आपण मोठेपणी लेखक व्हावं, असं सर्वसाधारणपणे कोणालाही वाटत नाही किंवा आपल्या मुलाला, मुलीला लेखक होण्याची इच्छा व्हावी असं कुठल्या पालकांनाही वाटत नाही. लेखकच काय, गायक, संगीतकार, चित्रकार व्हावं असंही लहाणपणी कोणाला वाटत नाही किंवा वाटू दिलं जातही नाही. शाळेच्या दिवसांपासूनच या सर्व गोष्टींना ‘एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज’ असं गोंडस नाव दिलेलं असतं. […]
काळाबरोबर जगणं धावपळीचं बनलं होतं. घरातून बाहेर पडलं की लगेच गाडी मिळायला पाहिजे, अशी मनोवृत्ती बनत होती. खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. एसटीही आपलं रूपडं बदलू लागली. एशियाड सेवेनं शहर जोडली. ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ यासारख्या गाड्या दिमाखात धावत खासगी आरामगाड्यांशी स्पर्धा करू लागल्या. एसटीचा विकास आणि विस्तार होत राहिला. खासगी वाहतुकीचाही विस्तार होत राहिला… […]
…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात. […]
गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. भारतात मुख्यत्वे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तो आढळतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये बेसुमार तोडीमुळे तो दुर्मिळ झाला असल्याने या वृक्षाचा समावेश नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या यादीत करण्यात आला आहे. […]
अशी ख्याती प्राप्त झालेली राम कथा म्हणजे वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेचा अनुपम आविष्कार! वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे महाकाव्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या साहित्यातील पहिले महाकाव्य होय. म्हणून त्यांना आदिकाव्य आणि महर्षी वाल्मिकींना आदि कवी संबोधिले जाते. या ग्रंथात कवीने 24000 संस्कृत श्लोक 7 कांडामध्ये विभागून संपूर्ण श्री रामचरित्र अत्यंत कौशल्याने गुंफले आहे. […]
सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता. […]
आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते. […]
ईशवास्य उपनिषद हे अत्यंत गहन, अर्थपूर्ण व अथांग असे उपनिषद आहे. केवळ १८ श्लोक इतके लहान, पण अर्थाच्या दृष्टीकोणातून तितकेच मोठे आणि आ विश्वे व्यापून उरलेले उपनिषद. यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेमध्ये ईशवास्य उपनिषद आढळते. […]
….. असा हा उत्कृष्ट क्रिकेटपटू अजिंक्य मनाला भावतो ते, एक व्यक्ती म्हणून त्याने वेळोवळी दाखवलेल्या सुजाणपणाने आणि परिपक्वतेमुळे. एवढे कर्तृत्व दाखवूनही त्याने कधी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. साध्या, शांत स्वभावामुळे अजिंक्य आपल्या आसपासचा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातला एक गुणी, सुसंस्कृत मुलगाच वाटतो. […]