नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

‘मीरा’ – उपेक्षित नाममुद्रेची उपेक्षा !

ऐतिहासिक पुराव्यां अभावी एक सर्वमान्य निष्कर्ष असा आहे की – मीरा कृष्णभक्त होती , तिने कृष्णभक्तीपर रचना केल्या (ज्या कधींच्याच अक्षर वाङ्मयांत सामील झालेल्या आहेत) आणि ती नि:संशय भक्ती संप्रदायातील एक महत्वाची संत कवयित्रीं होती. गुलजारसारख्या अंतर्बाह्य कवीला यापेक्षा अधिक काय हवे? […]

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ३ – उंबर ( औदुंबर)

नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते, किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. […]

जबाबदार कोण ?

शाळा हे मुलांना अभ्यासमध्ये गुंतवून ठेवणारे आणि गुणांच्या चढाओढीत कुरघोडी करायला लावून शाळेचा गुणांचा TRP वाढवणारे कारखाने झालेयत.  90%, 95%,  98%, 99% गुण मिळवणारी मशीन आम्ही तयार करतोय, जी पुढे मानेवर जू ठेवून अभ्यास करत आपलं शिक्षण पूर्ण करून आणि मोठमोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवून एखाद्या यंत्रमानवासारखी वावरतायत, आत्मकेंद्रीत होऊन आपल्यापुरताच विचार करतायत.  […]

चित्रपती वी.शांताराम

लॉकडाऊनच्या काळात चित्रपट पहाण्यासाठी , अभ्यासासाठी बराच वेळ मिळत आहे. चित्रपट पहात वेळ कधी आणि कसा निघून जातो तेच कळत नाही. पूर्णतः त्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित असतं. अभ्यास करीत असताना बऱ्याच लेजेन्ड्सचे चित्रपट , माझ्या पहाण्यात आले. त्यापैकी हे नाव सर्वात महत्त्वाचे मला वाटलं. खरं सांगायचं तर हे नाव सर्वश्रुत आहे. आतापर्यंत त्यांनी बनविलेले सगळेच चित्रपट […]

वूली मॅमथचा दूरसंचार!

वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं. […]

लवंगांच्या वृक्षांनी डवरलेले झांझीबार

भारतीय, चिनी आणि आता पाश्चिमात्य पारंपारीक आयुर्वेद शास्त्रात लवंगेला मानाचे स्थान लाभले आहे. विशेषतः दंतविज्ञान शास्त्रात दाताच्या दुखण्यावर लवंगेचा वेदनाशामक म्हणून सर्रास उपयोग होतो. त्यामुळे दंतदाह कमी होतो. पचनकारी औषधे-पेयात लवंगेचा उपयोग आलाच. चीन व भारतात मूत्राशयातील अस्वास्थ्य, पोटदुखी, तीव्र खोकला, अतिसार, ओकार्‍यांना प्रतिबंध यासारख्या अठरा दुखण्यांसाठी लवंगेचा वापर होतो. […]

‘परिचय’ – नात्यांची नव्याने ओळख !

एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो. […]

महावीज !

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कडाडलेल्या या विजेची, आकाशातली लांबी सुमारे ७०९ किलोमीटर इतकी प्रचंड होती. ही वीज दक्षिण ब्राझिलच्या पूर्वेकडील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून ते पश्चिमेकडील अर्जेंटिनाच्या सीमेपर्यंत पसरली होती. जागतिक हवामान संघटनेनं केलेल्या एका विश्लेषणात या महाविजेचं अस्तित्व स्पष्ट झालं. […]

1 96 97 98 99 100 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..