आजवर एकही सामना प्रत्यक्ष पाहिला नसला तरीही “ इन्साईड एज “या वेबसीरीज च्या दोन सीझन्सच्या निमित्ताने घरबसल्या पीपीएल (आय पी एल च्या धर्तीवर) चा दृश्यानुभव घेतला. एकेकाळी “जंटलमेन्स “गेम म्हणून प्रसिद्ध असलेले क्रिकेट दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये “लेट द बेस्ट विन ” या तुरटीच्या खड्याकडे येऊन संपते तेव्हा मनःपूत श्वास सोडावासा वाटला. […]
मानवी मनाचा व त्यामध्ये असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे. आज ह्या मनाची गती खूप तीव्र झालेली बघतो. म्हणूनच मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका मिनिटामध्ये २५ ते ३० विचार चालतात. पूर्ण दिवसामध्ये ४०,००० ते ६०,००० विचार येतात. जर ह्याच गतीने विचार चालत राहिले तर हे मन आणखी कमजोर होऊन जाईल. म्हणून मनाची शक्ती वाढवण्यासाठी मननशक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे. […]
आमचा हात पुरणार नाही अशा उंचीवर विराजमान झालेला मर्फी रेडिओ हे लहानपणीचे आमचे करमणुकीचे दुसरे साधन. फक्त वडील, क्वचित आई आणि अगदीच क्वचित बिघाड झाल्यावर दुरुस्त करणारे वाणी काका यांनाच रेडिओला स्पर्श करायची परवानगी होती. […]
इंग्लंडमध्ये १९२५ साली भरलेल्या वेम्बले येथील चित्रपट-प्रदर्शनात बाबूराव पेंटर दिग्दर्शित कल्याण खजिना व सती पद्मिनी हे दोन भारताचे प्रातिनिधिक चित्रपट म्हणून दाखविण्यात आले होते आणि त्यांबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र आणि पदकही मिळाले होते. […]
बाबा आमटे या दैदिप्यमान सूर्यप्रतापी व्यक्तीची ही नात ! आजोबांनी कुष्ठरोग्यांना जीवन पुनर्बहाल केलं आणि नातीने मागील वर्षी स्वतःचे जीवन संपविले. काही काळ “यूथ आयकॉन” शीतलबद्दल समाज माध्यमांवर फैरी झडल्या. नंतर “पब्लिक मेमरी ” शॉर्ट नांवाखाली सारं शांत ! ही निखाऱ्यावर जमलेली काजळी तिच्या पतीने (गौतम करजगी यांनी) “अक्षर ” या दिवाळी अंकात वरील शीर्षकाचा लेख लिहून झाडली आहे. विसरलेली खपली संयतपणे उचकटून काढली आहे. शेवटी हे नातं असं आहे की लेखन अस्सल (ऑथेन्टिक) वाटतं. […]
शब्दाची किंमत ठेवावी वा असावी. पण आज ह्या घोर कलियुगामध्ये शब्दाची काही किंमत नाही. शपथ, वचन, प्रतिज्ञा.. हे शब्द नाहीसे होऊन गेले आहेत. संबंधामध्ये दुरावा येण्याचे हे एक कारण आहे की मनुष्य जस बोलतो तस वागत नाही. कधी कधी विचार येतो की ‘ का बरं एखादा व्यक्ति असं करत असेल?’ काही कारण नसताना ही आज मनुष्याला खोटं बोलावं लागते. […]
डॉक्टर राजेश बर्वे या व्यक्तिमत्त्वाला मी सर्वप्रथम भेटलो १९९३ साली. आणि त्यानंतर मीच नव्हे तर माझ्या परिवारातील सारेच त्यांच्या उपचाराचे fan झालो. […]
तलावांचे शहर च्या पहिल्या भागात आपण ठाणे शहरातील मासुंदा तलावा विषयी माहिती घेणार आहोत. मासुंदा तलावाला भेट न देणारा असा एकही ठाणेकर आपल्याला मिळणार नाही. […]
आज मी ज्या एका लेखिका, रसाळ निवेदिका, उत्कृष्ट वक्त्या, संस्कृत भाषा आणि साहित्याच्या , तसंच संतसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक, विविधांगी आणि व्यासंगी व्यक्तिमत्व, विदुषी धनश्री लेले यांचं शब्दचित्र माझ्या कुवतीनुसार मांडणार आहे, त्यातला त्यांचा रसाळ निवेदक हा पैलू मला खूप जवळचा आहे. त्यातलं रसाळ सोडून फक्त निवेदन या क्षेत्रातला मी ही एक अगदी बारीकसा ठिपका आहे. […]
सीमाभागातील मराठी माणूस मात्र महाराष्ट्राकडे नि दिल्लीतील मराठी नेत्यांकडे आशाळभूतपणे पहात राहीला नि अजूनही पहातोच आहे. सीमाप्रश्नाचे गांभिर्य केंद्राला कधी वाटलेच नाही. त्याचा नेमका फायदा कर्नाटकाने उचलला. बेळगावची एक इंच भूमीही कर्नाटकाला देणार नसल्याची दुर्योधनी दर्पोक्ती ते करू लागले. […]