१९४३ साली दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान-निकोबार द्विप समुह त्यांनी जिंकला. […]
बातम्या आणि जाहिराती यांच्यातले अंतर हळुहळू मिटत चालले आहे. कोविडनंतर तर जाहिरातींचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिक गणित जुळवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या जातात. पेड न्यूज फक्त निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत, तर त्या कायमच्याच मानगुटीवर बसल्या आहेत. त्यामुळे बातमी कुठली आणि जाहिरात कुठली हे वाचकांना कळेनासे झाले आहे. […]
माझी स्वतःची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैली नाही. जर का काही साधर्म्य आढळले तर वाचकांनी माफ करावे. साधर्म्य सापडण्याचे एकच कारण की त्यांची प्रवासवर्णने ही मनात इतकी रुजली आहे कि ते सौंदर्य अनुभवताना त्यांच्या लेखना पलीकडे दुसरा विचार सुचला नाही. […]
धूमकेतूच्या केंद्रकाचा आकार हा सर्वसाधारणपणे दहा ते वीस किलोमीटरच्या दरम्यान असतो. हे केंद्रक खडक, धूळ, पाणी, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, इत्यादींपासून बनलेलं असतं. जेव्हा धूमकेतू अंतराळातून प्रवास करत असतो, तेव्हा या केंद्रकाचं तापमान खूप कमी असतं. परिणामी, त्यावरील पाणी, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, यांसारखे पदार्थ गोठलेल्या अवस्थेत असतात. […]
शिक्षणासाठी जागतिक बँक विषेश परिश्रम घेते. या साठी आंतरजालाधारित प्रशिक्षण व इतर पर्यायांचा उपयोग केला जात आहे. भारतासहित अनेक देशांना या बँकेने विवीध प्रकल्पासाठी कर्जे दिली आहेत. […]
हॅरिसन ॲलन-सटर आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी प्रयोगशाळेत केलेल्या आपल्या प्रयोगात, सिलिकॉन कार्बाइड हे संयुग पाण्यात बुडवून त्यावर प्रचंड दाब दिला. त्यानंतर लेझर किरणांच्या साहाय्यानं, दाबाखाली असलेल्या या सिलिकॉन कार्बाइडचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढवलं. पृथ्वीवरच्या वातावरणातील दाबाच्या सुमारे पाच लाखपट दाब आणि सुमारे तेवीसशे अंश सेल्सियस तापमान निर्माण झाल्यावर, सिलिकॉन कार्बाइ़डमधील कार्बनचं रूपांतर चक्क हिऱ्यांत झालं. […]
आम्ही सृष्टी सौंदर्य दर्शन आटोपते घेतले आणि उतरायला सुरुवात केली. गुरुशिखराच्या शेवटच्या काही पायऱ्या खूपच अरुंद होत्या आणि जवळ जवळ होत्या.त्यामुळे माझ्या चप्पल घसरायला लागल्या. शेवटी मी काही पायऱ्या चपला सरळ हातात घेऊन उतरले. […]
चित्रपटांतील नायिकांना “नृत्य “आलेच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. नायकांना जमले नाही (गेला बाजार – सनी देओल) तरी चालते, पण नायिकांची त्यापासून सुटका नाही. आजवर चित्रसृष्टीने अतिशय संस्मरणीय बहारदार नृत्याचे प्रसंग दिलेले आहेत आणि काही अत्युत्तम नर्तिकाही बहाल केलेल्या आहेत. मला व्यक्तिशः आवडलेले तीन प्रसंग आणि त्या साकारणाऱ्या तिघीजणी ! […]
कोणत्याही केंद्रीय संस्थेच्या सहभागाशिवाय निर्माण झालेल्या या प्रमाणित वजनांचा प्रसार धिम्या गतीनं होणं, हे स्वाभाविकच होतं. त्यामुळेच इजिप्त आणि मेसोपोटेमिआत प्रथम निर्मिलेली ही वजनं युरोपातल्या दुसऱ्या टोकाला पोचण्यास सुमारे दोन हजार वर्षांचा दीर्घ कालावधी लागला! […]
काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली. […]