पृथ्वी जेव्हा जन्माला येत होती तेव्हा पृथ्वीभोवती असणाऱ्या हायड्रोजन आणि हिलिअमयुक्त वातावरणाचा दाब हा, पृथ्वीच्या वातावरणाच्या आजच्या दाबाच्या तुलनेत दोनशे ते तीनशे पट इतका प्रचंड होता! या प्रचंड दाबामुळे याच वातावरणातला हिलिअम वायू हा द्रवरूपातल्या तप्त शिलारसात मोठ्या प्रमाणात विरघळला. त्यानंतर या शिलारसाच्या अभिसरणाद्वारे या हिलिअमचा काही भाग शिलारसाखालील गाभ्यात मिसळला. […]
हा पुतळा कोणत्या शिल्पकाराला करायला द्यायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार समितीने ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. त्यानुसार भगवंतराव गोरेगावकर आणि नानाभाई गोरेगावकर यांनी हा पुतळा घडवावा, असे करमरकर यांनी सुचविले. या पुतळ्यामध्ये काही त्रुटी राहू नयेत यासाठी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा सल्ला घेण्यात आला होता, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात ९६ हजार ६४३ रुपये खर्च आला होता. […]
यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,”टाइम्सने मराठी वृत्तपत्र काढावे अशी सूचना मी केली होती, हे खरे आहे. कारण मराठी वृत्तपत्राद्वारे टाइम्सला मराठी मन समजून घ्यावे लागेल.मराठी वृत्तपत्राच्या सततच्या सान्निध्यामुळे महाराष्ट्रातील नव्या पुरोगामी विचारांची त्यांना ओळख होईल आणि टाइम्स व इतर पत्रांच्या द्वारे हा विचार महाराष्ट्राबाहेर असलेल्यांना कळेल, असा यात दोघांचा फायदा होणार आहे.” ही माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली. […]
२६ व्या ओव्हर मध्ये कपिल देव यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कपिल देव यांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरु केली. पुढचे अर्धशतक त्यांनी फक्त १३ ओव्हर मध्ये पूर्ण केले. त्यानंतरच्या ५० धावा फक्त १० ओवरमध्ये पूर्ण केल्या. […]
पंतप्रधानांनी आत्मनिर्भरता हा मंत्र दिला ‘लोकल को व्होकल कीजिए’ म्हणजे जे लोकल आहे त्याचा गाजावाजा करा. लोकल उत्पादने लोकांनी जास्तीत जास्त विकत घ्यावीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ. यातून स्वदेशी उत्पादने, स्वदेशी वस्तू हा विषय नव्याने चर्चेला आला. […]
१६ ता. रात्री ती गाडी पुणे स्टेशनापर्यंत न नेता अलिकडेच हडपसरला थांबली . चिटपाखरूही नसलेल्या त्या स्टेशनातून टिळकांना बंद चारचाकीमधे बसवले व पुण्याकडे रवाना केले. तरीदेखील आपल्याला येरवड्यात पाठवतील असे टिळकांना वाटत होते पण गाडी उजव्या हाताला बंडगार्डनच्या पुलाकडे न वळता शहराच्या दिशेने जाऊ लागल्यावर आपली नक्की सुटका झाली याची त्यांना खात्री पटली. गाडी गायकवाडवाड्यापाशी आल्यावर सामानासकट त्यांना उतरवले व धुरळा उडवत गाडी निघुन गेली. […]
अवघ्या कोकणवासीयांचं स्वप्न असलेला ‘कोकण रेल्वे’ हा स्वतंत्र भारतातला ‘भारतीय रेल्वे’चा सर्वांत लांब, बांधण्यास महाकठीण असलेला प्रकल्प होता. या बांधणीचं दिव्य स्वप्न ३० ते ३५ वर्ष कागदावरच धूळ खात पडलं होतं. १९९० च्या सुमाराला भारतीय रेल्वेच्या आधिपत्याखाली ‘कोकण रेल्वे बोर्ड’ ही एक स्वायत्त कंपनी स्थापन झाली. कोकण रेल्वे हा भारतानं संपूर्णपणे स्वत:चं तंत्रज्ञान वापरून बांधलेला सर्वांत मोठा प्रकल्प आहे. […]
आत्मनिर्भर भारत’ची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आणि ‘कोविड-१९’च्या निराशाजनक वातावरणात देशभरात एक आगळेच चैतन्य सळसळले. ही आत्मनिर्भरतेची संकल्पना सामान्य माणसाने, उद्योग जगताने आणि देशभक्त नागरिकांनी उचलून धरली. या संकल्पनेचा भावनात्मक विचार दूर ठेवून आपण मात्र वास्तवात डोकवायला हवे. […]
भारतीय रेल्वेवरील जीवनवाहिनी एक्सप्रेस म्हणजेच रुळांवर चालणारं एक फिरतं रुग्णालय. अशी गाडी सुरू करण्याचा पहिला मान भारताकडे आहे. १९९१ सालात खलारी या बिहारमधील गावापासून ही सेवा सुरू झाली व गेली २४ वर्षे तिच्या मार्गावरील, भारताच्या कानाकोपऱ्यांतील छोट्या गावांपर्यंत ही गाडी जात असते. […]