समाजात वावरत असताना नेहमी म्हटल जात की, जसा पैशाकडे पैसा जातो आणि वाढतो, तशी जबाबदारी घेणाऱ्याकडे जबाबदारी जाते आणि वाढते. अशा वेळी तिचं ‘ओझं’ वाटतं. वेळप्रसंगी ‘एखादी जबाबदारी घेणं’ ही ‘क्रेडिटेबल गोष्ट’ वाटायला लागते, तर कधी ‘जबाबदारी घेण्याचं कौतुक होतं’ म्हणून जबाबदारी घ्यायला आवडते. […]
ही गोष्ट आज सांगतांना मात्र अतिशय आनंद होतो अभिमान वाटतो की एवढया दुर्गम भागात आपण सुरूवातीचे दिवस काढले पुढे मग शाळेवर गेल्यावर याचे काहीच वाटले नाही. अतिशय आनंदाने शाळेत जात असे मी उलट घरी आल्यावरच करमत नसे अशी माझी पहिली नोकरीतील शाळा. आज ही माझ्या तेवढीच चांगल्या रितीने स्मरणात राहिली आहे. […]
दोनच दिवसांनी , ५ जून २०२२ रोजी, ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. सतराव्या शतकात ‘संत तुकारामांनी’, वृक्षाचे महत्त्व सांगताना “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’, असा अतिशय सुंदर अभंग रचून सामाजिक संदेश दिला. […]
संध्याकाळी एका हॉलमधे जमून, आमच्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात लहान अशांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आमच्या बॅचमधील एकूण तिघांपैकी, जे PSI झाल्यावरही पुढे स्पर्धा परीक्षा देऊन, आय पी एस होऊन Additional Director General of Police या अतिउच्च पदावरून निवृत्त झाले, त्यापैकी उपस्थित दोन, त्याचप्रमाणे बॅचमधील पदक विजेते अधिकारी, यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यानंतर हॉटेलच्या lawn वर टेबल्स लाऊन snacks, Karaoke, गप्पा, थट्टामस्करी, रात्रीचे जेवण इ. ११.३० पर्यंत चालले. […]
स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील आर्तिन अर्शामिआन आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या संशोधनाद्वारे केला आहे. गंधांवरचं हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. संख्याशास्त्राचा आधार घेणाऱ्या या संशोधनातून निघालेले निष्कर्ष लक्षवेधी ठरले आहेत. […]
इवान इवानोविच हा अंतराळवीर, जैववैद्यकशास्त्रात संशोधन करणाऱ्या एका संस्थेच्या सल्ल्यानुसार, मॉस्कोतील एका कृत्रिम अवयव बनवणाऱ्या संस्थेकडून बनवून घेतला होता. हा बाहुला इतका बेमालून बनवला गेला होता, की जमिनीवर परतल्यावर जर तो स्थानिक लोकांच्या हाती लागला, तर गैरसमज पसरू नये म्हणून त्यावर ‘माकेत’ (नकली) असं लिहून ठेवण्यात आलं होतं. तरीही काहीसा गोंधळ झालाच. दुसऱ्या अंतराळसफरीच्या वेळी इवान हा बर्फाच्छादित प्रदेशात उतरला. त्यामुळं त्याला घोड्यांकडून ओढल्या जाणाऱ्या गाडीवरून परत नेण्यात आलं. या घटनेच्या काही महिने अगोदर गॅरी पॉवर्स या अमेरिकन वैमानिकाचं विमान हेरगिरी करीत असल्याच्या आरोपावरून रशियाकडून पाडण्यात आलं होतं आणि हवाई छत्रीच्या साहाय्यानं जमिनीवर उतरलेल्या गॅरी पॉवर्सला रशियानं ताब्यात घेतलं होतं. […]
दिएगो सालाझार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेल्या, इथल्या सुमारे तेहतीस हजार सागरी सजीवांच्या अवशेषांत, शैवाल, मासे, मृदुकाय प्राणी, कणाधारी (पृष्ठवंशी) प्राणी, तसंच कणा नसलेले (अपृष्ठवंशी) प्राणी, अशा अनेक प्रकारच्या सजीवांचा समावेश होता. यांतील अनेक प्राणी हे खोल पाण्यात राहणारे सागरी जीव आहेत. या सागरी प्राण्यांच्या अवशेषांबरोबरच, या संशोधकांना इथे विविध प्रकारची सागरी वाळू आणि सागरी दगड-गोटे सापडले. इथे सापडलेल्या, काही ठिकाणच्या अवशेषांत मानवी हाडांचा, कोळशाच्या तुकड्यांचाही समावेश होता. माणसांनी दगडांपासून उभारलेल्या भिंतींचे अवशेषही इथे सापडले. या अवशेषांतील दगड हे ज्या प्रकारे कलंडले होते, त्यावरून या भिंती समुद्राकडून आलेल्या शक्तिशाली लाटेमुळे पडल्या असल्याचं दिसून येत होतं. या सर्व पुराव्यांवरून या सागरी प्रदेशावर त्सुनामीचं आक्रमण झालं असल्याचं स्पष्ट झालं. […]
राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे. […]