MENU
नवीन लेखन...

अर्थ, वाणिज्य विषयक लेख

गुंतवणूक – पोर्टफोलिओ आणि सोने

देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते. […]

जनता सहकारी बँकचा ७२ वा वर्धापनदिन

आज ‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या सात दशकाहून अधिक काळ राज्याच्या सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेल्या जनता सहकारी बँक पुणे चा वर्धापन दिन. १८ ऑक्टोबर १९४९ रोजी समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनता बँकेची स्थापना झाली. […]

‘इ टी एफ’ (एक्चेंज ट्रेडेड फंड) : एक गुंतवणुक पर्याय

ETF म्हणजेच एक्चेंज ट्रेडेड फंड अलीकडे लोकप्रिय गुंतवणुक पर्याय म्हणुन नावारूपाला येतोय. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत याचा एक्स्पेन्सेस रेशिओ खुप कमी आहे म्हणुनच हा एक स्वस्त गुंतवणुक पर्याय मानला जातो. प्रस्तुत लेखात मी एक्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हा विषय थोडक्यात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. […]

प्राचीन भारतीय गणित – इतिहास आणि सद्यस्थिती

शाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का? काही जणांना गणिताची मुळात आवड असते पण काही मात्र त्याकडे रुक्ष विषय, आकडेमोड म्हणूनच पाहतात. पण भारतीय व्यवहारात आणि इतिहासात गणिताची सुरुवात आणि रुजवात कशी झाली हे समजून घेण मात्र तितकच रंजक आहे बर का! हा विषय तसा विस्ताराने मांडण्याचा आहे. पण वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यासाठी किमान काही प्राथमिक माहिती हाती असावी इतकाच या लेखाचा मर्यादित उद्देश आहे. […]

‘अर्थ’ संकल्प 

१ फेब्रुवारी २०२० रोजी आपल्या संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणि अर्थसंकल्पाला अर्थ निश्चितच आहे. अर्थाचे काय ? भाषाशास्त्र असं सांगते की शब्दाचा अर्थ लावावा तसा लागतो. दिल्या शब्दाचा दिल्या परिस्थितीत एक अर्थ असू शकतो आणि वेगळ्या परिस्थितीत वेगळाही असू शकतो. काही काही वेळा तर एकाचवेळी एकाच गोष्टीचे एकापेक्षा जास्त अर्थ लावता येतात …. […]

ठाण्याचा घोडबंदर रोड : सर्वांची सर्वाधिक पसंती

ठाणे शहर जागतिक शहरात रूपांतरित होत असताना रोडाज, ठाणे इस्टेट आणि हिरानंदानी वन पार्क  यासारखे प्रकल्प शहराचे मानबिंदू बनले आहेत. व्यापारी केंद्रे, विविध कंपन्यांची कार्यालय आणि माहिती-तंत्रज्ञानाची केंद्रे यांनी हा सारा परिसर सातत्याने उत्साहाने परिपूर्ण असतो. […]

कलम ३७० पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना

गेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते.  […]

प्री ओपनिंग सेशन (BSE /NSE)

शेअर मधे गुंतवणूक करणाऱ्याने शेअर बाजाराचे व्यवहार नेमके कसे चालतात याची थोडीफार तरी माहिती करून घेतली पाहिजे असे मला वाटते. भारतामधे “बॉम्बे स्टोक एक्स्चेंज” (BSE) व “राष्ट्रीय शेअर बाजार” (NSE) हे  दोन प्रमुख शेअर बाजार आहेत.  या ठिकाणी  शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मागणी व पुरवठा या तत्वावर  शेअरची किमत  ठरत असते. ही दोन्ही  मार्केट  बरोबर ९ वाजता सुरु होतात. पण रेग्युलर  सौद्यांची सुरवात ९.१५ पासून सुरु होते ती ३.३० वाजता संपते. […]

प्रसारमाध्यमांचे संस्कार व विकार 

प्रसारमाध्यमांतून वास्तूशास्त्रवाले, कोचिंगवाले, भविष्यवाले, संत, महात्म्ये आपले विकार, संस्कार म्हणून बिंबवत आहेत. हीच आजची शोकांतिका आहे. संस्काराच्या टिपकागदाने विकार टिपलेच पाहिजेत, नाही तर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही.  […]

राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी

आपल्या सर्वाना १९९२ सालातला हर्षद मेहता स्कॅम आठवत असेलच. याच्यानंतर भारतीय  भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात बदल झाले. हे सर्व गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी होते. भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९८८ साली सेबीची स्थापना झाली आणि ३० जानेवारी १९९२ पासून सेबीला सर्व अधिकार बहाल करण्यात आले. NSDL (ऑगस्ट १९९६) व CDSL (फेब्रुवारी १९९९)  या दोन प्रमुख DEPOSITORY अस्तित्वात आल्या आणि शेअर डीमैट स्वरुपात उपलब्ध होऊ लागले. […]

1 3 4 5 6 7 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..