विश्वसनीय असे बघणे प्रेक्षकाला आवडते. जादुई कला मनोरंजक होण्यामागे हे एक कारण आहे. जादूगार,मुलांना प्रचंड आवडतो. कारण,तो मुलांना फसवतो.त्यांची फजिती करताना त्यांना हसावतो.आणि हसवता हसवता त्यांना जादुई खेळात सहज सामील करून घेतो. Birthday पार्टीत म्हणूनच जादूगारांना प्रचंड मागणी असते. मुले जादूगार भोवती लोह चुंबकाप्रमाणे गोळा होतात. त्याच्या जादूच्या प्रयोगात,जादुई खेळात, आनंदाने सामील होतात. […]
पृथ्वीवरचं जीवन सूर्यप्रकाशावर आधारलेलं आहे. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती अन्नाची निर्मिती करतात व या अन्नावर इतर सजीवांची गुजराण होते. अर्थात, जिथे थोडाही सूर्यप्रकाश पोचू शकत नाही, अशा पूर्ण काळोखी जागेत राहणारे सजीवही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी सजीवांची विविधता मर्यादित असणं, अपेक्षित असतं. मात्र हा तर्क चुकीचा ठरेल, असा एक शोध अलीकडेच लागला आहे. […]
विजया मेहेतांच्या विद्यापीठातील हा आज्ञाधारक विद्यार्थी ! त्यांच्याबरोबर तो “हमीदाबाईची कोठी ” मध्ये दिसला. नंतर पाहिलं बालगंधर्वच्या “पुरुष ” मध्ये- रीमा बरोबर ! याच्या यशाची कमान सतत चढती. सिनेमातही अमिताभ (कोहराम), राजकुमार (तिरंगा) वगैरे तोडीसतोड दिसला. अगदी अलीकडच्या “काला” मध्ये दक्षिण दैवत -रजनीकांत बरोबर कोठेही कमी नाही. स्वतःची अटीट्युड, स्वतःच्या अटी ! मोकळाढाकळा, मध्यंतरी VJTI मध्ये तरुण पिढीशी निवांत गप्पा मारणारा, at ease – पायजमा /झब्बा या मराठी पोषाखाची लाज न बाळगणारा. […]
ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश‚ आणि त्या अनुषंगाने अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान‚ यातून हा गीतोपनिषदाचा ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो. आजच्या प्रचलित मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशी प्रामाणिक मनोभावना यामागे आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. […]
चंद्रावरील एकूण पदार्थांपैकी किमान साठ टक्के पदार्थ हे या ग्रहापासून आल्याचं विविध प्रारूपांतून दिसून येतं. चंद्राच्या जन्माला कारणीभूत ठरणाऱ्या या ग्रहाला खगोलशास्त्रज्ञांनी ‘थिआ’ हे ग्रीक पुराणातलं नाव दिलं आहे. चंद्राच्या जन्माची ही कहाणी जरी बऱ्याच अंशी स्वीकारली गेली असली तरी, या थिआचे अवशेष काही पृथ्वीवर सापडलेले नाहीत. त्यामुळे चंद्राच्या जन्मामागील सिद्धांतातील अनिश्चितता कायम राहिली आहे. […]
बालनाट्य ही जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. जे मुलांमध्ये खेळू शकणार मिसळू शकतात, मुलांची समरस होऊ शकतात अशा मोठ्यांनीच या क्षेत्रात यावे. पैसा देणारे साधन म्हणून जे बालनाट्य क्षेत्राकडे बघतील त्यांची निराशा होण्याची शक्यताच जास्त आहे. बालनाट्य ही आजही एक चळवळ आहे उद्याही राहील असा मला विश्वास आहे. […]
नेहमीच्या पाण्यातही अतिशय अल्प प्रमाणात जड पाणी असतं. सन १९३२मध्ये नेहमीच्या पाण्यातून हे जड पाणी वेगळं करण्यात यश आलं. त्यानंतर काही काळातच, ओस्लोच्या प्राध्यापक हॅन्सेन यांनी जड पाण्याची चव जिभेवर जळजळ निर्माण करत असल्याचा दावा केला. खरं तर स्वाद कळणं, ही एक जैवरासायनिक अभिक्रिया आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या पाण्याची चव सारखीच असली पाहिजे. त्यामुळे, हॅन्सेन यांच्या दाव्यानंतर, ड्यूटेरियमचा शोध लावणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञ हॅरल्ड युरी यांनी १९३५ साली, जड पाणी प्रत्यक्ष चाखून ही चव तपासली. त्यांना दोन्ही पाण्यांच्या चवीत काहीच फरक नसल्याचं आढळलं. […]
निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता ! […]
सजीवांच्या उत्क्रांतीत डायनोसॉर या सरीसृपांचं महत्त्व मोठं आहे. पृथ्वीवर सस्तन प्राण्यांचं राज्य येण्याच्या अगोदर, तब्बल अठरा कोटी वर्षं या डायनोसॉरनी पृथ्वीवर राज्य केलं. त्यामुळे संशोधकांना डायनोसॉरबद्दल प्राणिशास्त्राच्या दृष्टीनं उत्सुकता तर आहेच, परंतु त्यांना या प्राण्यांंच्या सामाजिक जीवनाबद्दलही कुतूहल आहे. संशोधकांना पडलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न म्हणजे – ‘हे डायनोसॉर एकएकटे वावरायचे की कळपात वावरायचे? कळपात वावरत असल्यास ते केव्हापासून कळपात वावरू लागले?’. […]
नाटक हा विषय २००८ पासून शालेय अभ्यासात आहे…हे अनेक पालकांना माहीत नव्हते.शाळांनी ही माहिती पालकांना कधीच दिली नाही.नैतिक भाषेत हे पातक आहे.असे पाप या पुढे घडू नये ही इच्छा.त्या साठी पालकांनी सतर्क राहून शाळेला प्रश्न विचारायला हवेत.नाटक शिकण्याचा मुलांचा हक्क त्यांना मिळवून द्यायला हवा. […]