आपल्याला दररोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर बऱ्याच गोष्टी दिसतात पण आपण त्याचा साकल्याने विचार, चिंतन, अभ्यास किंवा त्याकडे कुतूहलाने बघत नाही. जसे आपल्या शेजारी एखादी इमारत बांधत असतील किंवा जाणाऱ्या येणाऱ्या रत्यावर इमारतीचे बांधकाम चाललेलं असेल तर आपण नुसतं बघतो आणि पुढे जातो. मनात नाना विचार येतात “मुंबईची नुसती वाट लावली आहे”. एवढ्या इमारती बांधून नागरिकांच्या मुलभूत गरजा कश्या भागविता येणार आहेत? मुंबईत दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप घारण करीत आहे. त्याला कारण आहे निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र. त्यात एखादे वर्षी पाऊस नीट पडला नाही आणि तळी भरली नाही की पाणी कपात आणि बरेच काही. हे सगळे सांगण्याचा खटाटोप अश्यासाठी की….. […]