स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक महिला होत्या . त्यातील एक म्हणजे ‘मातंगिनी हाजरा’. त्यांची धडाडी मला भावली. माझ्या कलकत्याच्या वास्तव्यात ‘ हाजरा स्ट्रीट’ वरून चालताना मला गहिवरून येत असे. बंगालमध्ये ‘मातंगिनी हाजरा’ नावाने अनेक शाळा, हॉस्पिटल्स, रस्ते आणि पुतळे उभारले गेले आहेत. […]
काही जुने किस्से सांगणार होते; पण फ्रेश स्टॉकसुद्धा तयार झालाय! …म्हणजे काय.. तर कोरोनातून अगदीच उठतोय आम्ही..! हा आजारपणाचा अनुभव माझ्या मुलींसाठी खास् होता. गेली दोन वर्षे घरात सुरक्षित राहून साधा सर्दी खोकला सुद्धा मुळी नव्हता, आणि आता झालं ते एकदम सगळंच! शिशुवर्गांत जायला लागल्यापासून अगदी नेमाने २-३ महिन्यांतून एकदा दोघी किंवा दोघींपैकी एक, कसलंसं इन्फेक्शन घेऊन यायची, आणि मग सगळं घर झोपायचं..! …सांगते! 🙂 […]
एका सकाळी महेशचा फोन आला व त्यानं डेक्कनवरील हाॅटेल ‘परिचय’मध्ये आम्हाला भेटायला बोलावलं. आम्ही दहा वाजता रुमवर पोहोचलो. महेश भेटला. चर्चा झाली. एवढ्यात त्या रुममध्ये एका धिप्पाड व्यक्तीने प्रवेश केला. आम्ही त्यांच्याकडे पहातच राहिलो. महेशने आमची त्यांच्याशी ओळख करुन दिली, ‘शिवाजी, हे नावडकर बंधू. आपल्या चित्रपटाची पब्लिसिटीचं काम करताहेत.’ […]
मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही. मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य !!! […]
पृथ्वीच्या एका ‘नव्या’ भावंडाचा अलीकडेच शोध लागला आहे. हे भावंड इमानेइतबारे पृथ्वीबरोबरच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत आहे. ते पृथ्वीच्या मागून चालत आहे. चालताना ते पुढे-मागे जात आहे. पृथ्वीचं हे भावंड म्हणजे एक लघुग्रह आहे. हा लघुग्रह २०२०एक्सएल५ या नावानं आता ओळखला जातो. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लघुग्रह हे काही वेळा ग्रहमालेतील इतर ग्रहांच्या सान्निध्यात येतात व त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणात जखडले जातात. […]
फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका ही फुलाला जन्म देणारी सर्वांत पुरातन वनस्पती ठरली आहे. भविष्यात फ्लॉरिजर्मिनिस जुरासिकापेक्षा अधिक जुन्या सपुष्प वनस्पतींचे जीवाश्म कदाचित सापडतीलही. तरीही फ्लॉरिजर्मिनिस जुरासिका या वनस्पतीचं स्थान वेगळ्या दृष्टीनं अढळ राहणार आहे. […]
पुनर्जन्मावर आधारित असलेले ‘नीलकमल’ व ‘मेहबूबा’ हे चित्रपट गुलशन नंदा यांच्या सर्वोत्तम लेखनाचे मानदंड आहेत. राजकुमार व मीना कुमारी यांचा ‘काजल’ हा भावना प्रधान चित्रपट सत्तरच्या दशकातील माईलस्टोन मानला जातो. १९७१ साली गुलशन नंदा यांची ‘झील के उसपार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांच्या आजपर्यंतच्या लोकप्रियतेचे रेकाॅर्ड तोडले.. तिच्या तब्बल पाच लाख प्रतींचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा खप झाला! […]
आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या संगीत महत्वाचं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेमध्ये शारीरिकच आणि मानसिक शांततेची तसेच विश्रांतीची देखील जरुरी असते. […]
गृह सजावटीसाठी उपयुक्तता आणि सौंदर्य यांची सांगड घालून संरचना करणं आवश्यक असतं. आपल्या घराचं अंतरंग सजवण्यासाठी सर्व प्रथम आपल्या अंतर्मनातील सौदर्याचा अभ्यासपूर्वक विचार केलेला असणं जरुरीचं असतं. गृहसजावटीच्या कामात निवडल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूंचा उपयुक्तता आणि सौंदर्य या दोन्हीही दृष्टिकोनातून विचार केला जाण्याची आवश्यकता असते. […]
आपल्या घराचं अंतरंग सजवण्यात आणि खुलवण्यात आपल्या मानसिकतेचा संबंध असल्यामुळे अंतर्मनाचा त्यांत मोठा वाटा असतो. आपल्या अंतर्मनाच्या सहभागाशिवाय केलेलं अंतर्गत सजावटीचं काम आपल्याच घरात आपल्याला परकेपणा निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. अर्थात, अशी एखादीच सजावट अपवादात्मक असू शकते, की जी आपल्या अंतरंगात न डोकावता केली गेली आहे. […]