नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

‘मार्क झुकेरबर्ग’ चे यशाचे १० मंत्र

अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता. […]

महात्सुनामीचे पडसाद

पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं स्वरूप साफ बदलण्यास कारणीभूत ठरलेला हा आघात खगोलशास्त्र, भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, अशा विविध शास्त्रांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला आहे. या विविध क्षेत्रांतील संशोधनातून या आघाताचं व त्याच्या परिणामांचं स्पष्ट चित्र हळूहळू उभं राहात आहे. […]

घराचं स्वप्नं साकारताना…..

आपल्या घराचं स्वरूप आणि रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या निवडलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्व देखील खुलून येत असतं. सौदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही, तर अंतर्मनातही होत असतो. त्यासाठी घराची निवड करताना वरील सर्वच बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं. […]

हायसिन – जीवसृष्टीयोग्य ग्रह

प्रा. सारा सिगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनानं, ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असण्यासंबंधीच्या निकषांना वेगळंच वळण दिलं. हायड्रोजनयुक्त वातावरण असलेले ग्रहही जीवसृष्टीसाठी योग्य असू शकण्याची शक्यता या संशोधनावरून दिसून आली. विश्व हे नव्वद टक्के हायड्रोजननं भरलेलं असल्यानं, पृथ्वीपेक्षा आकारानं मोठ्या असणाऱ्या अनेक ग्रहांवर हायड्रोजनयुक्त वातावरण असण्याची शक्यता बरीच आहे. […]

बिदागी

लहानपणी हा पडदा जे जे दाखवायचा ते ते सारं खरं वाटायचं. अजूनही भावनाप्रधान पाणी येतच टचकन डोळ्यात कधीतरी खूप तीव्र, आतवर भिडणारं बघितलं की, पण त्यावर आता वाढत्या वयाचं लेबल अलगद लावायला शिकलोय मी! चित्रपटगृहाच्या अंधारात याच्याच आश्वासनावर कित्येक तास विनातक्रार घालविले आणि कळालेही नाही, कधी समृद्ध झालो तो! किती शिकवले या पडद्याने- अजूनही त्याची शाळा सुरूच आहे आणि माझ्या हातातील पाटी-पेन्सिलही. […]

डभईची लढाई (भाग पाच)

डभईच्या युद्धाला कारणीभूत झालेल्या मराठेशाहीतील अपप्रवृत्ती पुढील काळात कमी झाल्या नाहीत, त्या तशाच राहिल्या; आणि त्याचा अनर्थकारी परिणाम ३० वर्षांनी पानिपतावर दिसून आला. […]

आमची पहिली स्पर्धा

गणेशोत्सवात आणि स्पर्धेतही भाग घ्यायची, दोघींची ती पहिलीच वेळ होती! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव तो पहिलाच होता. […]

नोबेल पारितोषिकं – २०२१

सन २०२१ची नोबेल पारितोषिकं जाहीर झाली आहेत. यातील शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्रातील पारितोषिक हे शरीरातील जाणिवांच्या उगमस्थानावरील संशोधनासाठी दिलं जाणार आहे, तर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे गुंतागुंतीच्या रचनांवरील संशोधनासबंधी दिलं जाणार आहे. रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे सेंद्रिय उत्प्रेरकांवरील वैशिष्ट्यपूर्ण संशोधनानिमित्त दिलं जाणार आहे. विविध वैज्ञानिक विषयांतील या वर्षीच्या नोबेल पारितोषिकांमागच्या संशोधनाचा हा थोडक्यात आढावा… शरीरशास्त्र/वैद्यकशास्त्रः संवेदनांच्या जाणिवांचं उगमस्थान – […]

तीस लाख ज्यूंचा बळी घेणारा कर्दनकाळ

….पण याच छोट्या ज्युने भविष्यात एक दोन नव्हे तर तीस लाखाहून जास्त ज्यूंची निर्दय हत्या केली होती. या छोट्या ज्युचे नाव होते, एडॉल्फ आइकमन.आणि योगायोग म्हणजे याच शाळेत सतरा वर्ष आधी हिटलर शिकत होता. […]

एक प्रदीर्घ ‘रात्र’

सातशे दिवसांच्या अंधारानंतर मात्र जवळजवळ पंचाहत्तर टक्के जीवसृष्टी नष्ट होऊन, मोठे बदल असणारी नवी जीवसृष्टी निर्माण होते. या सातशे दिवसांच्या म्हणजे जवळजवळ दोन वर्षांच्या काळोखानंतर, सूर्यप्रकाश जरी प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याइतका तीव्र झाला असला तरी, जीवसृष्टीची पुनः सुरुवात होण्यास किमान चाळीस वर्षांचा दीर्घ काळ लागतो. […]

1 85 86 87 88 89 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..