रॉबर्ट होल्झवर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विश्लेषणानुसार, २०१० सालच्या जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत पृथ्वीवर लखलखणाऱ्या दर हजार विजांमागे दोन विजा आर्क्टिक प्रदेशात नोंदल्या जात होत्या. मात्र, २०२० साली हाच आकडा दर हजारी सहापर्यंत वर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे आर्क्टिक प्रदेशातही हवेचे प्रवाह आता काहीसे सहजपणे वर जाऊ लागले आहेत. याचा परिणाम विजांची संख्या वाढण्यात होत आहे. […]
मग तीन -चारच्या सुमारास प्रोजेक्ट लीडरने बोलावले. त्याच्या पुढचा डेस्क खाली होता. त्या कॉम्प्युटरवर त्याने एक इंटरफेस ओपन करून ठेवला होता आणि अगम्य भाषेत मला ते काम करायला सांगितले. […]
पृथ्वीचा असा खोलपर्यंत घट्ट झालेला हा जाड पृष्ठभाग म्हणजेच आजचं शंभर-दीडशे किलोमीटर जाडीचं पृथ्वीभोवतीचं घन स्वरूपातलं भूपृष्ठ! या भूपृष्ठाच्या निर्मितीच्या वेळी पृथ्वीचं वय होतं जवळजवळ एक अब्ज वर्षं. पृथ्वीवर खनिजांची निर्मिती होऊ लागली पृथ्वीच्या जन्मानंतर सुमारे दहा-पंधरा कोटी वर्षांनी; त्यानंतर आणखी सुमारे ऐंशी कोटी वर्षांनी पृष्ठभागाला आजचं स्वरूप प्राप्त झाल्याचं यावरून दिसून येतं. […]
2020 च्या मार्च महिन्याआधी आपण ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून गृहीत धरुन चाललो होतो, त्यात भरलेल्या चित्रपटगृहात पॉपकॉर्न खात मजेत सिनेमा पहाणं, ही एक गोष्ट होती. त्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाउनमधे थिएटर्स बंद होणं आणि टेलिव्हिजन हे आपलं करमणुकीचं प्रमुख साधन बनणं हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता….. […]
लाल शैवालांच्या अस्तित्वामुळे बर्फाची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता वीस टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचं आढळलं आहे. प्रकाश अधिक प्रमाणात शोषला जात असल्यामुळे, लाल रंगाचं बर्फ तापमानवाढीस कारणीभूत ठरतं आहे. […]
गाडीत चढून बसले आणि गाडी सुरू झाली. अजूनही मला विमानात असल्यासारखंच वाटत होतं. कारण आवाज तसाच होता. क्षणभरात त्या गाडीने काय स्पीड घेतला! गाडीची दारे बंद होती आणि एसी चालू होता. […]
कोरोनोत्तर नाटक हे कोरोनावरची तात्कालिक प्रतिक्रिया स्वरूपाचे असण्याचा धोका आहे. ग्लोबलायझेशननंतर व्हायरस, डिस्क, डिलीट डेटा असे शब्द आले की झाली पोस्टग्लोबलायझेशन कविता असे वाटून कितीतरी कविता प्रसवल्या गेल्या. आता मास्क, सोशल डिस्टंसींग, सॅनेटायझर लॉकडाऊन यांचा मुक्तपणे वापर म्हणजे कोरोनोत्तर कलाकृती असा समज करून दिला जाऊ शकतो. […]
न राहून थोड्यावेळाने परत उघडली. अचानक सूर्यकिरण अंगावर आले. सूर्यकिरणात बरोबर ढगही आत घुसू पाहत होते असे वाटले. ते ढगांचे वादळ आता आतच शिरणार असे वाटून मी पटकन बाजूला झाले. मग माझे मलाच हसायला आले. सूर्यकिरणे- ढगांची एकमेकांबरोबर मौज मस्ती चालू होती. […]
साडे सात वर्षांपूर्वी, Gyanac ने जेंव्हा जुळी असल्याचं confirm केलं, तेंव्हा खरं तर काही मिनिटांसाठी आम्ही दोघेही निःशब्द झालो होतो. तसं पाहाता साहजिकच आहे; तरीही एका मुलासाठीच कशीबशी मानसिक तयारी केलेले आम्ही, जुळ्यांसाठी सर्वार्थाने तयार होतो का, हा एक मोठा प्रश्न होता. […]
वर्तमानात जगा , भूतकाळ संपला , भविष्यकाळ कुणी पाहिलाय? हे कितीही खरं असलं तरी , वर्तमान काळ हा भविष्याची चाहूल घेऊनच येतो, म्हणूनच वर्तमानात जगत असताना भविष्याची तरतूद करणं आपल्या हातात आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे केवळ ज्येष्ठ पिढीने नव्हे तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना जमला पाहिजे तो समतोल. विचारांचा, भावनांचा, धारणांचा आणि कृतींचा.. […]