला देवी

एक क्रांतिकारी श्री रामचंद्र मजुमदार एकदा तुरुंगवासात होते, अटक झाली तेव्हा ते आपल्या जवळचे पिस्तुल कुठे लपवले आहे हे आपल्या सहकाऱ्यांना सांगू शकले नाही. ननीबाला देवींने प्रवाहा विरुद्ध जायचे ठरवले. त्यांनी श्री रामचंद्र मजुमदार ह्यांची पत्नी बनून त्यांना भेटायला जाणे सुरू केले. हळूच बोलण्यातून त्यांनी माहिती पुरवली आणि ननीबाला देवींनी ती माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोचती केली. […]

ठाण्याचा कलादूत: नरेंद्र बेडेकर

आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे. […]

रेल्वे गँगमन अर्थात रेल्वे ट्रॅकमन

हजारो किलोमीटर पसरलेल्या रेल्वेमार्गांची कसोशीनं देखभाल करणारे शेकडो कामगार म्हणजे रेल्वे गँगमन.’ ‘गँग’ ह्या शब्दाबरोबर डोळ्यांसमोर गुंडांची गँग उभी राहते, त्यामुळे या शब्दाला या कामगारांनी नापसंती दर्शवली; म्हणून त्यांना आता ‘ट्रॅकमन’ व ‘खलाशी’ म्हणतात. हे कामगार रेल्वेमार्गांना जिवापाड जपतात. रेल्वेमार्गांची सुव्यवस्था ठेवणं, डोळ्यांत तेल घालून फिशप्लेट्सवर सतत लक्ष ठेवणं ही ट्रॅकमनची जबाबदारी असते. खरंतर ते रेल्वेचे […]

लोखंडी ग्रह!

क्रिस्टिन लॅम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला हा शोध नासाच्या ‘टेस’ या कृत्रिम उपग्रहावरील, ताऱ्यांची तेजस्वीता मोजणाऱ्या प्रकाशमापकाच्या मदतीनं लावला. टेस हा उपग्रह विविध ताऱ्यांच्या बिंबांवरील, त्यांच्या ग्रहांनी केलेल्या अधिक्रमणांचा शोध घेतो. किमान एक लाख किलोमीटर, तर कमाल पावणेचार लाख किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा टेस हा उपग्रह पृथ्वीभोवतालची आपली प्रदक्षिणा सुमारे पावणेचौदा दिवसांत पूर्ण करतो. या उपग्रहाद्वारे केल्या गेलेल्या निरीक्षणांत जीजे ३६७ या ताऱ्याची तेजस्वीता किंचितशी बदलत असल्याचं आढळून आलं. […]

भारतमातेच्या वीरांगना – ३० – दुकडीबाला देवी

इंग्रज क्रांतिकारकांच्या मागावर नेहमीच असत. असेच एकदा ते तपास करत करत दुकडीबाला ह्यांच्या घरी पोचले. तिथे त्यांना काही शस्त्र सापडलीत आणि दुकडीबाला देवी ह्यांना अटक करण्यात आली.

त्यांना प्रचंड यातना दिल्या गेल्या जेणेकरून त्या आपल्या अन्य साथीदारांची नावं सांगतील, पण दुकडीबाला इंग्रजांच्या जाचापुढे बधल्या नाहीत. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, की एकही माहिती फुटू दिली नाही. त्यांना अडीच वर्षांचा सश्रम कारावास देण्यात आला.कारावासात असतांना सुद्धा त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या वाटेला नेहमीच इतरांपेक्षा जास्त कठीण कामं येत गेली आणि त्या करत गेल्या. […]

सहप्रवासी (कथा)

फर्स्ट क्लासचा प्रवासी होता तो. मागच्याच स्टेशनवर भरपेट खाऊन, – पिऊन सुध्दा – केबिनमधल्या बर्थच्या मऊ मुलायम कव्हर घातलेल्या गादीवर, सर्व गात्रे सैल सोडून डुलकी घेत, शांत निद्रेची वाट बघत पडला होता. पण डुलकी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळाची नव्हती. […]

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 1

पांडुकेश्वर ते विशालबद्री हे २४ कि.मी. अंतर आहे. या स्थानाचे माहात्म्य विशाल आहे म्हणून हे स्थान विशालबद्री म्हणून ओळखले जाते. ह्या पवित्र भूमीत देवदेवता, ऋषी-मुनी, साधू-संन्याशी, तपस्वी महात्म्यांनी वास्तव्य केले. तपोसाधना, ध्यानसाधना केली. बद्रीनाथचे दर्शन हे त्यांचे जीवन ध्येय होते. या भूमीत व्यास महर्षीनी वेद-पुराणांची, महाभारताची रचना केली. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर, उपनिषदावर भाष्य याच भूमीत केले. पांडुकेश्वर […]

भारतमातेच्या वीरांगना – २९ – दुर्गावती वोहरा (दुर्गा भाभी)

नौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ‘ हिमालयन टॉयलेट्स’ ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे. […]

उद्घोषक (अनाउन्सर)

प्रत्येक यंत्रणेत अनेक पातळ्यांवरचं व्यवस्थापन सांभाळणं हा मोठा कौशल्याचा आणि तंत्रशुद्धतेचा भाग असतो आणि रेल्वेबाबत तर, देशभर ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या मार्गांवर रेल्वे धावती असणं आणि कोणती गाडी कोणत्या स्टेशनामध्ये किती वाजता येते आहे, जाते आहे हे प्रवाशांना माहीत असणं, असा प्रवाशांप्रतीच्या व्यवस्थापनाचा दुहेरी भाग ठरतो. आज प्रवाशांपर्यंत गाडीची माहिती पोहोचवण्याचं काम उद्घोषक करतात, पण रेल्वेच्या सुरुवातीच्या […]

1 57 58 59 60 61 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..