नवीन लेखन...

कुठलं खाद्यतेल वापराल?

फोडणीसाठी देशी गायींच्या दुधापासून बनवलेलं तूप वापरावं हे आपण या आधी पाहिलं. तरीही ज्यांना तूप न वापरता तेलच वापरायचं आहे त्यांनी काय काळजी घ्यावी ते आपण पाहणार आहोत. कुठलं तेल वापराल? आजकाल आम्हाला ऑलिव्ह ऑइल खूपच ‘हेल्दी’ असतं असा साक्षात्कार झाला आहे. उठसुठ सगळ्या पदार्थांत आम्ही हे महागडं तेल वापरतोय. प्रत्यक्षात ज्या देशांतून हे तेल आपल्याकडे […]

फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?

फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?! काहींना हा प्रश्न वाचून आश्चर्य वाटले असेल. फोडणीसाठी तेलच वापरले जाते हे आपल्या सगळ्यांना तोंडपाठ असलेले उत्तर. त्या तेलातही सोयाबीन वापरावे की सूर्यफूल अशा प्रश्नातच आम्ही बुडालेले असतो. मात्र मुळात फोडणीसाठी तेलच वापरावे का अन्य काही पर्याय आहे? याचा विचारदेखील आमच्या मनाला शिवत नाही. फोडणी देताना नेमकी काय प्रक्रिया होते? […]

परदेशी खाद्यपदार्थ वाईट असतात का?

ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो. १. वरील पदार्थ वाईट आहेत […]

बेबी कॉर्न

आजचा विषय बेबी कॉर्न मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. […]

⁠⁠⁠गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का?

उत्तर. नाही…  यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही. भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ. लवकरच अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र येईल आणि त्याच बरोबर शरदाचे कडक ऊन ज्याला सर्वसामान्य भाषेत ‘अॉक्टोबर हीट’ असे म्हणतात तो काळ सुरू होईल. किंबहुना यंदा पाऊस कमी झाल्याने ऊन्हाचा जोर वाढलेला आत्ताच […]

मावा मोदक

साहित्य : पाव किलो मावा, ८५ ग्रॅम बारीक साखर, १ चमचा वेलची पूड ,केशर अगर केशरी रंग. मोदकात भरण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता पूड अगर बेदाणे हे सारे आपल्या आवडीवर आहे. कृती : मावा मिळून घेवून त्यात साखर मिसळावी .कल्हई केलेले पितळेचे पातेले घेवून त्यात मावा घालून मंद गस वर ढवळत राहावे.मधून मधून गोळी होत आली का […]

पांढरे शुभ्र रव्याचे मोदक

साहित्य : २ वाटी ओल्या नारळाचं खोबरं, २ वाटी साखर, १ चमचा वेलदोडे पुड, ४-५ कुसकरलेले पेढे, २-३ केळी, ६ वाट्या रवा, ७ वाट्या पाणी, १ चमचा डालडा, अर्धा चमचा मीठ. कृती : ओल्या नारळाचं खोबरं, साखर वेलदोडे पुड, पेढे आणि केळी यांचं सारण बनवून घ्यावं. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ आणि डालडा टाकावा. […]

आजचा विषय मोदक….

मोदक म्हटलं की लगेच आठवते ते तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा – साजूक तुपाच्या धारेबरोबर – शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद असलेला हे उकडीचे मोदक जे गणपती आल्यावर पहिल्या जेवणात नैवेद्ध म्हणून असतातच. प्रत्येक घरात गृहिणीनी बनवलेले मोदक, याची एक वेगळीच चव असते. काही जणी तर साचा न वापरता […]

कॉर्न फ्लेक्सची जन्मकथा…

मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार प्राणी आहे. तो सतत नवेनवे शोध लावत असतो. या शोधांचं कारण म्हणजे मानवाची गरज दिवसेंदिवस वाढत गेली. असं म्हणतात की गरज ही शोधांची जननी आहे. पण जगातल्या अनेक शोधांचा उगम माणसाने केलेल्या चुकांमधून किवा अपघातातून झालेला आहे. अमेरिकेतील दोन भावांच्या विसराळूपणामधूनच शोध लागला फ्लेक्स या खाद्यपदार्थाचा. सकाळी उठल्यानंतर आपली सर्वात पहिली […]

जीवाची (की जिभेची?) मुंबई

मुंबईत खाबुगिरीसाठी जागांची कमतरता नाही. वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या चवींच्या अक्षरश: सगळ्या खाद्यपदार्थांची उपलब्धता मला वाटते मुंबईशिवाय भारतातल्या कोणत्याही शहरात नसेल. मुंबईचे एक खास वैशिष्ट्य आहे. इथे तुमच्या खिशात किती पैसे खुळखुळतायत त्यावर वेगवेगळे पर्याय आपल्याला उपलब्ध असतात. अगदी गाडीवरच्या वडा-पाव पासून पंचतारांकित हॉटेलमधल्या मल्टी-कोर्स जेवणापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असतात. आतातर गाडीवर चायनिज आणि कॉन्टिनेन्टल पदार्थही मिळतात. […]

1 8 9 10 11 12 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..