पांडुकेश्वर ते विशालबद्री हे २४ कि.मी. अंतर आहे. या स्थानाचे माहात्म्य विशाल आहे म्हणून हे स्थान विशालबद्री म्हणून ओळखले जाते. ह्या पवित्र भूमीत देवदेवता, ऋषी-मुनी, साधू-संन्याशी, तपस्वी महात्म्यांनी वास्तव्य केले. तपोसाधना, ध्यानसाधना केली. बद्रीनाथचे दर्शन हे त्यांचे जीवन ध्येय होते. या भूमीत व्यास महर्षीनी वेद-पुराणांची, महाभारताची रचना केली. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर, उपनिषदावर भाष्य याच भूमीत केले. पांडुकेश्वर […]
नौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ‘ हिमालयन टॉयलेट्स’ ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे. […]
प्रत्येक यंत्रणेत अनेक पातळ्यांवरचं व्यवस्थापन सांभाळणं हा मोठा कौशल्याचा आणि तंत्रशुद्धतेचा भाग असतो आणि रेल्वेबाबत तर, देशभर ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या मार्गांवर रेल्वे धावती असणं आणि कोणती गाडी कोणत्या स्टेशनामध्ये किती वाजता येते आहे, जाते आहे हे प्रवाशांना माहीत असणं, असा प्रवाशांप्रतीच्या व्यवस्थापनाचा दुहेरी भाग ठरतो. आज प्रवाशांपर्यंत गाडीची माहिती पोहोचवण्याचं काम उद्घोषक करतात, पण रेल्वेच्या सुरुवातीच्या […]
१९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले. […]
अॅमेझॉनच्या जंगलात लपलेली अशी दोन पुरातन शहरं, दक्षिण अमेरिकेतील बोलिविआ या देशात सापडली आहेत. बोलिविआतील मोजोस पठारांच्या परिसरात सापडलेली ही शहरं सहाशे वर्षं जुनी आहेत. या प्राचीन वसाहतींचा शोध लावण्यासाठी लायडर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. बॉन येथील ‘जर्मन आर्किऑलॉजिकल इंस्टिट्यूट’ या संस्थेतील हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. […]
हेलंगपासून १४ कि.मी. अंतरावर ‘जोशीमठ’ हे प्रसिद्ध स्थळ आहे. ह्या स्थानाचे मूळ नाव ‘ज्योर्तिमठ’! जोशीमठ हा अपभ्रंश आहे. जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. या रस्त्यावर जोशीमठापासून २४ कि.मी. अंतरावर पांडुकेश्वर हे गाव आहे. पांडू राजाने आपला अखेरचा काळ या ठिकाणी व्यतीत केला होता. पांडवांची ही जन्मभूमी समजली जाते. असेही सांगतात की स्वर्गारोहणासाठी […]
१९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली. […]
हम को जो करना था हमने किया…. किती शक्तीशाली वाक्य आहे हे, हे नुसतेच शब्द नव्हे तर ही कृती आहे. जी कुठल्याही परिस्थितीशी समझोता न करता केली गेली, वारंवार केली गेली. इतक्या पक्क्या विचारांच्या होत्या आपल्या भारतमातेच्या वीरांगना राजकुमारी गुप्ता. […]
लांब पल्ल्याची गाडी अखेरच्या स्टेशनात म्हणजे मुख्य स्टेशनात आल्यानंतर तपासणीसाठी व इतर छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी नेतात ते ठिकाण म्हणजे ‘यार्ड’. यार्डात प्रत्येक डब्याची कसोशीनं तपासणी होते, स्वच्छता होते व ती गाडी परत परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते. या सर्व कामासाठी अनेक कर्मचारी फार कठीण परिस्थितीत यार्डात काम करीत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील माझगाव रेल्वेयार्डाच्या प्रसिद्ध झालेल्या समस्यांकडे […]