संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते. […]
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला शकुंतला मुळ्ये यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. मात्र आजही हे संदर्भ सद्य परिस्थितीत जसेच्या तसे लागू पडतात. […]
जीवन हा संघर्ष आहे. शारीरिक असो वा मानसिक असो, संघर्षाबरोबर वेदना आल्याच. वेदना नको म्हणून संघर्ष नको असे म्हटले तर जगण्यातले वैविध्य, नाविन्य संपेल. जीवन नीरस, बेचव होईल. वेदनेचा सामना समजून उमजून करण्यातच आपले भले आहे. […]
आत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो. […]
जेव्हा ध्वनिलहरींमुळे हवेत कंपनं निर्माण होतात, तेव्हा प्रथम पॅरा-अमाइड व सुती धाग्यांपासून बनलेलं हे कापडं, ही कंपनं टिपून घेतं. त्यानंतर ही कंपनं याच धाग्यांद्वारे, चार थरांच्या धाग्यापर्यंत पोचतात. ही कंपनं नंतर, या धाग्यातल्या बाहेरच्या म्हणजे रबरासारख्या थराद्वारे, दाबाद्वारे विद्युतप्रवाह निर्माण करणाऱ्या थरापर्यंत पोचतात व त्यातून विद्युतप्रवाहाची निर्मिती होते. हा विद्युतप्रवाह तांब्याच्या थराद्वारे छोट्या ध्वनिक्षेपकासारख्या साधनाकडे पाठवला जातो व त्याचं रूपांतर पुनः आवाजात होतं. मुख्य म्हणजे, हा कपडा तीव्र आवाजाबरोबरच अगदी क्षीण आवाजही टिपू शकतो. त्यामुळे, या कापडापासून तयार केलेला कपडा हा एका मोठ्या मायक्रोफोनसारखा वापरता येतो. नुसतंच संभाषण नाही, तर पानांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाटही या कपड्यांद्वारे स्पष्टपणे ऐकता येतो. हे कापड धुता येतं, तसंच ते धुण्यासाठी धुलाईयंत्रही वापरता येतं. त्यामुळे या कापडापासून तयार केलेले कपडे धुऊन पुनः पुनः वापरता येतील. […]
भारतामध्ये शॅडो प्ले थिएटर ला वाव आहे. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंडळी असे सावल्यांचे खेळ करतात. ठाण्यामध्ये श्री धामणकर गेली अनेक वर्ष असे सावल्यांचे खेळ मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी करताना मी बघितले आहे. त्यांच्या खेळाचे नावच आहे “हा खेळ सावल्यांचा”. परदेशामध्ये शॅडो प्ले थिएटर साठी बऱ्याच वेगवेगळ्या कथा,परिकथा सावल्यांचा माध्यमातून सादर करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न तेथील संस्था करत असतात. या खेळात कल्पना शक्तीला प्रचंड वाव आहे तसेच कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. […]
या विविध पत्रांतील मजकूर तसंच पत्रांचं स्वरूप, पत्रांच्या घड्यांची पद्धत, या सर्वच गोष्टी इतिहासकारांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. कारण हा सतराव्या शतकातला काळ युरोपातला अस्थिरतेचा काळ होता. या पत्रांतून त्याकाळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला जाणार आहे. […]
ए२बी ही खूण आढळणारे हे सर्व कुत्रे, सायबेरिआतील कुत्र्यांच्या पूर्वजांपासून सुमारे तेवीस हजार वर्षांपूर्वी निर्माण झाले असल्याची शक्यता या संशोधकांना दिसून आली. […]