स्वातंत्र्य प्राप्तीच्या दुर्दम्य इच्छेच्या जोरावर सावरकरांनी जणू मृत्यवर विजयच मिळवला होता. याच स्मरण म्हणून तसेच सावरकर कुटुंबाने देश स्वतंत्र होण्यासाठी सर्वस्वाची होळी केली त्याला अभिवादन म्हणून भारतभरातील नागरिकांनी मिळून २४ /१२/१९६० हा दिवस मृत्युंजय दिन म्हणून साजरा केला. […]
रशियाच्या पश्चिमेला असणाऱ्या, काळ्या समुद्राच्या परिसरातील टॅमान द्वीपकल्पावरील डोंगराळ भागात, पॅराटेथिस जलाशयाचे कालानुरूप पुरावे खडकांतील थरांच्या स्वरूपात व्यवस्थित टिकून राहिले आहेत. डॅन व्हॅलेंटिन पाल्कू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टॅमान येथील डोंगराळ जमिनीतले, पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंतच्या खडकांचे, जवळपास साडेतीनशे थरांतले सुमारे सातशे नमुने गोळा केले. […]
जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं. […]
… अशा एक ना अनेक प्रश्नांना आम्ही जुळ्यांचे आईवडील सामोरे जात असतो. ओह! तुमचेही हेच प्रश्न आहेत का? तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं घेऊन येत आहोत आम्ही.. या नव्या मालिकेत.. ‘जुळ्यांना वाढवताना..’ […]
6000 पायऱ्यांवर गोरक्षनाथ शिखर!! तिथे गोरक्ष नाथांनी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना दत्तगुरुनी प्रसन्न होऊन दर्शन दिले होते. तेंव्हा त्यांनी ‘मला तुमच्या चरण कमालांचे सतत दर्शन होवो’ अशी विनंती केली. तेंव्हापासून गोरक्षनाथचे स्थान वरती आणि त्याच्या थोडे खाली दत्तगुरु चे स्थान आहे. […]
वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. […]
डॉ. डॅनिएल मॅन्सफिल्ड यांचं हे सर्व संशोधन, भूमिती-त्रिकोणमिती या गणिती शाखांचा उपयोग ग्रीकांच्या कित्येक शतकं अगोदर बॅबिलोनिआत केला जात असल्याचं स्पष्ट करतं. पाटीवरची ही आकृती, उपयोजित गणिताकडून शुद्ध गणिताकडे होणारी वाटचाल दाखवते. […]
“विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे. […]