शिलाहार व बिंब राजवटीत ठाण्यात साठ मंदिरे व साठ तलाव बांधण्यात आले होते. पण पोर्तुगीजांनी ही सर्व मंदिरे जमीनदोस्त केली. आज इमारतीचा पाया खोदताना या मंदिरांचे अवशेष, कोरीव स्तंभ, वा मूर्तीच्या स्वरूपात पहावयास मिळतात. तलाव साफ करतानाही काही अप्रतिम मूर्ती मिळाल्या आहेत. […]
जीवनाच्या अनेक संचिता पैकी लताचं असणं हे एक संचित आहे. आपल्या अवती भोवती अनेक समृद्ध व्यक्तिमत्वें असतात, स्वर असतात, त्यांच्यामुळे आपलं जीवन समृद्ध होत असतं. मोठ्या माणसांच असणं डोक्यावर छत्र असतं. लतांची गाणी अनेकांच्या दृष्टीने मुदत ठेव आहे, जिच्यामुळे त्यांचं आयुष्य सुखद आहे. सौंदर्य आणि स्वर आपल्या आवाक्यात जरी नसले तरी पाहण्यात व ऐकण्यात ते आपलेच […]
पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे. […]
समाजातील एखाद्या महनीय थोर पुरुषाच्या जीवनकार्यासंबंधी दुसराच कुणीतरी जे लिहितो त्या लेखनास चरित्रे असे म्हणतात. आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने महत्पदास पोहोचलेली महान व्यक्ती स्वत:च्या संपूर्ण आयुष्याबद्दल स्वतःच सारे काही सांगते वा लिहिते तेव्हा ते बनते आत्मकथन म्हणजेच आत्मचरित्र.
गेल्या पन्नास वर्षांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेली आत्मचरित्रे संख्येने जशी बिपुल तशीच त्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. […]
या चेहऱ्यांच्या सतत हेलकावणाऱ्या लाटेत गुदमरुन आपला चेहराही आपल्या लक्षात राहत नाही. गर्दीत भान हरवलेला चेहरा आपलं साम्य इतर चेहऱ्यात कुणी जिवाभावाचा माणूस भेटतो का पाहत असतो कारण इथं कुणाला कुणासाठी वेळ असतो ? […]
मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ पंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले. ठाण्यात मात्र पहिले वृत्तपत्र २२ जुलै १८६६ रोजी निघाले. त्या वृत्तपत्राचे नाव होते ‘अरुणोदय.’ हे वृत्तपत्र काशिनाथ विष्णू फडके यांनी काढले. त्यांनी जांभळीनाक्यावरील पोलिस चौकीजवळ आपला छापखाना टाकला. फडके यांचे हे वर्तमानपत्र ठाणे जिल्ह्यातील पहिले साप्ताहिक होय. […]
विस्तार बघून आश्चर्य वाटेल असं जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे आहे. १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात ते पसरलेलं आहे; तर भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यात ८० एकर परिसरात हावडा रेल्वेस्टेशन’ नावानं बनलेलं आहे. इथे १६ ते १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. या स्टेशनच्या बाहेर हातगाडी, घोडागाडी, बैलगाडी, ऑटो, टॅक्सी, लॉरी, बसेस आणि ट्राम्स इतकी विविध त-हेची वाहनं उभी असतात. स्टेशनबाहेरच्या जागेत वाहनांची इतकी विविधता एकाच ठिकाणी दृष्टीला पडणारं हे जगातलं एकमेव रेल्वेस्थानक आहे. […]
राहुलच्या किर्तीमुळे, यू -ट्यूब मुळे शास्त्रीय संगीताकडे वळलेली तरुण पिढी काल मोठ्या संख्येने चित्रपट गृहात होती. अन्यथा १९८३ साली निवर्तलेल्या या सूर्यासारखे दाहक गाणाऱ्या गायकासाठी चाळीस वर्षांनी नवी माणसे (जी कदाचित त्यावेळी जन्मलेलीही नसतील) फिरकली नसती. […]
काही लोकांना ते ज्ञात असते. काहींना त्याची अनुभूती येते तर काहींना तो निव्वळ योगायोग वाटतो. मी ही अशीच योगायोग आणि अनुभूतीच्या उंबरठ्यावर अडकले आहे. नुकताच पीठापुर आणि कुरवपूर यात्रेचा योग गुरुकृपेने जुळून आला. त्या दरम्यान असे सुंदर अनुभव आले, जे सामान्य माणसाच्या विज्ञान निष्ठ बुद्धीला ही कोड्यात टाकणारे होते. […]