वसंतरावांच्या कर्तृत्वाचा विभागवार आढावा घेणाऱ्या या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांच्या एकूण कारकीर्दीची ओळख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी आहेत. त्यात पुस्तकाचे संकलक, संपादक विश्वास नेरूरकर यांनी ‘टेल ऑफ द मिस्टिक मिन्स्ट्रल’ या १५ पानी प्रदीर्घ लेखात वसंत देसाई यांच्या संपूर्ण प्रवासाची ओळख करून दिली आहे. […]
डॉ. डॅनिएल मॅन्सफिल्ड यांचं हे सर्व संशोधन, भूमिती-त्रिकोणमिती या गणिती शाखांचा उपयोग ग्रीकांच्या कित्येक शतकं अगोदर बॅबिलोनिआत केला जात असल्याचं स्पष्ट करतं. पाटीवरची ही आकृती, उपयोजित गणिताकडून शुद्ध गणिताकडे होणारी वाटचाल दाखवते. […]
“विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे. […]
नंदाताईचे शब्द मनात कोरून ठेवले होते, सावकाश पण निर्धाराने चढ! ते वाक्य माझ्यासाठी परवलीचे वाक्य ठरले माझ्या पूर्ण प्रवासात..! विशेषत: परतीच्या प्रवासात! […]
वेब सिरिज बनविणं हा खूप कठीण Task असतो. नुसती कथा लिहिली एका मित्राने हौशीसाठी कॅमेरा विकत घेतला त्याला शूटींगसाठी बोलावलं आपल्यातल्या काही फिल्मवेड्या मित्रांनी दिग्दर्शन व अभिनय केला इतकं सोपं ते नक्कीच नसतं. […]
जसं जशी जाण्याची तारीख जवळ येत चालली तस तशी धाक धुक वाढायला लागली. जमेल का आपल्याला? पण अरु ताई म्हणाली तसे, देवावर हवाला ठेवून, बूट खरेदी, इतर छोट्या मोठ्या गोष्टी यांची खरेदी झाली. जायचा दिवस उद्यावर येवून ठेपला. […]
पूर्ण यात्रेदरम्यान आलेले अनुभव, टाळता येण्यासारख्या चुका, श्रद्धा आणि चिकाटीने बदलेली मानसिकता हे सर्व माझे अनुभव या लेखांदरम्यान प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. […]
सीटीसी चहा म्हणजे आपण रोज घरात, आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. चहाची पाने तोडून ती वाळवली जातात आणि मग त्यांना दाणेदार रूप दिले जाते. […]