नवीन लेखन...

अर्थ, वाणिज्य विषयक लेख

सुलम उद्योग नोंदणी : अकारण भीती व अनास्था

२००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत अनेक लहान मोठ्या उद्योगांच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला. यात स्वतः थेट निर्यात करणारे सुलम ( सूक्ष्म, लघु व मध्यम ) उद्योग आणि निर्यात प्रधान उद्योगांना पूरक उद्योग म्हणून अवलंबून असणारे जेम्स आणि ज्वेलरी , वस्त्रोद्योग आणि बांधकाम व्यवसायाचे पूरक उद्योग, ऑटो पूरक उद्योग इ. यांचा प्रामुख्याने समावेश होता.
[…]

शेतकर्‍यांना दिलासा पीककर्जाचा

शेतीक्षेत्रातील अनिश्चिततेवर तसेच आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. त्यादृष्टीने पीककर्ज महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर या वर्षी राज्यात पीककर्ज वाटपाचे मोठे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शिवाय यंदाच्या खरीप हंगामात पीककर्जाची रक्कम २० टक्क्यांनी वाढवून मिळणार आहे. याबरोबरच घेतलेले आणखी काही निर्णय शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. […]

सुलम (सूक्ष्म, लघु व मध्यम) उद्योगांतून तंत्रशिक्षण व रोजगाराच्या संधी ….

१९९२ पासून जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागल्यावर भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने शेतीप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे वाटचाल करू लागली आहे. आज भारतात शेती व्यवसायानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध करून देणारे दुसर्‍या क्रमांकावरील क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु व मध्यम ( “सुलम”- MSME )उद्योगक्षेत्र. […]

“अवघे धरू सुलपुंज पंथ” अर्थात सूक्ष्म व लघु उद्योग पुंज विकास कार्यक्रम

“एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ” च्या ऐवजी “अवघे धरू सुलपुंज पंथ ” म्हटल्यास साखर उत्पादन क्षेत्रात सहकारान जी जादू केली तीच जादू, पुंज योजनेतून चर्म, सौंदर्य प्रसाधन, ऑटो पूरक उद्योग, काजू प्रक्रिया, वाईन उद्योग, वस्त्रमाग,पैठणी,चादर/ सतरंजी उत्पादन इ . सर्व सुल उद्योजकांना अनुभवता येईल. क्षेत्र कुठलेही असो, गरज आहे सुल उद्योग म्हणून नोंदणी करण्याची व एकदिलान,एकत्र येऊन बीज भांडवल काढून पुंज स्थापन करण्याची. […]

आयुर्विमा समजुन घ्या

आयुर्विम्याचा उद्देश हा घरातील कर्ता माणूस गेल्यावर त्याच्या कुटुंबाला साधारणपणे तीच जीवनशैली जगता यावी यासाठी तरतूद करणे हा आहे असे ढोबळमानाने म्हणता येईल. थोडक्यात विम्याची आलेली रक्कम गुंतवून त्याच्या उत्पन्नातून त्या कुटुंबाला जगता आले पाहिजे असा यामागचा विचार आहे. पण हळूहळू विमा कंपन्यांनी विविध प्रकारच्या योजना काढून या विचाराची व्याप्ती वाढवली. विम्याला करसवलत लागू केल्याने याकडे एक गुंतवणुकीचे साधन म्हणूनही पाहण्यास सुरुवात झाली. आपण या लेखात ढोबळमानाने या योजनांचा विचार करणार आहोत.
[…]

बजेटची गोष्ट

अलीकडच्या काळात अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर करण्यास सुरुवात झाली. मात्र, बजेटचा थोडा मागे जाऊन इतिहास रंजक आहे. भारतीय अर्थसंकल्पाबाबतची ही मोजकी पण संग्रही ठेवावी अशी माहिती.
[…]

अर्थापोटी अनर्थ टाळा !

नुकतीच एक बातमी वाचली कि भारतात तरूण लोकांमध्ये ह्रदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. याची कारणमींमासा करताना बदलती जीवनशैली, ताण, खाण्यापिण्याच्या सवयी यासारख्या गोष्टींकडे बोट दाखवले गेले. थोडक्यात ‘हे होणारच’ असा सूर आहे.
[…]

फायदेशीर काय? धंद्याच्या सुरुवातीला भांडवल जास्त असणं का कमी असणं?

एकदा एक युवक एका उद्योगपतीला भेटला आणि त्यांना म्हणाला ‘मला धंदा करायचा आहे. पण माझा खिसा रिकामा आहे मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे’.तो उद्योगपती त्याला म्हणाला, ‘तुझा खिसा रिकामा आहे याची तू चिंता करुच नकोस. तुझं डोकं अथवा हृदय रिकामं असेल तर तो मात्र चिंतेचा विषय ठरेल. […]

ना धरि लोभ मनी

पैसे मिळविण्यासाठी कोणताही झटपट मार्ग नाही. त्यामुळे आंधळेपणाने कुठेही पसे गुंतवू नका, ती उधळपट्टी ठरेल. छोटी रक्कम खरेच दानधर्मासाठी वापरायची असेल तर त्यातुन आदिवासी मुलांसाठी दोन-तीन सायकली घ्या. त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी ५-६ किमी पायी चालावे लागते. सायकली मिळाल्यानंतरचा त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पहा. मग तुम्हाला खर्‍या दानधर्मातला आनंद अनुभवायला मिळेल. जीवनाचा आणि देण्याचा अर्थ समजावून घ्या.
[…]

1 17 18 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..