नवीन लेखन...

करायला गेलो एक

माझे ‘Culinary Skills’ कसे वाढत गेले ते ह्या प्रसंगातून कळेल. पंचवीस वर्षापूर्वी मी माझे बिर्‍हाड पॅरिसला थाटले होते. किचनमधुन ‘आयफेल टॉवर’ दिसत असे. रोजचे जेवण बनविणे सवयीचे झाले होते (ब्रेडच्या विविध प्रकारांनी मला आधार दिला). एका सुट्टीच्या दिवशी माझ्या डोक्यात रवा, साखर व तूप यांचा झिम्मा सुरू झाला व मी शीरा करण्याचा निश्चय केला. […]

बेंगलोरमधली खवय्येगिरी

मला अजूनही आठवतं, कॉलेज मध्ये ट्रिप ला कुठं जायचं यावर आमच्या खलबती होत असताना साऊथला जाऊया असा आंधळा आग्रह होता माझा. कारण काय तर, साऊथ फूड ! कदाचित अन्नदेवतेने माझ्या मनातलं आणि पोटातलं ऐकलं असावं आणि मला बेंगलोरमध्ये इडली डोसाच्या रिंगणात बसवलं असावं. […]

सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे अस कां म्हणतात?

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो. […]

ललिता पंचमी

ललिता पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ॥ रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेम तें आले सद्‌भावे क्रीडतां हो ।।उदो।। नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), श्री ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुक्ल पंचमी ला उपांग ललिता व्रत करावयाचे आहे. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता […]

उकडीच्या मोदकांच्या निमित्ताने

गणपती जेमतेम ६-७ आठवड्यांवर आलेत; उकडीच्या मोदकाविषयी कोणी काहीच न लिहिण योग्य दिसत नाही. ते खरोखर तोंडात पडण्यापूर्वी निदान थोडी वातावरण निर्माण करण गरजेच वाटतय. […]

पोळी ते फोडणीची पोळी

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत फोडणीची पोळी तिच्या शिळेपणामुळे नैवेद्यासाठी जरी निषिध्द मानली गेली असली तरी ती खवैयाच्या जिभेवर मात्र पहिल्या पंगतित विराजमान असते. तिचे जीवन तर मानवीजीवनासाठी आदर्श वस्तूपाठच असते. […]

फो पो – पोळी ते फोडणीची पोळी

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत फोडणीची पोळी तिच्या शिळेपणामुळे नैवेद्यासाठी जरी निषिध्द मानली गेली असली तरी ती खवैयाच्या जिभेवर मात्र पहिल्या पंगतित विराजमान असते. तिचे जीवन तर मानवीजीवनासाठी आदर्श वस्तूपाठच असते. […]

पुण्यनगरीतील खादाडी

एक खवैया व त्यात खाउपीऊ घालण्यात आनंद लुटणारा या माझ्या पिढीजात स्टेटसमुळे मी राहतो तिथल्या म्हणजेच पुण्याच्या खाद्यसंस्कृतिशी एकरूप झालोय. डोक्यातली वळवळ आणि पोटातली कावकाव यांच्या संगनमताने कित्येक खाद्य चढायांवर मी जीव निछावर केलाय. पुण्यात आज शुक्रवार संध्याकाळ आहे अशी वदंता पसरायचाच अवकाश, बर्याचशा घरी गँसची शेगडी व मँडम यांची द्रुष्टाद्ष्ट चहा कॉफी पुरतीच होत असेल आणि त्या शुक्रवार संध्याकाळपासुन रविवारच्या रात्रीपर्यंत क्षुधाशांतीच्या विविध होमकुंडांभोवती पुणेकर खवैयांची भ्रमंती चालुच असते. […]

बटाटा वडा

पुण्या मुंबईकडील खवैयांच्या हिटलीस्ट वर बटाटे वडा हा अत्युच्य स्थानावर विराजमान आहे. खरतर एकटा बटाटे वडा एक हाती तुमची क्षुधा शांत करु शकतो तरी पण, माझ्या मते, स्लाईस, पाव, देठासकट तळलेली हिरवी मिरची, तळणीतला चुरा, पुदिना चटणी, चिंगु चटणी ही सगळी नवरदेवाच्या वरातीत स्वतःला मिरवुन घेणारी मंडळी…. […]

मिसळ अशांना ‘पावा’यची नाही रे!

अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही. […]

1 2 3 4 5 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..