इंग्रजी सैन्याने अरकोट च्या नावबाबरोबर मिळून शिवगंगा च्या राजाची हत्या केली. आपल्या पतीच्या हत्येनंतर स्वतःच्या आणि आपल्या मुलीच्या बचावासाठी तसेच आपले राज्य परत मिळविण्यासाठी राणी वेलु नाचियार ८ वर्ष भूमीगत होती पण शांत बसली नाही. तिने विरुपाची येथील पलायकारर गोपाल नायक्कर, हैदर अली, राजे म्हैसूर आणि इतर राजांच्या सहाय्याने आपल्या सेनेचे गठन केले, ५००० चे सैन्य आणि दारुगोळा जमा करून तिने जोरदार लढा देऊन आपले राज्य परत मिळवले. […]
रेल्वेमुळे कमी खर्चात, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिशय जलदपणे मालवाहतूक करता येते. पेट्रोल, डिझेलची बचत होते आणि हवेचं प्रदूषण टाळलं जातं. कोकण रेल्वेची ‘रो रो वाहतूक सर्व्हिस’ हे यामधले पुढचं पाऊल आहे. ही ६० ते ७० डब्यांची मालगाडी आहे. या मालगाडीत मालाने भरलेले ट्रक (ड्रायव्हर आणि क्लिनरसह) चढविले जातात. मुंबईजवळ कोलाड येथे या मालगाडीत ट्रक चढविले जातात […]
१९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली. […]
कोरोना महामारीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे ‘टाळे’ उघडताना केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. हे पॅकेज देताना ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती आणणारी ही घटना होती. यानंतर सबंध देशभरात ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेविषयी मोठी चर्चा सुरू झाली. […]
या एक हजार कार्यक्रमांच्या दीर्घ प्रवासात सतत तीस वर्षे ज्यांनी मला साथ दिली आणि कायम पाठिंबा दिला, त्या रसिक प्रेक्षकांचे ऋण तर मी फेडूच शकत नाही. त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन. ज्याने माझा हा प्रवास जवळून पाहिला आहे, असा आजचा आघाडीचा संगीतकार कौशल इनामदार याने त्याची अनेक कामे बाजूला ठेऊन या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली म्हणून त्याचे आभार मानतो. […]
पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्राणिसृष्टीचे महत्त्वाचे घटक बनले. या आघातानंतर, प्राणिसृष्टीप्रमाणे वनस्पतिसृष्टीत कोणता बदल घडून आला, याचं कुतूहल उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आहे. हे कुतूहल काही प्रमाणात शमवू शकणारं एक संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत अलीकडे प्रसिद्ध झालं आहे. पनामा शहरातल्या (मध्य अमेरिका) स्मिथ्सोनिअन ट्रॉपिकल रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेतील पुराजीवशास्त्रज्ञ मोनिका कार्व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष लक्षवेधी आहेत. […]
पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग हा कमी होत आहे. २००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामीची लाट आली त्यामुळे फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंदनी कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठरावीक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय घडीत लिप सेकंद ॲडजेस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लिप सेकंद ॲडजेस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन ॲगन्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लिप ॲडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद ॲघडजेस्ट केला जातो. […]
क्लाइव्ह लॉईड व व्हिव्हियन रिचर्ड्स हे या सामन्याचे हिरो ठरले. प्रथम फलंदाजी करताना लॉईडने ८५ चेंडूंत १२ चौकार व दोन षटकार ठोकून १०२ धावा केल्या, तर रिचर्डसच्या अचूक फेकीने ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद झाले. […]
१९५७ साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर अन् दुसऱ्या बाजूला क्रेनसदृश्य रचना अशी टू इन वन अशी योजना केली जी खूपच यशस्वी झाली. या यंत्रानं कृषी व्यतिरिक्त बांधकाम विभागातही दमदार एंट्री मारली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषी सोबत बांधकाम विभागातही धुमाकूळ केला. […]