वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं. […]
भारतीय, चिनी आणि आता पाश्चिमात्य पारंपारीक आयुर्वेद शास्त्रात लवंगेला मानाचे स्थान लाभले आहे. विशेषतः दंतविज्ञान शास्त्रात दाताच्या दुखण्यावर लवंगेचा वेदनाशामक म्हणून सर्रास उपयोग होतो. त्यामुळे दंतदाह कमी होतो. पचनकारी औषधे-पेयात लवंगेचा उपयोग आलाच. चीन व भारतात मूत्राशयातील अस्वास्थ्य, पोटदुखी, तीव्र खोकला, अतिसार, ओकार्यांना प्रतिबंध यासारख्या अठरा दुखण्यांसाठी लवंगेचा वापर होतो. […]
एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो. […]
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कडाडलेल्या या विजेची, आकाशातली लांबी सुमारे ७०९ किलोमीटर इतकी प्रचंड होती. ही वीज दक्षिण ब्राझिलच्या पूर्वेकडील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून ते पश्चिमेकडील अर्जेंटिनाच्या सीमेपर्यंत पसरली होती. जागतिक हवामान संघटनेनं केलेल्या एका विश्लेषणात या महाविजेचं अस्तित्व स्पष्ट झालं. […]
भूतकाळात झालेल्या गोष्टींना पूर्णविराम देण्याशिवाय आपल्याकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. जर आयुष्याला नवे वळण द्यायचे असेल तर वाईट गोष्टींना, घटनांना विराम द्यावा. कारण आयुष्य हे ऊन पावसा सारखे आहे. सुख-दुःख ह्यांचा खेळ चालूच राहणार. पण नवीन दृश्य आपल्याला बघायची असतील तर नकारात्मक विचारांना विराम देऊन, विचारांना नवीन बनवण्याची गरज आहे. […]
“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे. […]
मेंदूतील ‘आरक्युएट फॅसिक्यूलस’ ही मेंदूतील नसांची जुडी, भाषा विकसित होण्यासाठी आवश्यक असणारे विविध भाग एकमेकांना जोडते. आर्क्युएट फॅसिक्यूलस हा भाग किती विकसित झाला आहे, यावरून त्या प्राण्याची बोलण्याची क्षमता कळू शकते. […]