नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

नृत्य आणि नर्तिका !

चित्रपटांतील नायिकांना “नृत्य “आलेच पाहिजे हा एक अलिखित नियम आहे. नायकांना जमले नाही (गेला बाजार – सनी देओल) तरी चालते, पण नायिकांची त्यापासून सुटका नाही. आजवर चित्रसृष्टीने अतिशय संस्मरणीय बहारदार नृत्याचे प्रसंग दिलेले आहेत आणि काही अत्युत्तम नर्तिकाही बहाल केलेल्या आहेत. मला व्यक्तिशः आवडलेले तीन प्रसंग आणि त्या साकारणाऱ्या तिघीजणी ! […]

प्राचीन वजनं

कोणत्याही केंद्रीय संस्थेच्या सहभागाशिवाय निर्माण झालेल्या या प्रमाणित वजनांचा प्रसार धिम्या गतीनं होणं, हे स्वाभाविकच होतं. त्यामुळेच इजिप्त आणि मेसोपोटेमिआत प्रथम निर्मिलेली ही वजनं युरोपातल्या दुसऱ्या टोकाला पोचण्यास सुमारे दोन हजार वर्षांचा दीर्घ कालावधी लागला! […]

गिरनार यात्रा (भाग – ४)

काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली. […]

मृत्युंजय दिन

स्वातंत्र्य प्राप्तीच्या दुर्दम्य इच्छेच्या जोरावर सावरकरांनी जणू मृत्यवर विजयच मिळवला होता. याच स्मरण म्हणून तसेच सावरकर कुटुंबाने देश स्वतंत्र होण्यासाठी सर्वस्वाची होळी केली त्याला अभिवादन म्हणून भारतभरातील नागरिकांनी मिळून २४ /१२/१९६० हा दिवस मृत्युंजय दिन म्हणून साजरा केला. […]

एका प्राचीन तलावाचं चरित्र

रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले. […]

‘जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा

जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं. […]

जुळ्यांना वाढवताना – नवीन लेख मालिका

… अशा एक ना अनेक प्रश्नांना आम्ही जुळ्यांचे आईवडील सामोरे जात असतो. ओह! तुमचेही हेच प्रश्न आहेत का? तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं घेऊन येत आहोत आम्ही.. या नव्या मालिकेत.. ‘जुळ्यांना वाढवताना..’ […]

मोर्चा

अनघा दिवाळी 2021 मध्ये आर. के. सावे यांची प्रकाशित झालेली दिर्घ कथा. […]

गिरनार यात्रा (भाग – ३)

6000 पायऱ्यांवर गोरक्षनाथ शिखर!! तिथे गोरक्ष नाथांनी घोर तपश्चर्या केली होती.  त्यांना दत्तगुरुनी प्रसन्न होऊन दर्शन दिले होते. तेंव्हा त्यांनी ‘मला तुमच्या चरण कमालांचे सतत दर्शन होवो’ अशी विनंती केली. तेंव्हापासून गोरक्षनाथचे स्थान वरती आणि त्याच्या थोडे खाली दत्तगुरु चे स्थान आहे. […]

वसंत देसाई- ‘कम्पोजर पार एक्सलन्स’

वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. […]

1 89 90 91 92 93 225
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..