नवीन लेखन...

चहा ‘तो’ की ‘ती’?

‘तो’ चहा की ‘ती’ चहा, हा प्रश्न तसा माझ्या मनात नेहेमीच उभा असतो. अगदी ‘टू बी आॅर नाॅट टू बी’च्या धर्तीवर. कुणाला विचारावं, तर काय वेड लागलंय का माणसाला, अशा पद्धतीने बघण्याची भिती. पण धीर करुन काही दिवसांपूर्वी मी तो फेसबुकवरच्या माझ्या मित्रांना विचारायचं ठरवलं आणि लगेच विचारलाही. आणि त्या अवघ्या चार शब्दांच्या प्रश्नांवर घनघोर कमेंट्सही आल्या. […]

मानसोल्लास ग्रंथातील पाकशास्र

भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक  अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा ‘मानसोल्लास’ अर्थात ‘अभिलषितार्थचिन्तामणि’ हा ग्रंथ. (शतक १२ वे). हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानकोशच आहे. राजा सोमेश्वर हा चालुक्य कुलातील राजा असून त्याने स्वत: या ग्रंथाला ‘जगदाचार्यपुस्तक’ असे नाव दिली आहे. राजाचा आहार असा या मांडणीचा विषय असला तरी तत्कालीन पाककृतींचा परिचय त्याद्वारे करून देणे असा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. आधुनिक काळात पाकशास्त्र विषयाचे प्रशिक्षण महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थाना उपलब्ध आहे. परंतु १२ व्या शतकात सोमेश्वर राजाने सांगितलेले अन्नाविषयीचे तपशील आजच्या काळातही उपयुक्त आहेत. […]

दिक्षित की दिवेकर – कोणाबरोबर जाऊ ?

ह्या दोन्ही पद्धतीवरून असच नमूद करावं लागतंय कि वजन घटवण्यासाठी कोणत्याही आहार पद्धतीचा वापर करा, पण तो तुम्हाला कायम करता येईल असाच निवडा. कारण घटलेले वजन कायम घटलेले राहण्यासाठी तो उपयोगी ठरावा. […]

मत्स्यायदान

श्रावण आता संपला. गणपतीही येऊन गेले. आता मत्स्यप्रेमींच्या मेजवान्या सुरु होतील… […]

खरडा आणि ठेचा….

खरडा बनवतात तो दोन्ही, हिरव्या आणि लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच… […]

नैवेद्य का दाखवावा ??

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू. गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक. मोदकच का ? गणेशांना आवडतो म्हणून !!! का आवडतो ? गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. […]

पार्सल संस्कृती

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे श्र्लोक म्हणत घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची आपली भारतीय संस्कृती कधी काळी होती असे म्हणण्याची आता वेळ आलेली आहे असे म्हणले तर फारसे वावगे होणार नाही. पण या पार्सल संस्कृतीला नावे ठेवण्यापेक्षा ती आता बहुतेक शहरात एक आवश्यक बाब बनली आहे हे तितकेच खरे आहे. व आपण सर्वांनीच ती […]

सीकेपी म्हणजे, रविवारचं मटण

सीकेपी जेवणात मटणा पासून बनवल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांची लयलूट असली तरी मटण भात हे मात्र अस्सल सीकेप्यांचं रविवारचं ‘स्टेपल फूड’ आहे हे निर्विवाद. चला तर मग, घ्या ती पिशवी आणि भेटा खाटकाच्या दुकानात. रविवार लागलाच आहे आता. […]

प्रोटीन पावडर

घरीच बनवा ‘प्रोटीन’ पावडर साहित्य : १०० ग्रॅम बदामाची पूड,१०० ग्रॅम सोयाबीन पावडर,१०० ग्रॅम शेंगण्याची पावडर,१०० ग्रॅम मिल्क पावडर,१०० ग्रॅम चॉकलेटची पावडर. मिक्सरच्या ब्लेंडरच्या भांड्यात वरील प्रमाणे सगळे घटक पदार्थ प्रत्येली १०० ग्रॅम या प्रमाणांत घेऊन मिक्सरवर फिरवून ब्लेंड करून ठेवा. सकाळ संध्याकाळ दिवसातून दोनदा एक ग्लास दुधात घालून ही प्रोटीनची पावडर घेतल्यास उत्तम फायदा मिळेल. […]

थंडाई

धुळवड व रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई पिण्याची मजा काही औरच असते. थंडाई पिणे आरोग्यासाठीही हितकारक असते. होळीच्या दिवसात प्यायली जाणारी थंडाई इतर दिवशीही पिऊ शकतात. थंडाईमध्ये खसखस असल्याने पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होता. थंडाईमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मिनरल्स सारखी पोषकतत्वे […]

1 2 3 4 5 6 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..