नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

शास्त्रीय संगीत मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम

आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या संगीत महत्वाचं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेमध्ये शारीरिकच आणि मानसिक शांततेची तसेच विश्रांतीची देखील जरुरी असते. […]

उपयुक्तता आणि सौदर्य ह्यांचा मिलाफ

गृह सजावटीसाठी उपयुक्तता आणि सौंदर्य यांची सांगड घालून संरचना करणं आवश्यक असतं. आपल्या घराचं अंतरंग सजवण्यासाठी सर्व प्रथम आपल्या अंतर्मनातील सौदर्याचा अभ्यासपूर्वक विचार केलेला असणं जरुरीचं असतं. गृहसजावटीच्या कामात निवडल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूंचा उपयुक्तता आणि सौंदर्य या दोन्हीही दृष्टिकोनातून विचार केला जाण्याची आवश्यकता असते. […]

मनाचं घराशी नातं

आपल्या घराचं अंतरंग सजवण्यात आणि खुलवण्यात आपल्या मानसिकतेचा संबंध असल्यामुळे अंतर्मनाचा त्यांत मोठा वाटा असतो. आपल्या अंतर्मनाच्या सहभागाशिवाय केलेलं अंतर्गत सजावटीचं काम आपल्याच घरात आपल्याला परकेपणा निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. अर्थात, अशी एखादीच सजावट अपवादात्मक असू शकते, की जी आपल्या अंतरंगात न डोकावता केली गेली आहे. […]

नवं सौरचक्र

सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सियस इतकं असतं, तर सौरडागांचं तापमान हे सुमारे तीन हजार सेल्सियस इतकं असतं. हे सौरडाग जरी सूर्याच्या इतर पृष्ठभागाच्या तुलनेत थंड असले तरी, हे सौरडाग म्हणजे अतितीव्र चुंबकीय क्षेत्राची ठिकाणं आहेत. सूर्यावरून उफाळणाऱ्या सौरज्वाला या, याच डागांच्या परिसरात निर्माण होतात. […]

‘रईस’ भात

स्वयंपाक करणारी स्त्री ही जर का सुगरण असेल तर ती भाताचे विविध प्रकार करुन वाढते. मग तो नारळी पौर्णिमेला केलेला नारळीभात असेल, कधी सणासुदीच्या निमित्ताने केलेला मसाले भात असेल, कधी टोमॅटो भात, कधी विविध भाज्या वापरुन केलेला व्हेज पुलाव असेल, मटारच्या सीझनमध्ये मटार पुलाव असेल तर कधी जिरा राईस! […]

मगरी – दोन पायांवर चालणाऱ्या!

मगर ही चार पायांवर चालते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, दोन पायांवर चालणाऱ्या मगरी तुम्हाला माहीत आहेत का? अशा मगरी अस्तित्वात होत्या. परंतु अलीकडच्या काळात नव्हे, तर अकरा ते बारा कोटी वर्षांपूर्वी – ज्या काळात डायनोसॉरचं राज्य होतं त्याकाळात. […]

एक अल्पायुषी बेट

टोंगा बेटांचा प्रदेश हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय प्रदेश आहे. इथे पृथ्वीच्या कवचातील दोन भूपट्ट एकत्र आले आहेत व त्यातील एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली सरकत आहे. अनेक ज्वालामुखींनी व्यापलेला, वारंवार भूकंप घडून येणारा, असा हा प्रदेश भूशास्त्रज्ञांकडून पूर्वीपासूनच अभ्यासला जात आहे. […]

आभासी आकर्षणाचे परिणाम

करिअरची निवड करताना तर अनेकांच्या बाबतीत अनेकदा काही घडायच्या ऐवजी बिघडतेच. करिअर निवडताना केवळ भावनेच्या आहारी जाऊन आणि त्यांतील ग्लॅमरमुळेच अनेकजण त्याकडे आकर्षित होताना दिसतात. […]

काही चांगल्या सवयी

दोघी एकमेकींना आजारी पडलेलं बघत, बरं होताना बघत, त्याबद्दल मला प्रश्न विचारत, तेव्हा त्या त्या वयाच्या त्यांच्या आकलनानुसार त्यांना काय झालंय, ते कशाने बरं होईल याची शास्त्रोक्त माहिती मी देत असे, अजूनही देते. […]

कोझलमधले खड्डे

कोझल इथल्या या खड्ड्यांपैकी अनेक खड्डे पाण्यानं भरले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांच्या परिसराला आता पाणथळी स्वरूप प्राप्त झालं आहे. हे पाणथळ परिसर म्हणजे बेडकासारखे विविध प्रकारचे उभयचर, सरीसृप, कीटक, पक्षी-प्राणी, इत्यादींचं वसतिस्थान होऊन, कोझलच्या खोऱ्यात ठिकठिकाणी नवीच वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था विकसित झाली आहे. […]

1 82 83 84 85 86 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..