एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती. […]
पृथ्वीवर सर्वत्र विजांचंं प्रमाण मोठं होतं. त्याबरोबरच अंतराळातून अशनींचा मोठा माराही होत होता. या सर्व कारणांमुळे जगभर अनेक ठिकाणी वणवे लागत होते. या परिस्थितीला अंटार्क्टिकाही अपवाद असण्याचं कारण नव्हतं. […]
मी बेधडक आत शिरले आणि जेवणावर यथेच्छ ताव मारला. मला नंतर कळले (लंडनला पोचल्यावर) की फक्त बिझनेस आणि फर्स्ट क्लास पॅसेंजरस्नाच फ्री जेवण असतं. बरं! मला त्यांनी बोर्डिंग पास मागितला नाही, नाही तर जेवण खूपच महागात पडलं असतं. […]
कोरोनामुळे जशी जगाची घडी विस्कटली, तशीच महाराष्ट्राच्या राजकारणाचीही अवस्था आहे. त्यामुळे जशी नवी आर्थिक घडी बसवावी लागेल, तशीच नवी व सुधारित राजकीय व्यवस्थाही उभी करावी लागेल. आशा इतकीच बाळगूया की, 2024 पर्यंत सकाळ नक्कीच उगवेल. येणाऱया नव्या प्रकाशाची कोवळी व आश्वासक किरणे या अस्थैर्याचा नायनाट करून नवे शाश्वत जग आपल्याला दाखवेल! […]
समोर भल्या मोठ्ठ्या काचेच्या भिंती. पलिकडे अवाढव्य विमाने, टॅक्सी वेज्, कुठे प्लेन उड्डान घेण्याच्या तयारीत तर एखादे प्लेन आपले प्रवाश्याना ईप्सित स्थळी पोचवण्याचे कर्तव्य पार पाडून विश्रांती घेण्याच्या तयारीत. माझ्या डाव्या हाताला रेस्टारंटस्, दुकाने होती – अतिशय शोभिवंत आणि देखणी! […]
शरीरातून उत्सर्जित झालेले बहुतांश अवरक्त प्रकाशकिरण, शोषले न जाता या कापडातून पार होत होते. यामुळे कापडाच्या आतलं तापमान कमी राहात होतं. मात्र या कापडाच्या वापराला एक मोठी मर्यादा होती. अवरक्त किरण न शोषता पार होण्यासाठी या कापडाची जाडी मिलीमिटरच्या विसाव्या भागापेक्षाही कमी असणं गरजेचं होतं. […]
सूर्यमंडल स्तोत्र भविष्य पुराणांतर्गत एक भाग आहे. यालाच सूर्यमंडल अष्टकम् असेही नाव आहे (परंतु श्लोकसंख्या ८ पेक्षा अधिक आहे). सूर्याच्या स्तुतीला वाहिलेल्या या स्तोत्राची रचना इन्द्रवज्रा वृत्त तसेच अनुष्टुभ छंदात केली आहे. […]
फायनली, मुकुंदला ही अच्छा करून माझी एक बॅग आणि खांद्यावर एक सॅक घेऊन मी प्लेन मध्ये पाय ठेवला. आयुष्यात पहिल्यांदा विमानात शिरत होते!! ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट बघत होते, तो आता आला. […]
बेल वृक्ष (बिल्व वृक्ष) : बेल हा पानझडी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ईगल मार्मेलॉस आहे. लिंबू व संत्रे या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश, कंबोडिया, थायलंड इ. देशांत निसर्गत: वाढलेला आढळतो. भारत, श्रीलंका, जावा, फिलिपीन्स व फिजी या देशांत बेलाची लागवड […]
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मराठी माणसाने सर्वकांही केले. साम, दाम, दंड भोगला. बलिदान दिले, अनंत हालअपेष्टा सहन केल्या, कारावास भोगला. तेंव्हा कुठे दिल्लीश्वरांच्या मनात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीचा कांहीसा विचार येऊन गेला. त्यादृष्टीने कांही हालचाली होतात न होतात तोच प्रत्येक वेळी राष्ट्रीय आपत्ती आली नि सीमाप्रश्न मागे पडला. […]