नवीन लेखन...

साबुदाणा – समज आणि गैरसमज !!

चातुर्मास सुरु झालाय आणि सहाजिकच उपवासाचे दिवसही. आषाढी एकादशीही आली.  महाराष्ट्रात लाखो लोकांचा हा उपवासाचा दिवस. “एकादशी- दुप्पट खाशी” असा वाक्प्रचार या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रचलित झालाय. कारण सहाजिकच आहे. या दिवशी बर्‍याच लोकांच्या उपवासाच्या थाळीमध्ये अनेक सुग्रास खाद्यपदार्थ असतात. बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस, शिंगाड्याचा शीरा, उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ, राजगिर्‍याच्या पुर्‍या आणि अर्थातच साबुदाण्याची खीर किंवा खिचडी ! […]

माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी

आपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात). साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले, मी केलेल्या पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात. आज लेक- जावई […]

असे पंचतारांकित पदार्थ मराठमोळे!

देशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे. […]

मिक्स परांठा- गाजर+ वाटाणे+ चुकुंदर (बीट)

हिवाळ्यात भाजी बाजारात गाजर आणि वाटाणे भरपूर असतात. गाजर आणि वाटण्याची कोरडी भाजी मस्तच लागते. पण गेल्या रविवारी सौ. ने विचारले. गाजर, मटर (वाटाणे) घालून उपमा करू का? मी म्हणालो, उपम्याच्या जागी यांचे परांठे केले तर कसे लागतील. सौ.ला ही कल्पना आवडली. साहित्य: गाजर २५० ग्रम, मटार (वाटाणे) १ वाटी, चुकुंदर(बीट) १ मोठे. , हळद, हिरवी […]

अथ: वांगे पुराण

आपल्या देशात प्रत्येक प्रांततल्या थाळीत, वांग्याचा एखाद पदार्थ असतोच. ‘थालीचे बैंगन’ एका थाळीतून दुसऱ्या थाळीत बेशर्मीने (लाज-लज्जा सोडून) लुढकत राहतात. आजकाल तर अश्या वांग्यांचा भाव वधारला आहे. महाराष्ट्रात तर कळतंच नाही कुठला बैंगन कुठल्या थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जाणार आहे. खरंच म्हंटले आहे, ताज एक तर बादशाहच्या डोक्यावर असतो किंवा वांग्याच्या डोक्यावर. ताजसाठीच वांगे एका थाळीतून लुढकून कुठल्या थाळीत जातात.
[…]

आरोग्यदायी गाजराची भाकरी

गाजराचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. गाजर हे ‘अ’ जीवनसत्वाने समृद्ध असते. गाजर खाल्ल्याने आतडय़ांच्या तक्रारी दूर होतात. तसेच चेहर्‍यासाठीही गाजर उपयुक्त आहे. शरीरात पाणी कमी झाल्यास गाजराच्या रसाने ती उणीव भरून काढली जाते. हृदय रोगांवर रामबाण इलाज आहे.
[…]

1 12 13 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..