हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला. […]
लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली. […]
दोन्ही मुलांना एकत्रच जेवायला देणे, स्वतंत्रपणे किंवा एकाचवेळी, एकत्र झोपवणे, यातले मतभेद एका जागी. आणि आपल्या बाळाला असं वाढताना, मोठं होताना पाहाणं, त्याच्या एकेक कला-गुणांचं संवर्धन होताना अनुभवणं, हे आपल्याला ज्या एकतानतेने करायचं असतं ना, ते जमत नाही जुळी असताना! […]
हल्ली बहुतेक सार्वजनिक आणि अनेक खासगी पूजांनंतर ‘घालीन लोटांगण’ या प्रार्थना श्लोकांमध्ये समाविष्ट ‘अच्युतं केशवं’ या श्लोकाने सुरुवात होणारे हे अत्यंत रसाळ आणि सोपे अष्टक श्रीमद शंकराचार्यांनी ‘स्रग्विणी’ वृत्तात (रररर) रचले आहे. श्रीविष्णूची विविध नावे व मुख्यतः राम व कृष्ण अवतारांभोवती गुंफलेले हे स्तोत्र अत्यंत गेय आणि लोकप्रिय आहे. […]
पंधरा कथा असलेले आणि केवळ ८८ पानांचे हे पुस्तक, मराठी कायदेविषयक साहित्यातील एक अमूल्य ठेवा बनून राहिले आहे. लेखिका बागेश्री ताई , या कुटुंब न्यायालयाच्या निवृत् न्यायाधीश आहेत . तसेच गेली चाळीस वर्षे मॅरेज कौन्सिलिंग नंतर न्यायदान आणि त्यानंतर ज्येष्ठांचे कौन्सिलिंग करीत असताना त्यांना जे अनुभव आले ते केसेस आणि कथांद्वारे त्यांनी लिहिले आहेत. […]
श्वास रोखून बराच काळ पाण्याखाली खोलवर राहणाऱ्याच्या शारीरिक क्रियांत नक्की किती प्रमाणात बदल होतो! कारण मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा फारच कमी झाला तर, बेशुद्धावस्थेची आणि इतर गुंतागुतीची शक्यता असते. […]
करिअरची निवड हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा असतो. अनेकांच्या करिअर निवडीच्या संकल्पना ह्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर ठरलेल्या असतात. बदलत असलेले जीवनमान, वाढत जाणाऱ्या गरजा आणि अपेक्षा, स्पर्धेची समस्या अशा अनेक कारणांमुळे करिअर निवडीच्या बाबतीत अनेक भ्रम आणि संभ्रम निर्माण होत जातात. […]
पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे. […]
पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. मुघल गार्डन आज पासून, म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. […]
गणपतीच्या चार हातात कुऱ्हाड, दोरी, मोदक आणि कमळ आहे. कुऱ्हाड, आध्यात्माच्या कुर्हाडीने इच्छेचा नायनाट करता येतो. दोरी हे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे आपल्याला संसारापासून, भौतिक जगापासून दूर करण्यास मदत करते, ज्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. मोदक हे साधकाला आध्यात्मिक साधनेतून मिळणाऱ्या आनंदाचे प्रतीक आहे. आणि कमळ म्हणजे आत्म-साक्षात्काराच्या त्या दैवी अवस्थेसाठी ज्याची प्रत्येक मनुष्य जाणीवपूर्वक किंवा नकळत इच्छा करतो. […]