रेल्वे व्यवस्थापनात स्टेशनमास्तर हे एक महत्त्वाचं आणि जबाबदार पद असतं. मुख्य स्टेशनावरून प्रवासीगाड्या सुटतात किंवा तिथे थांबून पुढील प्रवासाला निघतात; या संपूर्ण काळात स्टेशनवर जे काही घडतं त्या सर्व घटनाक्रमांची संपूर्ण जबाबदारी तेथील सर्वेसर्वा-अधिकारपदावर असलेल्या स्टेशनमास्तरची असते. […]
१४ ऑगस्ट १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काँग्रेस गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केले. त्याची सुरवात उषाजींच्या आवाजाने झाली, ‘हा काँग्रेस रेडिओ आहे ४२.३४ मिटर्स भारतातून’. ह्या वरून गांधीजींचे विचार, इतर मोठ्या नेत्यांचे विचार, देशभक्ती पर गाणे, कविता इत्यादी प्रसारित केले जायचे. इंग्रजांच्या तावडीतुन बचाविण्यासाठी हे आपल्या रेडीओची जागा जवळपास रोज बदलायचे. एवढी काळजी घेऊनसुद्धा इंग्रजांच्या हाती हे प्रकरण लागले. १२ नोव्हेम्बर १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली आणि ४ वर्ष सश्रम कारावास दिला गेला. […]
‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीय भाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारतात (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे ) आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’ असा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यक ग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनाम त्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीज नावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ या नावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो. […]
हिमालय ही देवभूमी आहे. देवदेवतांचे निवासस्थान आहे. तर पवित्र नद्यांचे हे उगमस्थान आहे. ही ऋषिमुनींची तपोभूमी आहे. या देवभूमीत वेदपुराणाची रचना झाली. या पवित्र भूमीत हिंदू संस्कृती उमलली व भारतवर्षात दरवळली. हिमालयातील सगळीच स्थाने तप:पूत आहे. म्हणूनच हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणतात. गढवाल हिमालयात केदारनाथ, मद्महेश्वर, तुंगनाथ, रूद्रनाथ व कल्पेश्वर अशी पाच शिवस्थाने आहेत. ही स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून […]
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला श्रीराम पचिंद्रे यांचा लेख स्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा मंत्र होता. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने युवा विनायक दामोदर सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा झेंडा उचलला होता. १९१५ मध्ये महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला, त्या दरम्यान […]
पुढे येणाऱ्या काळात त्यांनी आपल्या नणंदा उर्मिला देवी आणि सुनीता देवी ह्याच्या बरोबर ‘नारी कर्म मंदिर’ ची स्थापना केली. हे एक प्रशिक्षण केंद्र होतं, नव्याने क्रांतीत उडी घेणाऱ्या महिलांसाठी. विविध क्रांतिकारी चळवळीसाठी लागणार पैसा मग त्यात सोन्याचे दागिने असो किव्हा पैसा असो, गोळा करणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. असहकार चळवळ सगळीकडे पेट घेत होती, त्याचाच एक भाग म्हणजे स्वदेशी, खादी प्रचार आणि विदेशी वस्तूंची होळी. कलक्त्याच्या रस्त्यावर उतरून बसंती देवींनी खादी विकली आणि त्यासाठीच त्यांना तुरुंगवास झाला. […]
बिनाजींचा पदवीदान समारंभ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या समारंभ साठी बंगाल चे गव्हर्नर स्टेनली जॅक्सन येणार होते. बिनाजीं ने आपल्या सह क्रांतिकारी कमला दास गुप्ता ह्यांच्याकरवी एक पिस्तुल मिळवले. स्टेनली जसे सभागृहात आले त्यांच्यावर बिना जींने गोळी झाडली, ती त्यांना न लागता त्यांच्या कानाजवळून गेली आणि स्टेनली जमिनीवर झोपले. […]
२२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीत झालेल्या दुसऱ्या समाजवादी काँग्रेस अधिवेशनात कामा ह्यांनी भाग घेतला. मानवी हक्क, समानता आणि स्वातंत्र्य ह्या मुद्यावर उपस्थित लोकांना त्यांनी भारताकडे पाहायला प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्य हा हक्क आहे हे उपस्थितांना जाणवून दिले. ह्याच अधिवेशनात त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आत्ताचा तिरंगा हा मॅडम कामा आणि इतर उपलब्ध डिझाईनचे तिरंग्याचे सुधारित रूप आहे. […]
हिमालयाचे अनेक तऱ्हेने वर्णन करून सुद्धा कालिदासाला ते अपूर्ण वाटते. आपली प्रतिभा शक्ती हिमालयाचे वर्णन करू शकत नाही ह्याची त्याला खंत वाटते व तो हिमालयाला शरण जातो व आपल्या न्यूनत्वाची जाणीव करून देताना म्हणतो: स्थानो त्वां स्थावरात्मानम विष्णुमाहुस्तथाहि ते । चराचराणां भुतानाम् कुक्षिराधारतां गता ।। प्राचीन संचितामध्ये हिमालय काव्यप्रेरक व काव्यप्रसुही ठरला आहे. पाणिनीनेसुद्धा आपल्या रचनांत […]