नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

‘परिचय’ या चित्रपटाची ४९ वर्षे

प्रसन्न कपूर निर्मित आणि गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला ‘परिचय’ च्या प्रदर्शनास आज यशस्वी ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. १८ ऑक्टोबर १९७२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रसन्न कपूर म्हणजे जितेंद्र याचा सख्खा भाऊ होय आणि त्या काळात जितेंद्र आपल्या अभिनयाविषयी गंभीर आहे हे अधोरेखित करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली अशी चर्चा होती. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर लिबर्टी येथे या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादले. यात जीतेंद्र, जया भादुरी, प्राण आणि संजीव कुमार मुख्य भूमिकेत आहेत. […]

गोजेक

टॅक्सी किंवा कार ऐवजी बाईकस्वार पॅसेंजर ची ने आणि त्यांच्या बाईकवरून करतात. प्रत्येक गोजेक बाईकस्वार हेल्मेट आणि गोजेक चा जॅकेट घालून असतो. पॅसेंजर साठी सुद्धा एक हेल्मेट प्रत्येक गोजेक वाल्याकडे असते. जकार्ता मध्ये ट्रॅफिक ही मुंबई पेक्षा भयंकर असते. कार आणि बाईक राईड मध्ये तसं पाहिले पैशांच्या दृष्टीने तर फारसा फरक नसतो. स्वस्त असण्यापेक्षा बाईक स्वार हे कार पेक्षा लवकर पिक अप करतात आणि ट्रॅफिक टाळून, शॉर्ट कट आणि लहान रस्त्यांवरून पटापट इच्छित स्थळी पोचवतात. […]

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन (बीबीसी)

आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात बातमीची विश्वासार्हता ही चोळामोळा करून फेकून द्यायची गोष्ट झाली आहे. अशा परिस्थितीतही बातमीचे पावित्र्य जपणाऱ्या ज्या काही मोजक्या प्रसारण संस्था जगात आहेत, त्यात अजूनही ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन म्हणजे बीबीसी चे नाव घेतले जाते. […]

प्रतिभा – व्हिन्सेंट व्हॅन गॉगची – भाग १

ॲम्स्टरडॅममधील जगप्रसिद्ध भव्यदिव्य असे ‘व्हिन्सेंट व्हॅन  गॉग’ म्युझियम हे व्हॅनगॉगच्या चित्रकला प्रदर्शनाचे सर्वात  मोठे म्युझियम होय. या म्युझियम मध्ये 200 पेक्षा अधिक रंगवलेली चित्रे, पेंटिंग्स, पाचशे चित्रे ,चार स्केच बुक्स,  तसेच व्हॅन गॉगच्या अक्षरात लिहिलेली सातशे पत्रे आहेत.  कलाकाराची कला कशी  प्रगल्भ आणि सुंदर होत जाते याचा उत्कृष्ट नमुनाच बघायला मिळतो . […]

मर्चंट नेव्ही रियालिटी

मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर कामं करणारे अधिकारी आणि खलाशी हे संपूर्ण जगभरात असंख्य देशात जात असतात. त्यामुळे जगभर पर्यटनाचा आनंद घेतात. जहाजावर भरपूर दारू प्यायला मिळते. अनेक देशात आणि अनेक बंदरात त्यांच्या मैत्रिणी असतात. एकूणच काय तर सगळ्यांना असे वाटते की मर्चंट नेव्ही मध्ये सगळे खूप एन्जॉय करत असतात. […]

selfie

आजचे युग ‘मोबाईल युग आहे. बाल-वृद्ध, गरीब-साहूकार सर्वजण ह्या मोबाईलच्या आकर्षणामध्ये फसले आहेत. रामायणामध्ये जसे सीतेला सोनेरी हरण मोहीत करून गेले तसेच आज सगळ्यावर ह्या मोबाईलची जादू झाली आहे. काही वर्षांपूर्वी एखादा व्यक्ती एकटाच बोलताना दिसला की लोक त्याला वेडा म्हणायची पण आज ९०% लोक ह्या मोबाईल मुळे वेडी झालेली दिसून येतात. […]

अन्नशुद्धि

आजच्या आधुनिक युगात मनुष्य health concious झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती calaries, calcium, vitamin मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. तो पदार्थ मशीनने बनला असेल तर निश्चिन्त होऊन विकत घेतला जातो. आपण खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून जागृत राहणे आवश्यक आहे. […]

वेग..

वेग वाढवण्याचा काळ आयुष्यात नक्की येतो आणि त्यावेळी तो वाढवताही आला पाहिजे. मात्र कुठे वेग कमी करायचा , आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर वेग स्थिर ठेवायचा आणि आखेर, कुठे थांबायचं…वाहन चालवताना हे सगळे निकष लावून मन स्थिर ठेवून जसं आपण ड्राईव्ह करतो तसंच आयुष्य का ड्राईव्ह करू नये? ‘नजर हटी दुर्घटना घटी’ चं तत्व आयुष्य जगतानाही का अवलंबवू नये..? […]

सोलापुरी लांबोटी चिवड्याच्या जनक रुक्मिणी खताळ

१९८०च्या दशकात तीन दगडांवर चूल करून सुरू केलेला लांबोटी चिवडा आणि चहाचा व्यवसाय एका संघर्षातून त्यांनी पुढे नेला आणि यशाची शिखरे गाठली. अनेक निराधार मुलांच्या आधारवड बनल्या होत्या रुक्मिणीताई. […]

कालिकाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमद् आदिशंकराचार्यांनी भुजंगप्रयात वृत्तात रचलेले कालिकाष्टक आदिमायेचे रौद्र स्वरूप साकार करणारे स्तोत्र आहे. असुरांचा समूळ संहार करणारी, अत्यंत भीषण दिसणारी जगन्माता रुंडमाला, शवाकार कुंडले, हातांच्या आकाराची मेखला धारण करते, त्याचबरोबर ती सज्जनांसाठी मधुर हास्य धारण करून अभयदानही देते. हे स्तोत्र अंबिकेचे ध्यान व स्तुती असे विभागलेले आहे.   […]

1 97 98 99 100 101 225
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..