एखाद्या प्रचंड आकाराच्या इमारतीची वा तत्सम बांधकामाची निर्मिती जशी आव्हानात्मक असते, तसेच त्या बांधकामाचे पाडकामही आव्हानात्मक असते. मोठे बांधकाम सुरक्षितपणे पाडताना, अनेक अडचणींवर मात तर करावी लागतेच; पण त्याचबरोबर पाडकाम करणाऱ्या तज्ज्ञांचे स्थापत्यशास्त्रातील ज्ञान, अनुभव, कौशल्य हे सर्वच पणास लागतात. अशी मोठी पाडकामे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची ही ओळख… […]
नारदमुनी म्हणजे आद्यपत्रकार ! पंचमहाभूतांमधील बातम्या मिळवून वर्तमान गरजेप्रमाणे त्या-त्या देवाच्या कानावर घालायची अलिखीत जबाबदारी त्यांच्यावर. कधी ब्रह्मा, विष्णू तर कधी महादेव, इंद्र… त्या-त्या देवाच्या दरबारात कळ लावली की पुढचे रामायण कसे सोपे जायचे. […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट ह्यांचे टोपण नांव आहे टेडी.. एकदा ते शिकारीला गेले असतांना जखमी अस्वलाला पाहून त्यांचे मन द्रवले , त्यांनी त्याची शिकार केली नाही.त्यांच्या या उदारतेचे चित्र एका व्यंगचित्रकाराने , एका वृत्तपत्रात रेखाटले. ते पाहून एका उद्योगपतीच्या पत्नीला ,खेळण्यातले अस्वल बनवण्याची कल्पना सुचली .म्हणून त्या अस्वलाला टेडी हे नांव देऊन ते राष्ट्रपतींना समर्पित करण्याची परवानगी त्या उद्योग पतींनी मागितली आणि असा या टेडी बेयरचा जन्म २० व्या शतकांत झाला. […]
आमच्या जहाजाच्या बाजूला एक इंडोनेशियन जहाज उभे होते. समुद्रात एका जेट्टीच्या दोन बाजूंना दोन्ही जहाजे बांधली होती. दोन्ही जहाजांच्या मध्ये सत्तर एंशी मीटरचे अंतर असेल. आमच्या जहाजातील क्रूड ऑइल कार्गो बाजूच्या जहाजात ट्रान्सफर केला जात होता. […]
भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे. शिवाष्टक, लिंगाष्टक, रुद्राष्टक, बिल्वाष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये शिवाष्टकाला विशेष महत्त्व आहे. शिवाष्टकांची संख्याही कमी नाही. श्रीमद् शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंगप्रयात (गण- यययय) वृत्तात रचले आहे. शिवाच्या प्रिय शिवाष्टकम् स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते. शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. […]
चंदेरी दुनियेत नेहमीच धमाल किस्से घडत असतात.. कधी ते हिरो हिरोईनचे तर कधी तंत्रज्ञांचे असतात. माझे परममित्र, ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरुजी यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेले काही किस्से मी इथे सादर करीत आहे.. […]
आपल्या सुंदर व सशक्त कल्पनेतून ऑर्किटेक्ट कागदावर इमारतीचे नकाशे, आराखडे बनवत असतो; व माझीच इमारत लक्षवेधी ठरविण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. त्या कल्पनेला सत्यात उतरविण्याचे काम अभियंता करीत असतो. तोच त्या इमारतीचा खरा दिग्दर्शक असतो. […]
संकल्प सिद्धीस जात नाही , अपूर्ण सोडावा लागतो म्हणून संकल्पच करायचा नाही असं मुळीच नाही . कारण त्यामुळे आपण विचार करतो , कृती करतो. सातत्य आणि नियमितपणा आपल्या अंगी बाणविला जातो , त्यातूनच आयुष्याला एक शिस्त , वळण लागते. संकल्प हे आश्वासन नाही. संकल्प म्हणजे कृतीमागची ‘प्रेरक’ शक्ती. माणसाच्या आयुष्यातील, संकल्प हा स्वनांकडून सत्याकडे नेणारा पूल आहे. […]
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! […]
भविष्यातला, पारंपरिक इंधनाच्या अभावी जहाज वाहतुकीवर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नवी इंजिने तयार केली जात आहेत. यांतली काही इंजिने ही नव्याने विकसित होत असली तरी काही इंजिनांत पूर्वीच्याच तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षमतेने वापर केला गेला आहे. अशा या विविध प्रकारच्या आधुनिक इंजिनांचा आणि इंधनांचा हा वेध. […]