सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सियस इतकं असतं, तर सौरडागांचं तापमान हे सुमारे तीन हजार सेल्सियस इतकं असतं. हे सौरडाग जरी सूर्याच्या इतर पृष्ठभागाच्या तुलनेत थंड असले तरी, हे सौरडाग म्हणजे अतितीव्र चुंबकीय क्षेत्राची ठिकाणं आहेत. सूर्यावरून उफाळणाऱ्या सौरज्वाला या, याच डागांच्या परिसरात निर्माण होतात. […]
स्वयंपाक करणारी स्त्री ही जर का सुगरण असेल तर ती भाताचे विविध प्रकार करुन वाढते. मग तो नारळी पौर्णिमेला केलेला नारळीभात असेल, कधी सणासुदीच्या निमित्ताने केलेला मसाले भात असेल, कधी टोमॅटो भात, कधी विविध भाज्या वापरुन केलेला व्हेज पुलाव असेल, मटारच्या सीझनमध्ये मटार पुलाव असेल तर कधी जिरा राईस! […]
मगर ही चार पायांवर चालते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, दोन पायांवर चालणाऱ्या मगरी तुम्हाला माहीत आहेत का? अशा मगरी अस्तित्वात होत्या. परंतु अलीकडच्या काळात नव्हे, तर अकरा ते बारा कोटी वर्षांपूर्वी – ज्या काळात डायनोसॉरचं राज्य होतं त्याकाळात. […]
टोंगा बेटांचा प्रदेश हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रदेश आहे. इथे पृथ्वीच्या कवचातील दोन भूपट्ट एकत्र आले आहेत व त्यातील एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकत आहे. अनेक ज्वालामुखींनी व्यापलेला, वारंवार भूकंप घडून येणारा, असा हा प्रदेश भूशास्त्रज्ञांकडून पूर्वीपासूनच अभ्यासला जात आहे. […]
करिअरची निवड करताना तर अनेकांच्या बाबतीत अनेकदा काही घडायच्या ऐवजी बिघडतेच. करिअर निवडताना केवळ भावनेच्या आहारी जाऊन आणि त्यांतील ग्लॅमरमुळेच अनेकजण त्याकडे आकर्षित होताना दिसतात. […]
दोघी एकमेकींना आजारी पडलेलं बघत, बरं होताना बघत, त्याबद्दल मला प्रश्न विचारत, तेव्हा त्या त्या वयाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांना काय झालंय, ते कशाने बरं होईल याची शास्त्रोक्त माहिती मी देत असे, अजूनही देते. […]
कोझल इथल्या या खड्ड्यांपैकी अनेक खड्डे पाण्यानं भरले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांच्या परिसराला आता पाणथळी स्वरूप प्राप्त झालं आहे. हे पाणथळ परिसर म्हणजे बेडकासारखे विविध प्रकारचे उभयचर, सरीसृप, कीटक, पक्षी-प्राणी, इत्यादींचं वसतिस्थान होऊन, कोझलच्या खोऱ्यात ठिकठिकाणी नवीच वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था विकसित झाली आहे. […]
पर्यावरण पूरक घर बांधणी आणि बांधकाम ही संकल्पना सद्य:स्थितीत नगर रचनेचा अविभाज्य घटक बनत आहे. ईको-फ्रेंडली या नावाने सर्वश्रूत असणाऱ्या या संकल्पनेला प्राधान्य देण्यामागे अनेक महत्वाच्या बाबी आहेत. नगररचना आणि बांधकामासाठी लागणारे घटक अथवा लागणारा माल निवडताना पर्यावरणाचा अभ्यासपूर्वक विचार होणं आवश्यक असतं. […]
पूर्ण वाढ झालेल्या टी-रेक्सची उंची सुमारे चार मीटर आणि लांबी बारा मीटर असल्याचं, तसंच त्याचं वजन सुमारे सात टन असल्याचं, टी-रेक्सच्या अवशेषांवरून माहीत झालं होतं. त्याचबरोबर हाडांतील वर्तुळांवरून टी-रेक्सचं सरासरी वय सुमारे अठ्ठावीस वर्षं असल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय टी-रेक्सच्या वाढीच्या वेगावरून त्याच्या शरीरातील अन्नाच्या चयापचयाचा वेगही पूर्वीच काढला गेला होता. […]
`श्यामची आई’ वाचताना ज्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत, असा माणूस क्वचितच सापडेल. हे कथानक म्हणजे खरे तर गद्य रुपात साने गुरुजींनी रचलेले काव्यच आहे. […]