श्वासने काय साध्य केले…तर खूप काही, असंच म्हणाव लागेल.. पन्नासएक लाखाच्या बजेटमधे बनून अडीच कोटीचा व्यवसाय २००४ मधे करणारा… शामची आई नंतर पुन्हा मराठीला सर्वोत्तम चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक व सुवर्णकमळ मिळवून देणारा.. अश्विनलाही उत्कृष्ठ बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार देणारा.. आणि मराठी चित्रपट क्लासेस व मासेस दोन्हीला आवडू शकतो हे दाखवून देत मराठी चित्रपटांसाठी व्यवसायीक यशाची मुहुर्तमेढ रोवणारा.. कारण हा होता..मराठी चित्रपटसृष्टीने परशाबरोबर एक मस्त शिळ घालत घेतलेला ‘एक मोकळा श्वास’.. […]
बिहार मधील भूकंप ग्रस्त क्षेत्र असो किव्हा चले जाव आंदोलनाचे क्रांतिकारी, उमाबाईचे घर सगळ्यांसाठी हक्काचा निवारा होता, त्याचे हात हक्काची मदत करणारे होते. १९४६ साली गांधीजींनी त्यांना कस्तुरबा ट्रस्ट च्या कर्नाटक शाखेचे प्रमुख म्हणून नेमले. ग्राम सेविकांचे प्रशिक्षण, गावातील वस्त्यांचे उत्थान अशी सगळी कामे त्यांनी पार पाडली. सरकार कडून कुठल्याच प्रकारची मदत नसतांना त्यांनी अगदी दारोदार हिंडून निधी गोळा केला आणि काम मोठे केले. […]
सुमारे 8 अब्ज वर्षांपूर्वी, संशोधकांनी मांडले की, दोन बटू आकाशगंगा एकमेकांवर आदळल्या. त्या वैश्विक अपघातामुळे त्या दोन आकाशगंगांमधील वायूचे विभाजन होऊन अनेक नवीन बटू आकाशगंगा तयार झाल्या, ज्यात दोन गडद पदार्थ-मुक्त आकाशगंगा आहेत. […]
कर्णप्रयागपासून ६५ कि.मी. अंतरावर बद्रीनाथाच्या वाटेवर हेलंग ही वस्ती आहे. हेलंगपासून पाच-सहा कि.मी. अंतरावर खनोल्टीचट्टी म्हणून वस्ती आहे. या ठिकाणी वृद्धबद्रीचे मंदिर आहे. गौतम ऋषींनी येथे तपोसाधना केली होती. त्यांच्या वृद्धापकाळात बद्रिनाथाने त्यांना या ठिकाणी दर्शन दिले होते. म्हणून स्थळ वृद्धबद्री म्हणून ओळखले जाते. या स्थानाला ‘अनीमठ’ असेही म्हणतात. वृद्धबद्रीचे मंदिर अतिशय लहान आहे. मंदिरावर शिल्पकाम […]
“ह्या इंग्रजी सरकारचे डोके तर ठिकाणावर आहे ना?” “ने मजसी ने परत मातृभूमीला….” “राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे! धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे! ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते! हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!” लेखणीची धार ही नेहमीच आपले काम चोख बजावत आली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामात या लेखणीने खूपच मोलाची कामगिरी बजावली आहे, मग ती टिळकांची लेखणी असो ज्यांनी […]
रेल्वेव्यवस्थापनात ‘स्टेशनमास्तर’ हे पद जसं महत्त्वाचं असतं, तसंच तांत्रिकदृष्ट्या ‘गार्ड’ हा संपूर्ण गाडीचा प्रमुख असतो. स्टेशनमास्तर गार्डला गाडी स्टेशनवरून सोडण्याची विनंती करतो, गार्ड-इंजिन ड्रायव्हरला आज्ञा देतो आणि मगच गाडी स्टेशनाबाहेर पडते. गार्डला गरज वाटल्यास, काही अपरिहार्य कारणासाठी तो इंजिनड्रायव्हरला गाडी थांबविण्यास भाग पडू शकतो. तत्काळ ब्रेक लावण्याचा अधिकार गार्डकडे. दिलेला आहे, म्हणूनच तत्काळ ब्रेकव्हॅनचा डबा हा […]
शांताबाईंनी सावरकर घरात सगळ्यांचे मृत्यू पाहिले. गांधींवधा नंतर झालेला अतोनात छळ सोसला. त्यात डॉ जखमी झाले आणि त्या आजारपणा नंतर उठलेच नाहीत. ह्या खचल्या नाहीत. थोरल्याबाई, बाबाराव, माई, तात्या सगळयांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. मुलांना एकत्र बांधून ठेवले. […]
पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा: हिरडा हा पर्णझडी जंगलामध्ये आढळणारा वृक्ष आहे. हा काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नांव Terminalia chebula आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण भारतातील राज्यापर्यंत ही प्रजाती मुबलक आढळते. बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य भारत, महाराष्ट्र इ. ठिकाणी ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण प्रांत, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, विदर्भ इत्यादी ठिकाणी हा वृक्ष […]
आदीबद्रीचे मंदिर कर्णप्रयाग-रानीखेत रस्त्यावर कर्णप्रयागापासून १८ कि.मी. आहे. बसेस, जीप इ. वाहनांची या मार्गावर वर्दळ असते. आदीबद्रीचे मंदिर हे चौदा मंदिरांचे संकुल असून साधारण ५० x २० मी. क्षेत्रावर पसरले आहे. ही सर्व मंदिरे चौथऱ्यावर स्थापीत असून त्यातले सर्वात महत्त्वाचे मंदीर म्हणजे आदीबद्रीचे! मंदीर फारसे मोठे नाही पण मंदिरावरील शिल्पकाम सुरेख आहे. मंदिराच्या गर्भगृहात साडेचार ते […]
सिंगापूर मध्ये अनेक भारतीय क्रांतिकारी कार्यरत होते. १९४२ साली ब्रिटिशांनी सिंगापूरवरचा आपला ताबा सोडला, जपान कडे सिंगापूर परत आले. त्यावेळी तिथल्या जखमी सैनिकांना वैद्यकीय उपचार करण्याचे काम डॉ लक्ष्मी ह्यांनी केले. […]